पालकनीती - जनवरी -2014 | PALAKNEETI - JANUARY 2014

PALAKNEETI - JANUARY 2014 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वीकार यांचा उत्तम समन्वय! शिक्षण ही कोणी एकाने दुसऱ्याला द्यायची गोष्ट नसते. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे, आपापल्या गतीने शिकत असतो, शिक्षकांना फक्त त्या विषयाकडे मुलांचे लक्ष वेधावे लागते, मुलांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचवावे लागते. शिकवावी लागतात ती काही तंत्रे आणि पुरवावी लागते ती काही माहिती! मुले चुकताना दिसली तरी त्यांचे त्यांना समजेपर्यंत थांबायचे, आपण मदत तर करायची पण थेट उत्तर किंवा चूक सांगायची नाही. मुलांना आपले आपणच उमगेपर्यंत सूचक प्रश्‍न विचारायचे. शिक्षकांसाठी ही फार मोठी कसरत असली तरी त्यांना हे जमवावे लागते. मायाताईंच्या वर्गात या सर्व गोष्टी फार ठळकपणे दिसून आल्या. त्यांचा वर्ग म्हणजे एक शेणाने सारवलेली छोटीशी खोली. एका दाराबाहेर गाई, म्हशी बांधलेल्या तर दुसऱ्या दाराबाहेर वासरू. वर्गात आठ ते पंधरा वयोगटाची, वेगवेगळया क्षमतेची दहा-पंधरा मुले-मुली बसली होती. ताई बोलत असताना वर्गात पूर्ण शांतता, तर ताईंनी प्रश्‍न विचारल्यावर प्रत्येकाची उत्तर देण्याची अहमहमिका! आम्ही गेलो तेव्हा ताई 'सुनहरी हिरन ही गोष्ट वाचून दाखवत होत्या. प्रत्येकाला ताईंच्या हातातले पुस्तक, त्यातली चित्रे दिसत होती. मुलेही ताईंबरोबर मनातून ती गोष्ट वाचत होती, अवघड शब्दांवर चर्चा करत होती. मुले गोष्टीत अगदी रंगून गेली होती. मग मुलांनी ती गोष्ट आपल्या शब्दात सांगितली. ताईंनी काही प्रश्‍न विचारले, त्या उत्तरांत बाकीच्यांनी राहिलेल्या बाबींची भर घातली. म्हणजे श्रवण, आकलन, प्रश्‍न समजून घेणे, योग्य शब्दांत मांडणे हे सगळे घडले. त्यानंतर वाचता येणाऱ्या आणि वाचता न येणाऱ्या अशा मुलांचे दोन गट झाले. दोघातिघांना या दोन्ही गटांत थांबायचे नव्हते. त्यांना ताईंनी मोकळे सोडले. वाचता येणारी मुले ताईंनी दिलेली पुस्तके वाचू लागली. वाचता न येणाऱ्या गटाला ताईंनी गोष्टीत आलेले शब्द विचारले. त्यांची फळ्यावर यादी केली. मुलांना त्यातले 'आ कारान्त शब्द विचारले, कसे वाचायचे, कसे ओळखायचे ते शिकवले. विशेष म्हणजे मुलांनी भितीवर लावलेल्या कवितेमधले सगळे आकारान्त शब्द स्वतःहून शोधून दाखवले. गंमत म्हणजे शेजारीच दुसरा गट बसला होता. पण यांच्या कोणत्याही उपक्रमाने तो गट विचलित झाला नाही आणि त्यांनी या गटाच्या कामात लुडबुडही केली नाही. त्यांची ही स्वयंशिस्त, स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे सगळे आश्‍्चर्यकारकच होते. मायाताईंची ऊर्जाही लक्षणीय होती. त्या एका गटात बसत, मुलांनी केलेल्या कामाचे कौतुक करत, शंकासमाधान करत, तेवढ्यात दुसऱ्या गटाने बोलावले तर त्या उठून त्या गटात जात, तिथे बसून त्यांना मदत करत, मधेच गटात न बसणाऱ्या मुलांना गटात येण्याविषयी विचारत, पुढे असणाऱ्यांची मागे असणाऱ्यांसाठी मदत घेत. मग ताईंनी मुलांना वर्कशीटस्‌ दिली. ताईंनी आकडेवारीत बदल करून चार वेगवेगळी वर्कशीटस्‌ बनवली होती. त्यात वास्तवावर आधारित, एका शब्दात उत्तर देता येईल असे, थोडा विचार करून उत्तर देता येईल असे, मुद्देसूद उत्तर दयावे लागेल असे आणि स्वतःचे मत मांडावे लागेल असे चार प्रकारचे प्रश्‍न विचारले होते. काही गणितातली उदाहरणेही होती. एक उदाहरण सांगते, 'मेरे पास ग्यारह आम्ही एकदा शिवानीताईना विचारले, आमच्या खेळघरात मुले तासाच्या वर एका ठिकाणी बसतच नाहीत, इथे मुले सलग इतका वेळ वर्गात बसू कशी शकतात? यावर त्यांचे उत्तर काय? तर 'आपकें पास जो बर्च्चे आते है वो बिगडे हर्भे बच्चे होते है। हमारे बच्चे स्कूल नहीं जाते ना!' समोसे है, उसमेसे नौ खतम हुए तो कितने बाकी रहे? जर घरात रोजच्या जेवणाची भ्रांत असेल तर त्यांना हा सामोश्यांचा प्रश्‍न का दिला असेल, असा प्रश्‍न आम्हाला पडला; पण नंतर असे कळले की त्यांच्यापैकी बरीच मुले सामोश्यांच्या गाडीवर काम करतात. या चार-पाच तासांच्या वर्गाच्या शेवटी एकाच मुद्याला जोडून भाषा, विज्ञान, गणित हे तिन्ही विषय वेगवेगळया माध्यमांतून मजेमजेत शिकून झाले होते. गटात न बसणारी मुले नंतर सामील होऊन त्यांचाही अभ्यास पूर्ण झाला होता. काहीजण मधेच उठून परवानगी घेऊन बाहेर गेले आणि थोड्या वेळाने स्वतःहून परतही आले. कोणत्याही शिक्षेची भीती किंवा कोणत्याही आमिषाचे आकर्षण नसताना! चार तासांनंतरही मुलांना परत जायचे नव्हते, यातच काय ते आले. फिरते ग्रंथालय ग्रंथालय म्हटले की डोळ्यासमोर येतात ती मोठी कपाटे, क्रमाने लावलेली पुस्तके, नोंदींची कार्डस, रजिस्टर्स, शांतता इत्यादी. मुस्कानचे ग्रंथालय थोडे वेगळे आहे. मुस्कानची ताई वस्तीत जाते. तिच्याबरोबर पुस्तके, खेळ, कात्री, सेलोटेप, डिंक, कव्हरसाठीचे कागद, कोरे कागद, रंग असे सगळे साहित्य सज्ज असते. ती एखाद्या झाडाखाली, रिकाम्या ओट्यावर किंवा मंदिरात जाते, बसण्यापुरती जागा स्वच्छ करते, चटई पसरते आणि तिथे चक्क मांडी ठोकून बसते. बरोबर आणलेली पुस्तके मांडते. एक-दोन मुलांना हाक मारली की बाकीची मुले आपोआप येतात. गंमत म्हणजे वाचता येणारी आणि न येणारी मुलेपण येतात, पालकही येतात. पुस्तकांना काठिण्यपातळीनुसार कलर कोडिंग केले आहे. त्यामुळे क्षमतेनुसार पुस्तके दिली जातात. ज्यांना वाचता येते आणि वाचनाची गोडी लागली आहे ती मुले आपल्याला हवे ते पुस्तक घेऊन वाचायला लागतात. मुलांना पुस्तक दाखवत ताई एखादी गोष्ट वाचून दाखवते, शब्दांचे अर्थ सांगत ते कथानक रंगवून सांगते. यातून मुलांची कल्पनाशक्ती तर बहरतेच पण नवीन पुस्तक घेऊन वाचण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. मुले वाचण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावर गप्पा होतात. काहीजण पूर्ण गोष्ट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now