परिसरातले प्रयोग | FUN WITH ENVIRONMENT

FUN WITH ENVIRONMENT by जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEESTपुस्तक समूह - Pustak Samuhसुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

More Information About Authors :

जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

No Information available about जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

Add Infomation AboutJOS ELSTGEEST

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

No Information available about सुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

Add Infomation AboutSUHAS KOLHEKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अफलातून अलमारी फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होता राजा. त्या राजाकडे एक मोठ्ठी अलमारी होती. अलमारी म्हणजे काय माहिती आहे ना ? कपाट. आता तुम्ही म्हणाल कपाट तर सगळ्यांकडं असतं, पण राजाचं कपाट वेगळं होतं.आख्खंच्या आख्खं काचेचं होतं ते. त्याची दारं, वरची खालची, मागची बाजू काचेचीच. कप्पेसुद्धा काचेचेच. अशी अलमारी पाहिलीय तुम्ही ? त्या राजाकडे होती. आता काचेचं कपाट म्हणजे त्यात काय ठेवलंय हे दिसणार. हे तर आख्खंच काचेचं, म्हणजे कुठूनही पहावं, काय ठेवलंय ते दिसणारच. पण या अलमारीची आणखी एक गम्मत होती, ती कधीही पहा कुठूनही पहा अगदी रिकामी दिसायची. लोकांना वाटायचं, अरे एवढ्या मोठ्या अलमारीत या राजानं काहीतरी ठेवावं. जरीचा अंगरखा ठेवावा, जिरेटोप ठेवावा, निदान गोष्टींची पुस्तकं, खाऊचा डबा, काहीतरी ठेवावं. पण तीच तर या अलमारीची गंमत होती. आपल्याला जे काही हवं असेल, ते त्यात मिळायचं. म्हणजे समजा आपल्याला उन्हातून घरी आल्या आल्या थंडगार पाणी हवं असेल, तर अलमारी उघडायची - थंडगार पाण्याचा पेला भरून ठेवलेला. समजा तुम्हाला वाटलं, आत्ता बाहेर फिरायला जायचंय, आणि तुम्हाला मस्त नः पॉलिश केलेले बूट हवेत. उघडा दार, समोर चमचमते बूट तय्यार. एवढंच नाही तर सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडासुद्धा त्यात मिळेल... जर हवा असेल तर .... हां, एक सांगायचंच विसरलं. या अलमारीतून काही घेतलं, तर “काहीतरी” परत ठेवावंपण लागायचंच. असं का बरं ? ते मात्र कुणालाच माहीत नव्हतं. राजाकडे असली नामी अलमारी होती, तो त्यातून काहीही काढायचा, आणि परत काहीतरी ठेवायचा. अशा या अफलातून अलमारीला राजा अगदी जपायचा. पण एकदा राजा प्रवासाला गेला. राजा गेल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या राजवाड्यात चोर शिरले. त्यांना राजवाड्यातलं दुसरं तिसरं काही नको होतं. त्यांना हवी होती फक्त अफलातून अलमारी. कारण त्यांना अलमारीची गंमत माहीत होती. अलमारी उचलून ते निघून गेले. घरी आणून अलमारी उभी केली. आणि एका चोरानं मनात विचार आणला, मोठ्ठं पोतं भरून सोन्याच्या झगमगत्या मोहरा हव्यात. उघडली अलमारी, पिवळ्या लखलखत्या मोहरांचं पोतं समोर हजर. दुसरा चोर म्हणाला, मला दोन पोती मोहरा हव्यात. अलमारीचं दार उघडलं तर दोन पोती मोहरा भरून उभी. चोरांचा म्होरक्या होता, त्यानं तीन पोती मोहरा अलमारीतून मिळवल्या. चोर खुश झाले. ते म्हणाले आता प्रश्नच संपला. पाहिजे तेवढ्या मोहरा घरबसल्या हजर. हव्यात म्हणायचं... दार उघडायचं.. मोहरा तयार. रात्रभर त्यांनी तेवढंच काम केलं. मोहरांची पोतीच्या पोती बाहेर निघायला लागली. पण एक अडचण झाली खरी. कुणीही त्या अलमारीत परत काहीही ठेवलं नाही. चोरांचा म्होरक्या म्हणाला, ““गडे हो, लवकरच आपण जगातील तीन सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणार आहोत. पण आता सकाळ झालीय. आता थोडं थांबू या. थोडी झोप घेऊ. नाहीतरी मोहरांची पोती उचलून उचलून थकायला झालंय. प्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now