गोष्टींना इतिहास असतो | GOSHTHINA ITIHAS ASTO

GOSHTHINA ITIHAS ASTO  by जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANEपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANE

No Information available about जे० बी० एस० हाल्डेन - J. B. S. HALDANE

Add Infomation AboutJ. B. S. HALDANE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मला अवशेष मिळतात गेल्या महिन्यात कोल नावाच्या मासिकात मी एक लेख लिहिला होता. त्या लेखात, एका विशिष्ट प्रकारचे जीवाश्म मिळाल्यास पाठवून द्या, असे मी खाणकामगारांना आवाहन केले होतें. त्याला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या अवशेषांबद्दल काही सांगण्यापृर्वी, कोणत्या प्रकारचे अवशेष मला हवे होते आणि का हरे मी सांगणार आहे दोन वेगवेगळ्या कारणांकरता अवशेष महत्त्वाचे ठरतात. त्या अवशेषांवरून त्या काळात कोणत्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती अस्तित्वात होत्या, आणि त्यांची उत्क्रांती कशी झाली याची आपल्याला कल्पना येते हे एक. दुसरं म्हणजे त्या अवशेषांवरून दगडांच्या स्तरांचे वय आपल्याला टरवता येते. दोन स्तरांमध्ये जेव्हा एकाच प्रकारचे अवशेष मिळतात तेव्हा हे स्तर साधारण एकाच काळात तयार झालेलें असतात. दगडांच्या घडामोडींच्या मानाने सजीवांची उत्क्रांती वेगाने घडन येते. पाच लाख वर्षांत सजौवांच्यात घडलेले फरक, (फार महत्त्वाचे नसले तरी) स्पष्ट दिसू शकतात, तर दगडांचा साधारण ३४० मोटर स्तर तयार व्हायला १० लाख वषें लागतात, कधी त्याहूनही अधिक. जुन्या नाण्यांचा अभ्यासक त्या नाण्यांचा उपयोग करून धातुशा्त्राचा विकास आणि ऱ्हास यांचा आणि कारागिरीचा अभ्यास करतो किंवा कालनिश्चितीकरताही त्या नाण्यांचा उपयोग करून घेतो. सॉमरसेट प्रांतातल्या 'वूकी होल' या गुहेत काही नाणी मिळाली. ही नाणी रोमच्या वेगवेगळ्या १७ राजांच्या काळात पाडलेली होती. त्या ३० / गोष्टींना इतिहास असतो सर्वांचा काळ इसवी सनाच्या सुमारे ६० ते ३९२ या वर्षांत होता. तेव्हापासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत मात्र त्या भागात काही मिळाले नाही. याचा अर्थ असा होतो की, त्या प्रदेशात इ. स. ४०० पर्यंत लोक रहात होते. कदाचित रोमचे सँन्य मागे परतत असतान! लोकांना जो त्रास झाला त्यामुळे निर्वासित झालेले लोक तिथे वस्ती करून असतील. पण सँॅक्सन किंवा मध्ययुगीन काळात त्या प्रदेशात तिथे वस्ती नव्हती. माझे दोन मित्र पुराजीवविज्ञानाचे अभ्यासक आहेत त्यांच्याकरता कोळशांच्या स्तरातले काही अवशेष मिळवण्याच्या प्रयत्नात मी आहे. त्यांना कालनिश्चितीकरता अवशेष नको आहेत, त्यांना त्या अवशेषांचा अभ्यास करायचा आहे. काल ठरविण्याकरता सर्वसामान्यपणे मिळणाऱ्या अवशेषांचे निरीक्षण केले तरी पुरेसे असते. आणि असे सर्वसामान्यपणे मिळणारे अवशेष हे शिंपल्यातल्या प्राण्यांचे असतात कोळशाच्या स्तरातले या प्रकारचें अवशेष सगळ्यांना परिचित असतात. त्यांचे आणखी एक महत्त्व असते, ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे पण एका प्रकारचे कोळशाचे स्तर मिळवायला त्यांची मदत होते. वनस्पतींचे अश्मीभूत अवशेषही सर्वांना माहीत असतात. एक तर, तसले अवशेष विपुल प्रमाणावर मिळतात. कोळशांच्या स्तरत वनस्पतींचे अवशेष मिळणं हे स्वाभाविकच आहे. दुसरं म्हणजे कोळसा कसा तयार झाला यावर ते अवशेष प्रकाश टाकतात. आणि त्याच कारणाने त्यांचा अभ्यास होत असतो. पण माझ्या मित्रांना मासे आणि उभयचरांचे दात किंवा हाडे असे अवशेष हवे आहेत. त्यांच्यावरून त्या प्रकारच्या प्राण्यांची बरीच माहिती कळ शकते. त्या दृष्टीने कालवांसारखे शिंपल्यात रहाणारे प्राणी कुचकामाचे ठरतात. माशांचे किंवा उभयचरांचे अवशेष विकत घ्यायला मी तयार आहे, मात्र ते अवशेष कुठे मिळाले हे स्पष्ट नमूद केलेले असले पाहिजे. काही महत्त्वाचे अवशेष मिळाले तर त्यानुसार आणखी शोध घेता येईल, माझ्याकडे आलेली पहिली पार्सले ही केवळ वनस्पतींच्या अवशेषांनी भरलेली होती. त्यात थोडे काही शिंपल्यातले प्राणी होते. अजूनपर्यंत हाडाचा एकही अवशेष माझ्याकडे आलेला माही. खेकड्यासारखा दिसणारा एक मोहक प्राणी मिळाला आहे. एखाद्या मोठ्या आकाराचा लाकूड पोखरणारा किडा असावा तसा तो दिसतो. विंचू किंवा कोळ्यांशी त्याचे नाते आहे. हा अवशेष मी एखाद्या संग्रहालयाला जरूर विकेन आणि त्याची जी किंमत येईल ती मी तो अवशेष पाठवणाऱ्याकडे पोहोचती करेन. पण त्याला एका पौंडाहून अधिक किंमत येईल असे वाटत नाही. ज्यांनी अवशेष पाठविले आहेत त्यांच्यापैकी एकाला त्यांच्यासंबंधी काही माहिती असावी असं दिसते, त्याला महत्त्वाचा अवशेष मिळू शकेल. कालवांना (इंग्रजीत) शिंपल्यातले मासे म्हणत असले तरी कालवांच्या शिंपल्याला मी पैसे देत नाही त्यामुळे गोष्टींना इतिहास असतो / ३१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now