प्रकाशसंश्लेषण | HOW DID WE FIND ABOUT PHOTOSYNTHESIS ?

HOW DID WE FIND ABOUT PHOTOSYNTHESIS ? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१/२५,000 इंच रुंद अशा सूक्ष्म फुटबॉलसारखा असतो. प्रत्येक पेशीत ते शेकडो पासून हजारोपर्यंत असू शकतात. १९३0 साली शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉन सूद्ष्मदर्शक बनवल्यानंतर नेहमीच्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे शक्‍य झाले. तंतुकालिकेची रचनादेखील खूपच गुंतागुंतीची असते हे त्यानंतर लक्षात आले. त्यात 'विकरे' (एन्झाइम्स) नावाच्या प्रथिनांच्या विशेष रेणूंची मांडणी असते. प्रत्येक विकर एका विशिष्ट प्रकारचा रासायनिक बदल घडवून आणतात. या सर्वांच्या एकत्रितरीत्या कार्य करण्याने अनेक बदल एकामागून एक असे घडून अखेर प्राणवायू व ग्लुकोजच्या संयोगातून रासायनिक ऊर्जा निर्माण होतें. तंतुकालिका हा पेशीचा सूक्ष्म भाग (ऑर्गनेल) जर वनस्पती व प्राणी या दोघांच्याही पेशीत असून त्यामुळेच श्‍वासोच्छ्वास शक्‍य होत असेल, तर प्रकाशसंश्लेषण होण्यासाठी वनस्पतींमध्ये आणखी एक निराळा भाग (ऑर्गनिल) असतो का? याचे उत्तर 'होय' असेच आहे. प्रकाशसंश्लेषणामुळे पिष्टमय पदार्थ बनतात हा शोध लावणाऱ्या ज्युलियस फाँन साक्स यानेच १८८३ साली असाही शोध लावला, की वनस्पर्तीमधील हरितद्रव्य संपूर्ण पेशीत पसरलेले नसते. पेशीतील एका किंवा अनेक भागांमध्येच ते सापडते. कालांतराने अशा भागांना 'हरितपेशी' अथवा हरितिलवके' (कलोरोप्लास्ट्स) असे नाव देण्यात आले. हरितपेशी तंतुकालिकेपेक्षा दोन किंवा तीन पटीने अधिक लांब व जाड असते. तिची रचना अधिकच गुंतागुंतीची असते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिले असता, हरितपेशींत अनेक सूक्ष्म घटक असतात व प्रत्येकात २५0 ते ३00 पर्यंत हरितड्व्याचे रेणू असतात असे दिसून आले. विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करणारी अनेक विकरेही त्यात असतात. रट । प्रकाश संशलेघण प्रकाश संश्लेषण । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now