वाइज एंड अदरवाइज | WISE AND OTHERWISE

Book Image : वाइज एंड अदरवाइज  - WISE AND OTHERWISE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुधा मूर्ती - SUDHA MURTY

No Information available about सुधा मूर्ती - SUDHA MURTY

Add Infomation AboutSUDHA MURTY

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पण त्यानेही माझ्यापुढील खरी समस्या काही सुटली नव्हती. त्या घरातील वातावरण एखाद्या सणासुदीला असावे तसे होते. कुठेही दुःखाचा किंवा शोकाचा लवलेशही दिसत नव्हता. मग मी सांत्वन कसं, कोणत्या शब्दांत करू ? सुरुवात कशी करू ? त्या घरात जणू काही कोणाच्या साखरपुड्याच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र जमली आहेत, असं वाटत होतं आणि इथे मी सांत्वनासाठी आले होते. एवढ्यात त्या घरची गृहिणी बाहेर आली आणि आपल्या पतीच्या शेजारी सोफ्यावर बसली. मग त्यांनीच संभाषणाला सुरुवात केली. “तुमचं काम पाहून आम्हांला खूप आनंद वाटतो. आमच्याकडे रोज बोलण्यात तुमचाच विषय असतो. आम्हांला तुमचा अभिमान वाटतो.' मी बुचकळ्यात पडले. या लोकांना रोज माझ्याविषयी बोलायची काय गरज आहे ? मी स्वतः रोज कुणाविषयीही बोलत नाही. अगदी माझ्या पतीविषयीसुद्धा नाही. मग हे कशाविषयी बोलत असतील बरं ? माझ्या लेखनाविषयी ? की माझ्या समाजकार्याविषयी ? उ मी शांत बसून आहे, हे त्यांच्या लक्षात आले. पण तरीही ते दोघे भरभरून बोलतच होते. “तुमचे यजमान कसे आहेत ? ते खरोखरच फार मोठे आहेत.' या घरी मी समाचारासाठी आलेली असताना संभाषणात माझ्या पतीचं नाव निघावं याचा मला धक्का बसला. त्या दोघां पतीपत्नींना खूप बोलायचं होतं. ती खत्री म्हणाली, मी एक दिवस तुम्हाला पाहिलं. तुम्ही फार सुंदर साडी नेसला हीता. मला वाटतं, पटोला साडी होती. पटोला होती, की ओरिसा ? कारण दोन्ही साड्यांचे पॅटर्न साधारण सारखेच असतात. 3 ती कोणत्या साडीविषयी बोलत होती ते काही माझ्या लक्षात येईना. “कदाचित ओरिसा असेल, मी आपली बोलायचं म्हणून बोलले. तिचा चेहरा खुलला. ती विजयी मुद्रेनं म्हणाली, 'बघा माझंच म्हणणं खरं होतं. मी सुमनला म्हटलंच होतं. त्या ओरिसात खूप कार्य करतात, तेव्हा त्यांनी तिकडेच घेतली असेल ती साडी. काय सुंदर रंगसंगती होती त्या साडीची.' आता त्या नवऱ्यानं तोंड उघडलं. “तुमची कंपनी फारच जोरात आहे. डॉटकॉमच्या लाटेत न सापडलेल्या अगदी मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. आय. टी. कंपन्यांचा गेल्या सहा महिन्यांतला ट्रेंड नीट बारकाईने पाहा, असं मी माझ्या १८ / वाइज अँड अद्रवाइज काही मित्रांना म्हणालोच होतो.' खरं तर या सगळ्याशी माझा काहीच संबंध नव्हता. या विषयावर माझे पती काहीतरी भाष्य करू शकलेही असते, पण ते आता उपस्थित नव्हते. आता पत्नी बोलायला पुढे झाली. “तुमच्या कॉलेजात प्रवेशासाठी काय करावं लागतं ? दहावीत जर पंच्याऐशी टक्के मार्क असले, तर प्रवेश मिळेल ?” हं, पण एस्‌. एस्‌. सी. नाही हं, आय. सी. एस्‌. ई मधे' तिच्या नवऱ्याने खुलासा केला. एस्‌. एस्‌. सी. आणि आय. सी. एस. ई. ही दोन वेगळी बोर्ड आहेत, असं त्याने स्पष्ट केलं. 'मला माहीत नाही. प्रवेशाबाबातच्या गोष्टी जी कमिटी हाताळते, त्यात मी नाहीये.' मी सांगितलं. अशा गप्पा चालूच राहिल्या. त्या संपायलाच तयार नाहीत. थोड्या वेळाने मी विचारात पडले, नक्की कोण बरं वारलं असावं ? मला आठवत होतं, त्याप्रमाणे त्या माणसाची आई वारली होती. ती माझ्या आईची मैत्रीण होती. पण तो विषय काढणार तरी कसा, असा माझ्यापुढे प्रश्‍न पडला. कदाचित त्याच्या बायकोची आई वारलेली असली तर ? मला बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मी गप्प बसले आहे, हे त्यांच्या नक्कीच लक्षात आलं होतं. पण तरीही काही करून मला संभाषणात ओढायचंच, असा त्यांनी चंग बांधला होता. त्या सर्व प्रकाराने मला फारच अवघडल्यासारखं झालं. आज बहुतेक आपल्याला समाचाराचे चार शब्द बोलण्याची संधीच मिळणार नाही, असं दिसतंय - माझ्या मनात आलं. पण निघण्याआधी एक शेवटचाच प्रयत्न मी करायचं ठरवलं. . आम्ही बोलत बौलत बाहेरच्या फाटकापाशी पोचल्यावर मी चाचरत विषय काढला. तुमच्या आई आजारी होत्या, असं ऐकलं...” नवऱ्याने बोलायला तोंड उघडायच्या आतच बायको म्हणाली, 'हो. माझ्या सासूबाई बरेच दिवस आजारी होत्या. पण आमच्यात खूप प्रॉब्लेम्स होते. त्या इतक्या जुनाट विचारांच्या होत्या, आणि तडजोड करयला तयारच नसायच्या. हे पुरुष जातात ऑफिसला निघून आणि आम्हां बायकांना घरी काय काय अडचणींना तोंड द्यावं लागतं, ते यांना कधी समजतच नाही.' यानंतर तिने आपल्या सासूविषयी पुष्कळ गाऱ्हाणी सांगितली आणि सर्व वेळ तो नवरा अपराधी चेहऱ्याने उभा होता. शोकविरहित मरण / १९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now