त्यांगी पाहिलेला भारत | TYANNI PAHILELA BHARAT

TYANNI PAHILELA BHARAT  by के० सी० खन्ना - K. C. KHANNAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

के० सी० खन्ना - K. C. KHANNA

No Information available about के० सी० खन्ना - K. C. KHANNA

Add Infomation AboutK. C. KHANNA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आर्थिक परिस्थितीविषयी केवळ ओझरते उल्लेख फा-हिएनने केले आहेत; पण ते पुष्कळच उद्बोधक आहेत. “वस्त्या खरेदीविक्रीसाठी लोक कवड्या वापरतात. ” त्या काळी नाणी नव्हती असे नाही; पण बहुतेक वस्तू इतक्या स्वस्त असाव्यात की कवडयांवर भागत होते असे दिसते. “राजाचे शरीररक्षक व परिचारक या सर्वांना पगार मिळतो” यावरून असे दिसते की जमिनी इनाम देण्याचा प्रधात त्या काळी नव्हता. तो पुढे सुरू झाला. गौरवाने लिहिताना फा-हिएन कधी कधी फारच वाहवत जातो. भारतातल्या अहिंसेबद्दल लिहिताना तो म्हणतो, “सबंध देशात कोणीही प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा मद्यासारखी अमली पेये पीत नाही किंवा कांदा-लसूण खात नाही.” सवच लोकांच्या बाबतीत हे खरे असणे शक्‍य नाही; राज्यकर्ते व सरदार मंडळी यांच्या बाबतीत तर नाहीच. कारण त्यांना शिकारीचा छंद असे हे आपल्याला माहीत आहे. “खाटकांची दुकाने नसतात आणि दारू विकणारे व्यापारीही आढळत नाहीत.” हे खरे असले तरी चांडाळ व अस्पृश्य हे शिकार करीत आणि मांसही विकीत हे खुद्द फा-हिएनने मान्य केले आहे. अस्पृश्यता सक्तीने पाळली जाई. अस्पृश्य हे समाजाचे अत्यंत नीच घटक मानले जात. चांडाळ हे शहराबाहेर राहात. आणि “वेशीत प्रवेश करताना किंवा बाजारात शिरताना ते काष्ठ वाजवून आपल्या आगमनाची ग्वाही देत; त्यामुळे लोक लगेच बाजूला होत, त्यांचा संपर्क टाळीत.” भारतातला मुक्काम पुरा केल्यावर फा-हिएन ताम्रलिप्तीह्ुन लंकेला जायला निघाला. या जलतप्रवासाला त्याला चौदा दिवस लागले. सिंहलद्वीपात तो दोन वर्षे होता; मग चीनकडे परतला. आपल्या परतीच्या प्रवासाचे चित्र त्याने इतक्या समर्थपणे रंगविले आहे की त्यावरून वाटेतल्या संकटांना त्याने किती धैर्याने तोंड दिले त्याची कल्पना येते. 28 “ ही मंडळी पूर्वेकडे निघाली तेव्हा तीन दिवस वारा अनुकूल होता. मग अचानक जोराचा वारा वाहू लागला. जाहजाला फट पडली आणि पाणी आत येऊ लागले. व्यापाऱ्यांच्या मनात आते की आता छोट्या नौकेवर आश्रय घ्यावा. पण त्या नौके- - वरच्या लोकांना भीती वाटली की जास्त माणसे येतील आणि नौका बुडेल. त्यांनी मधला जोडणारा दोर तोडून टाकला. व्यापारी अतिशय घाबरले. आपण आता मरणार अशी त्यांची खात्री झाली. जहाजात आणखी पाणी भरू नये म्हणून आपला जड माल उचलून त्यांनी भराभरा पाण्यात फेकला. फा-हिएनने पण आपली सुरई व हात धुण्याची थाळी तसेच आणखी काही वस्तू उचलल्या आणि समुद्रात टाकल्या... .समुद्रावर (या भागात) चाचे लोक फार. त्यांच्याशी गाठ म्हणजे मृत्यूशीच गाठ. अमर्याद सागर पसरलेला आहे. पूर्व कोणती कळत नाही. सूर्य, चंद्र व तारे यांच्याकडे पाहातच पुढे जायचे. हवा काळोखी व पावसाची असली की (जहाज) वाऱ्याबरोबर ते कुठेही भरकटत जाई. निश्‍चित मार्ग असा राहिलाच नव्हता. रात्रीच्या अंधारात फक्त लाटा दिसत. त्या एकमेकीवर आदळत आणि ल्यांच्यातून अग्नीसारखे तेज निघे. अवाढव्य कासवे आणि इतर सागरी राक्षस (सववत्र) धिंगाणा घालताना दिसत. ब्यापारी भयभीत झाले होते. आपण कुठे चाललो आहोत याचा यांना पत्ताच नव्हता. समुद्राची खोली अपार होती. नांगर टाकण्यासारखी जागा कोठेही. आढळत नव्हती. पण मग जेव्हा आकाश निवळले तेन्हा त्यांना पू्रे-पश्‍चिम कळू लागली; आणि (जहाज) योग्य दिशेने माग आक्रमः लागले. दरम्यान एखाद्या लपलेल्या खडकावर जर ते आदळले असते तर मरणाशिवाय दुसरा मागे नव्हता.” फा-हिएनच्या वृत्तांताचा पुष्कळछता भाग जरी बुद्धाच्या तीर्थस्थळांना वाहिलेला असला तरी त्याने सहज केलेल्या उल्लेखांवरून सुद्धा आपल्याला पाचव्या शतका- ' तल्या भारताबद्दल बहुमोल माहिती मिळते. गुप्त सम्राटांच्या सौम्य राजवटीत देशाला शांतता व समृद्धी लाभलेली होती. गुन्हेगारी जबळजवळ नव्हतीच. एकंदर 29




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now