डॉ० आयडा स्क्डर | DR. IDA SCUDDER

DR. IDA SCUDDER  by पुस्तक समूह - Pustak Samuhवीना गवाणकर - VEENA GAVANKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वीना गवाणकर - VEENA GAVANKAR

No Information available about वीना गवाणकर - VEENA GAVANKAR

Add Infomation AboutVEENA GAVANKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इंग्लिशसारख्या भाषा आणि वाड्मयाचा अभ्यास. रसायनशास्त्र किंवा शरीरशास्त्र यासारखे विषय तिला अपरिचित. त्यामुळे हे सारे समजून घेताना तिला सतत परिश्रम करावे लागले. फार सायास पडले. डॉक्टरी व्यवसायातील संभाव्य द्रव्यप्राप्तीचा मोह तिला नव्हता. तिला नीटपणे माहीत होते- हिंदुस्थानात तिला जेमतेम ५० ते ६० डॉलर्स मासिक वेतन मिळणार होते. हिंदुस्थानातून येणारी पत्रं किंवा अर्काट मिशनचे वार्षिक अहवाल यांतून तिला तिथे दंड थोपटून उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा प्रचंडपणा जाणवे. या किरकोळ वेतनाच्याच आधारे ती हिंदुस्थानात पाय रोवून उभी राहणार होती. आव्हानाला सामोरी जाणार होती. तिथं अव्याहत चालू असलेल्या जीवनमृत्यूच्या झगड्यात स्वतःला झाकून देणार होती. ४6 816 4680. [7] आयडा शिकत होती त्याच सुमारास तिची भावंडंही जवळपासच्या शहरांतून आपापले अभ्यासक्रम पार पाडत होती. चार्ल्स, हॅरी आणि वॉल्टर हे तिघे धर्मोपदेशक होण्याच्या दृष्टीनं अभ्यास करत होते. सर्व स्कडर परिवार शेल्टर बेटावरच्या त्यांच्या घरात उन्हाळ्याच्या सुट्टीत गोळा झाला होता. या घराला स्कडर कुटुंबीयांच्या जीवनात एक आगळे स्थान होते. सर्व उडान एकत्र जमावं अशी या भूतलावरची एकमेव जागा. हसावं, खेळावं, गावं, |, आनंद लुटावा. सप्टेंबर महिन्यात स्कडर आई-बाबा हिंदुस्थानात जायला निघाले तेव्हा आयडालाही त्यांच्याबरोबर निघण्याची जबरदस्त इच्छा झाली; पण आताशी कुठे अभ्यासक्रमाची दोन वर्षच पार पडली होती. तिचा चुलतभाऊ डॉ. ल्यू स्कडर याच्या विनंतीवरून कॅनेडियन महिला डॉक्टर लुइसा हार्ट राणीपेटला जायला निघाली तेव्हा तर आपल्यासारख्याच तरुण, उघड्या डोळ्यांनी आयुष्याचा अर्थ समजून घेणाऱ्या या डॉक्टरबरोबर आपणही निघावे असे तिला वाटू लागले; पण अभ्यासक्रम अपुरा ठेवून जाण्याने काहीच साधणार नव्हते. १८९८ मध्ये न्यू यॉर्कच्या कानेंल मेडिकल कॉलेजने पुरुषांबरोबर स्त्रियांनाही प्रवेश खुला केला तेव्हा, वैद्यकीय शास्त्राचे अधिक विस्तृत अन्‌ सखोल ज्ञान मिळवण्यासाठी आयडा आणि तिच्या काही वर्गमैत्रिणी शेवटच्या वर्षासाठी या कॉलेजात दाखल झाल्या. आयडा फिलाडेल्फियाहून न्यू यॉर्कला गेल्याचे दु:ख कोणाला झाले तर ते बर्चफील्ड मिलिकेनला. पुरुषांच्या वैद्यकीय महाविद्याल्यात तो शिकत होता. चांगलाच खटकला होता. ,तिला म्हणालाही- 'आताच तर कुठे आपला परिचिय झाला होता. मला वाटलं होतं-' डॉ. आयडा स्कडर / २८ “न्यू यॉर्क काही खूप लांब नाही. तिथं ये की भेटायला. तिनं त्याला दिलासा दिला. आयडाला बर्चफील्ड आवडला होता. त्याचा अदबशीर स्वभाव, सभ्य वर्तन तिच्या पसंतीस उतरलं होतं. त्याचं व्हायोलिन आणि पियानोवादनातील कौशल्य तिला भुरळ पाडत होतं; पण 'इतर मित्रांप्रमाणेच हाही एक एवढीच भावना ती ठेवून होती, मैत्रीची खास प्रेम वगैरे काही वाटलं नव्हतं; पण आपल्याकडे टक लावून राहणाऱ्या त्याच्या नजरेची मात्र अलीकडे तिला जाणीव होऊ लागली होती. 1] आयडा न्यू यॉर्कला आल्याचा आनंद झाला तो मीरा मोफॅट आणि कॅथेराइन व्हान नेस्ट या दोघींना. या दोघी अविवाहित. स्कडर कुटुंबीयांच्या घनिष्ठ मित्रपरिवारातल्या. त्यांनी तिला झापल्या प्रशस्त घरात राहायला बोलावलं. कॅथराइन ही प्रॉटेस्टंट धर्मपंथाच्या ख्री-मदतगार संघटनेची हिंदुस्थान विभागाची सचिव होती. तिने आयडाला आपली बंहीणच मानले होते. कानेंल कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर मात्र आयडा कायमची धास्तावलेली असे. शेवटच्या वर्षात अपयश पदरी घ्यावं लागणार की काय या भीतीनं ती ग्रासलेली असे. त्यात इथं अटीतटीची स्पर्धा. मागच्या अभ्यासक्रमापेक्षा अधिक वेगळा अभ्यासक्रम. आणखीही एक काळजी- अमेरिकेतील वैद्यकीय अभ्यास उष्ण कटिबंधातील आजारांवर इलाज करताना अपुरा ठरायचा. इथे कुष्ठरोग, हिंवताप, कॉलरा, प्लेग, नारू, खरूज, हगवण इत्यादींवरचे औषधोपचार शिकवले जात नसत. तिकडे दक्षिण हिंदुस्थानात तर प्लेगने थैमान मांडले होते. त्यावर नवीन औषधोपचार शोधण्यासाठी, अभ्यासपूर्ण संशोधन करण्यासाठी डॉ. हाफकिन्‌ पॅरिसहून हिंदुस्थानात आले होते. प्लेग आणि कॉलऱ्यावर त्यांनी नवीन लस शोधली होती. स्वत:वर आणि नंतर इतरांवर या लशीचा प्रयोग करून तिची परिणामकारक प्रतिबंधकशक्ती जगापुढं ठेवली होती. उ अहिंसावादी हिंदू लोकांचा, प्राण्यांच्या पेशीत तयार केलेल्या प्रतिबंधक लशीला विरोध राहील हे ध्यानात घेऊन डॉ. हाफकिन्‌ यांनी तुपात ही लस तयार केली. आयडाच्या वाचनात या बातम्या येत होत्याच. प्लेग आता वेलूरमध्येही घुसला होता. तिच्या वडिलांनी आणि अन्य मिशनऱ्यांनी ही लस टोचून घेण्याचा पहिला मान मिळवला होता. आयडाला आता धीर निघत नव्हता. तिथे प्रतिबंधक इलाजांचा पायंडा पाडला जात असताना आपण मात्र इतक्या दूर आहोत याचं तिला वाईट वाटलं. तिनं मनाशी ठरवलं- शिक्षण पूर्ण होताच अधिक कार्यानुभवासाठी न थांबता सरळ हिंदुस्थानात जायचं. नाहीतरी उष्ण कटिबंधातील रोगराईवर करायचे उपचार तिच्या बाबांइतके अन्य कोणास माहीत होते? इथे अभ्यासलेल्या प्रसूतिविज्ञानाचा मात्र तिला हिंदुस्थानात खूपच फायदा होणार होता- विशेषत: न्यू यॉर्कमधील प्रसूतिगृहात तिने दोन आठवडे काम केले त्याचा. तयारी / २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now