अहिंसा दर्शन | Ahinsaa Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ahinsaa Darshan by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्‌ तरवारीचं तत्त्वज्ञान मक 4 आ. आ क हि ल खवळलेला दर्या असलेल्या सुरक्षित लंकेत रहाणार्‍या दशमुखी रावणाच्या उद्दाम शक्तीविंरुद्ध केवळ वानरसेनेच्या जोरावर लढायला रामासारखा सामान्य मानव तयार होतो, याचा अर्थ काय १ आत्मवलाने शरीरवळावर विजय मिळवला असाच नव्हे कां त्याचा अर्थ १ तेंहि जाऊं द्या, पण मी व्यवहाराच्या दृष्टीनें या तत्त्वाकडे पहात आल्यामुळें मला हिंदुस्थानला राजकीय बाबतींत आध्यात्मिक जीवनाची उपयुक्तता पटेपर्यंत वाट बघायची नाहीं. इंग्रजाच्या तोफा, रणगाडे व विंमानें यांच्यापुढे आपण दुबळे आणि अगतिक आहोंत असें आज हिंदुस्थानला वाटतें आणि म्हणूनच आपल्या दुबळेपणामुळें तो अहिंसेचा अंगीकार करतो. तरीदेखील त्याचा उद्दिष्ट परिणाम व्हावयाचा तोच होईल; ब्रिटिशांच्या अन्यायाचे असह्य दडपण व्यामुळें दूर होऊं शकेल. मात्र पुरेशा जनतेनें आहसेचा अंगिकार केला पाहिजे. अत्याचारी चळवळीपेक्षां ही चळवळ मी वेगळीच समजतो; दोहेची भेंसळ करून चालणार नाहीं. स्वभावतः ही चळवळ दुबळी नाहीं; म्हणूनच ती फसली, तर लोकांनीं तिंचा अंगीकार करण्यांत कुचराई केल्यामुळेच फसेल; पण ती फसली तर मात्र मग खरा थोका निमाण होईल. हा राष्ट्राचा अपमान सहन न झाल्यामुळें कांहीं थोर पुरुष क्रोधाविष्ट होऊन हिंसेचा अंगिकार करतील. हिंदुस्थाननें तरवारीचें तत्त्वज्ञान अँगिकारलें तर त्याला क्षणिक विंजय मिळतील देखील, पण तेव्हां मला हिंदुस्थानचा अभिमान वाटणार नाहीं. त्यानें आंधळेपणाने युरोपची नक्कल करून चालणार नाहीं. हिंदुस्थाननें तरवारीचें तत्त्वज्ञान अंगिकारले तर ती माझी अभ्निपरीक्षेची वेळ असेल, पण मी माझे कर्तव्य करायला चुकणार नाहीं या अग्निदिव्यांतून मी पार पडेनच अशी मला आदा वाटते. माझ्या धर्माला भौगोलिक मर्यादा नाहींत. जर माझ्यांतला विश्वास अढळ असेल तर माझ्या हिंदुस्थानवरल्या प्रेमाची भीड न पडता देखील तो टिकाव धरील. हिंदुस्थानच्या सेवेसाठींच मी माझें जीविंतसवंस्व वाहिलेलें आहे, पण ती सेवा मला मझ्या अहिंसाधमनेिंच करायची अहे. यंग इंडिया-११-८-१९२०.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now