मोठी धरणे | MOTHE DHARNE

MOTHE DHARNE  by पराग चोलकर - PARAG CHOLKARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

पराग चोलकर - PARAG CHOLKAR

No Information available about पराग चोलकर - PARAG CHOLKAR

Add Infomation AboutPARAG CHOLKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२४ मोठी धरणे प्रमाण घटते. युनेस्कोच्या एका अध्ययनाचा असाच अभिप्राय आहे. पाण्यातील तणामुळे सूर्यप्रकाश अडतो, याचाही प्रतिकूल परिणाम होतो. या तणाला अडकून कोळ्यांची जाळी फाटतात. धरणासोबत त्या भागाचा 'विकास' होतो. स्वस्त वीज व पाणी यांच्याकडे आकृष्ट होऊन उद्योग उभारले जातात. सिंचनामुळे उसासारखे व्यापारी पीक घेण्याकडे कल वाढतो. उसासारख्या व्यापारी पिकाखालील क्षेत्र वाढते व साखरेसारखे प्रक्रिया-उद्योग सुरू होतात. त्यांच्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते. माशांना ते घातक ठरते. सिंचन वाढते तसा कीटकनाशकांचा वापरही वाढतो. परिणामी पाणी विषारी होते. कीटकनाशके व कारखान्यांतून बाहेर पडणारे विषारी पदार्थ यांमुळे काही नद्यांमध्ये तर मासे औषधालाही उरले नाहीत. धरणाचा परिणाम अशा रीतीने एकूण मत्स्योत्पादन घटण्यातच होतो. धरणामुळे प्रथिनांच्या उपलब्धतेवर काय परिणाम होतो याचा युजीन बालोन यांनी अभ्यास केला. धरण बांधण्यापूर्वी नदीत मिळणाऱ्या माशांचे प्रथिन-मूल्य, धरणामुळे बुडणाऱ्या शेतजमिनीतील पिके व जंगलातील प्राणी व वनस्पतींपासून मिळणारे प्रथिन इ. गोष्टी हिशेबात घेता धरणामुळे उपलब्ध प्रथिनांमध्ये घटसुद्धा होऊ शकते असे त्यांचे मत पडले. ८. लाभक्षेत्रातील विपरीत परिणाम शेतजमिनींचे खारावणे व दलदलीकरण धरणात साठविलेले पाणी कालव्यांनी ज्या क्षेत्रात खेळविलेले असते त्या क्षेत्रात लोकांच्या पदरात लाभच लाभ पडतात, व तेही कायमचे, अशी साधारण समजूत आहे. शेतीला पाणीपुरवठा हा धरणप्रकल्पांचा सर्वात मोठा व महत्त्वाचा लाभ आज मानला जातो. नर्मदेवर जे सरदार सरोवर नावाचे महाकाय धरण बांधले जात आहे त्याने जवळपास १८ लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली येईल असा दावा केला जात आहे. पण धरणातून कालव्यांद्वारा पाणी खेळविण्याचे काही विपरीत परिणाम लाभक्षेत्रातही होतात असे नजरेला आले आहे. पिकांचे उत्पादन हमखास चांगले येण्यासाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात पाणी मिळणे फार उपयोगाचे असते ही गोष्ट निर्विवाद. पण योग्य वेळी व योग्य प्रमाणात या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. योग्य प्रमाण कशावरून ठरते? जमिनीचा पोत व प्रकार, पीक, हवामान या गोष्टी या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. जेव्हा पिकांना वरून, कृत्रिमपणे पाणी दिले जाते तेव्हा पाण्याचा निचरा होऊन जाण्याची योग्य व पर्याप्त व्यवस्था आहे की नाही ही गोष्ट निर्णायक महत्त्वाची ठरते. प्रत्येक प्रकारच्या जमिनीची स्वतःची म्हणून एक निचऱ्याची नैसर्गिक व्यवस्था त्या त्या स्थानिक क्षेत्रात आढळते. कृत्रिमरीत्या भरपूर प्रमाणात पाणी पुरविले जाते तेव्हा ही नैसर्गिक व्यवस्था पुरेशी ठरेलच असे नाही. निचऱ्याची कृत्रिम व्यवस्था करणे व ती सतत कार्यक्षण राखणे ही गोष्ट अवघड व खर्चिक असते. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला नाही तर दोन प्रकारांनी जमीन खराब होते. जमिनीत पाणी साचून राहिले तर जमिनीत दलदल माजते. जमीन पाणधळ बनली की तीमध्ये पिके घेणे शक्‍य ठरत नाही. जमिनीखालून जादा पाणी निघून गेले नाही व पृष्ठभागावरून बाष्पीभवन होत राहिले तर केशाकर्षणाच्या प्रक्रियेद्वारा वर येणाऱ्या पाण्यासोबत जमिनीतले क्षार पृष्ठभागावर येऊन तेथे साचत जातात. जमिनीला 'मीठ फुटते' व त्या नापीक बनतात. सलाईन व अल्कलाईन अशा दोन प्रकारे जमीन खारावली जाऊ शकते. जमिनीतील भूजल पातळी फार खाली जाणेही इष्ट नसते, तशीच ती फार वर येणेही इष्ट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now