अलफ़ाज़ डॉट कॉम | ALFAZ DOT COM

ALFAZ DOT COM  by पुस्तक समूह - Pustak Samuhफारुख एस० काझी - FARUK S. KAZI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

फारुख एस० काझी - FARUK S. KAZI

No Information available about फारुख एस० काझी - FARUK S. KAZI

Add Infomation AboutFARUK S. KAZI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चंद्राला बंटी संध्याकाळी अब्बू घरी आल्यावर अलफाज त्यांना सोडायला तयार होत नसे. सतत सोबत. “मंग ! दिवसभर कुठं असतात ते माझ्याबरोबर..... ? ” असाच जणू त्याचा प्रश्न असतो. अब्बूंच्या खांद्यावर झोपून रस्त्याच्या कडेने फेरफटका मारायला त्याला फार आवडायचं. दिवसभर जवळ नसलेले अब्बू संध्याकाळी फक्त आपले नि आपलेच असतात. आपण एकदम निवांतपणे त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू शकतो. तो आपला हक्कच !! अब्बू विचारतात, “बिट्ट, आज दिवसभर काय केलस? ” मंग आपण सांगायचं, “पाणी खेळलो, टफीला मारलं, मांजरीच्या पिल्लाबरोबर खेळलो, मस्ती केली, थोडी मातीही खाल्ली......... असंच काहीबाही तो बोलत रहायचा.... अब्बुना दिवसभराची हकिगत कळाली की ते त्याला एखादं गाणं गाऊन दाखवत. एखादी कहाणी ऐकवत. त्यात अधून मधून अलफाजची डायलॉगबाजी चालू असायची. अंधार असला की अब्बू सोबत बॅटरी घेत. अलफाजला ती हवी असायची. रस्त्यावर चमकवण्यासाठी, झाडावर मारण्यासाठी......... अंधारात लपलेली घरं शोधण्यासाठी... आणि अंधारात भीती घालण्यासाठी दडलेलं माकड दाखवण्यासाठी.. त्याला बॅटरी हवी असायची. बॅटरी रस्त्यापेक्षा आकाशाकडेच जास्त वळलेली असायची. तो काय शोधतोय काही कळायचं नाही.... अमावस्या जवळ येत होती. चंद्र जवळजवळ गायबच.... !!! अंधार जास्त होता... अब्बूनी बॅटरी घेतली. दोघं निघाले भटकायला..... दोघांच्या गप्पा अविरत चालू होत्या. नुकतच दोघांनी मिळून एक पुस्तक वाचलं होतं. “प्राणी संग्रहालयाला भेट'! त्यात नुसतीच चित्रंच होती. ती अलफाजला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now