भावना कोश | Bhavna Kosh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhavna Kosh by शं. र. फाटक - Shan. R. Fatak

More Information About Author :

No Information available about शं. र. फाटक - Shan. R. Fatak

Add Infomation AboutShan. R. Fatak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) आहेत त्यातलेच एखांदे औषध निवडावे लागेल. लक्षणे किंवा भावना पाहताना हऱच धोरण लक्षात ठेवावयास पाहिजे. उदाहरणार्थ जुलात्र होणे, अंगाला घाम सुटणे, लघवीला जास्त होणे किंवा बायकाना बिटाळ जास्त जाणे ही लक्षणे दिसावयास अगदी , वेगवेगळी दिसतात, पण जरा बारकाईने बिचार केल्यास शरीरातील “ हे नैसर्गिक साव वाढत्या प्रमाणात आहेत” या एका सदराखाली ते येऊ शकतील, तेव्हा वरीछ लक्षणांवर दिलेल्या औषधांचा विचार करताना वेळ प्रसंगी * खाव एकंदरीत वाढलेले * या सदरात दिलेल्या औषधांवर पण नजर टाकलेली बरी. र जीवनशक्तीच्या ( ४1८७1 10706) मार्गामध्ये अंतर्गत किंवा बाह्य कारणा- मुळे बिघाड झाला म्हणजे ही रुद्ध झलिली जीवनशक्ती प्रकृतिधर्मानुसार शरीरातील कोणत्यातरी एका किंवा जास्त इंद्रियात किंबा अवयवात लक्षणे उत्पन्न करून ही शक्ती आपला नेहमीचा मार्ग बघडल्याची व तो दुरुस्त करणाऱ्या आपल्या प्रयत्नाची जाणीव करून देते. इंद्रिये व अवयव यांच्या कार्यभिन्नंतेमुळे लक्षणात भिन्नता दसून आली तरी त्यांचे आद्य कारण नेहमीचा मार्ग ब्रिघडलेली जीवनशक्ती ' हेच होय व म्हणूनच होमिओपाथिक चिकित्सेचे हे मूलततत्य ध्यानात बाळगून भिन्न भिन्न दिसणाऱ्या पण वर दर्शविल्याप्रमाणे मूलतः समानधर्मी असणाऱ्या अनेक लक्षणांवर दिलेल्या औषधांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करणे आव्यक आहे. सववसामान्य शरीरांबर होणाऱ्या भावना व लक्षणे व त्यांची वैशिष्ट्ये व त्यावर या पुस्तकात तसेच अशा प्रकारच्या दुसऱ्या कोशात दिलेली औषधे यांचा अंतर्भाव थोड्या बहुत फरकाने विशिष्ट इंद्रियांच्या किंबा अवयवांच्या सदराखाली झालेला आढळून येईल. तेः्हा एखाद्या विशिष्ट इंद्रियांच्या लक्षणावर किंवा त्याच्या बैशिष्टयावर दिलेल्या औषधांचा विचार करताना, त्या लक्षणासाठी व वैशिष्ट्याच्या समानधर्मी सामान्य लक्षणासाठी व वैशिष्टयासाठी दिलेल्या औषधांचा विचार करणे जरूर आहे. किंबहुना अशाच तऱ्हेचा विचार करून औषधाची निवड केली तर ती अचूक होण्याचा पुष्कळ वेळा जास्त संभव असतो. झ लक्षणांचा व त्यांच्या वेशिष्ट्याचा विचार करताना मानसिक लक्षणांचा विचार करणे हे होमिओपाथिक चिकित्सेचे दुसरे एक महत्त्वाचे अंग आहे. कित्येकवेळा आजारी माणसांची मानसिक लक्षणे स्पष्टपणे दृष्टोत्पत्तीस येतात. परंतु अनेकवेळा शिष्टाचार पाळण्याच्या बंघनामुळे मोठ्या माणसांच्या बाबतीत अशा लक्षणांची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून काढून घ्यावी लागते. एरवी स्वभावाने थेड असलेले काही इसम आजारपणात इतके चिडखोर बनतात की झुश्रूषा करणाऱ्या लोकांना नकोसे होते. तर दुसरी काही आजारी माणसे यातना होत असताना सुद्धा थंड असतात. काही मागसे आपली लक्षणे सांगूनच थांबत नाहीत तर इतर अनेंक गोष्टी सुद्धा सुनावण्यास कमी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now