पक्षी जगत | PAKSHI JAGAT

PAKSHI JAGAT  by जमाल आरा - JAMAL AARAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जमाल आरा - JAMAL AARA

No Information available about जमाल आरा - JAMAL AARA

Add Infomation AboutJAMAL AARA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अन्नपुरवठा, संरक्षण, पात्रता आणि सवयी यावर भिन्न भिन्न जातींच्या पक्ष्यांचे अंडे घालणे अवलंबून असते. काही पक्षी एकच अंडे घालतात, काही दोन, तर काही चार. गरुड एक ते चार, बदके पाच ते सोळा आणि बष्गुली पक्षी चार ते सहा अंडी घालतात. जे पक्षी जमिनीवरच राहतात, ज्यांना वेताचे उडता येते आणि ज्यांना संकटाचा धोका जास्त असतो ते पक्षी सर्वसाधारणपणे वीस अंडी घालतात. पुष्कळशा माद्या घरट्यांत अंडी घालतात. अंड्यांच्या कवच्यांचा रंग आणि त्यावरील ठिपके ह्यामुळेदेखील त्यांचे उत्तम संरक्षण होऊ शकते. सुतार, खंड्या, पोपट आणि घुबड यांची घरटी बंदिस्त असतात, त्यामुळे त्यांना सरंक्षक रंगाची गरज नसते. त्यांची अंडी पांढरीशुभ्र असतात. शिवाय अंधारातसुद्धा नरमादीला आपली पांढरी अंडी पटकन दिसतात. परंतु जी घरटी उघडी असतात तेथील अंड्यांना सभोवतीच्या वातावरणाचा रंग असतो. त्यामुळे शत्रूला ती सहजासहजी ओळखता येत नाहीत. पुष्कळशी अंडी, धुरकट, हिरवी, निळी, तपकिरी, जांभळी, किंवा गुलाबी रंगाची असतात पुष्कळशा अंड्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत किंवा चकचकीतसुद्धा असतो. काही अंडी एकदम लखलखीत दिसतात, तर काही खडबडीत आणि ठिसूळ असतात २ नर किंवा मादी अंड्यांना उष्णता देण्यासाठी त्यावर बसते. पुरेशी उष्णता मिळावी म्हणून अंडी उबविणारे पक्षी आपल्या पोटाजवळची पिसे गाळतात. पोटावर जरुरीप्रमाणे अशी मोकळी जागा एक ते चार ठिकाणी असू शकते. त्याला अंडी उबविण्याची जागा असे म्हणतात. अशा जागेशी अंडी व्यवस्थित चिकटतील याची खबरदारी घेऊन पक्षी अंडी उबवितात. अन्न शोधण्यासाठी पक्षी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा अंड्यांना जो गारठा लागतो तो बाधक ठरत नाही. लहान पक्ष्यांना कमीत कमी अकरा दिवस आणि मोठ्यांना जास्तीत जास्त परेशी दिवस आपली अंडी उबवायला लागतात. कीडमुंगी खाणारे मृदू चोचीचे पक्षी आणि बीज खाणारे कठीण चोचीचे पक्षी, आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधण्याकरिता पहाटेपासून ते अंधार पडेपर्यंत कष्ट करीत असतात. थोडे चावून हलके केलेले अन्न काही पक्षी आपल्या पिल्लांना भरवितात. कबुतरांची पिल्ले आपल्या चोची आईच्या तोंडात खुपसून “कबुतराचे दूध' घेत असतात. हे अन्न चावून अंशतः पाचकः बनविलेले असते आणि अंशतः 'त्यात पक्ष्याच्या पोटातील साव मिसळलेला असतो. 'पेट्रल' नावाचा समुद्रावरील एक पक्षी, मासा खाताना माशाचे तेल लपवून वेगळे ठेवतो आणि ते आपल्या पिल्लांना भरवितो. कशा का रीतीने होईना, पण पिल्लांना भरविणे हे मोठे कटकटीचे व कष्टाचे काम आहे खरे. आणि पिल्ले मोठी होऊन स्वतःचे पाहू लागेपर्यंत हे काम पक्ष्यांना करावेच लागते. चिमणी, चंडोल आणि सारिका हे पक्षी जेव्हा जन्मतात तेव्हा त्यांचे डोळे मिटलेलेच असतात. त्यामुळे ते अगदीच असहाय्य असतात. त्यांना आपले घरटे सोडून जाण्याइतपत शक्‍ती यायला एक आठवडा किंवा जवळजवळ पंधरवडाही लागतो. तर बदकाची, कोंबडीची, प्लवर आणि इतर पक्ष्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर येतानाच मऊ परांचा जाड कोट घालून येतात. अंडे फोडून बाहेर येताच ती पिल्ले घरटे सोडतात, आपले अन्न टिपतात, पळतात व पोहतात सुद्धा! मोठ्या धाडशीपणाने शत्रूवर हल्ला करून पक्षी आपल्या पिल्लांचे संरक्षण करतात. एक लहानसा बुलबुल जोरदारपणाने एका घारीला पळवून लावीत असताना मी पाहिले आहे. संकट जवळ आले की पक्षी सावध राहण्याची सूचना एकमेकांना ओरडून देतात त्यामुळे पिल्ले चटदिशी आईच्या पंखांचा आश्रय घेतात. पे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now