स्वामी विवेकानन्द यांचे समग्र ग्रंथ | Swami Vivakanand Yanche Samagra Granth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वामी विवेकानन्द यांचे समग्र ग्रंथ  - Swami Vivakanand Yanche Samagra Granth

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खंड ] एक उघडे रहस्य. ११ न युण्यं न पापं न सोख्यं न दुःखम्‌। नमसंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः ।।. अहं भोजनं नव भोज्यं न भोक्ता । चिदानंदरूपः शिवोडहं शिवो$हस ॥१* शरीर कोणत्याही अवस्थेंत असो; मन कसेंही शतथधा विदीर्ण झालेलें. असो; सभोंवतीं कितीही गडद अंधकार पडलेला असो; अथवा परिस्थिति. कितीही निराशाजनक असो; हा मंत्र एकदां, दोनदां, तीनदां सहखवेळां म्हणत जा, म्हणजे प्रकाशाची प्राप्ति होईल. हे किरण फार हळू हळू प्रवास. करीत असतात; पण केव्हां ना केव्हां तरी ते आपल्यापर्यंत येऊन पोंहों . चतील. 3 र अगदीं रृत्युमुखांत जाण्याचे असे किती तरी प्रसंग मजवर आले. अन्न - पाण्यावांचून दीघेकाल काढण्याचे प्रसंग मीं पाहिले. चालतां चालतां माझ्या. पायाच्या चाळणी व्हाव्या, दिवसचे दिवस अन्नाची गांठ पडूं नये, आणि थकवा. तर इतका यावा कीं पुढें पाऊलसुद्धां टाकण्याची शक्ति मला उं नये. असे _ झाले म्हणजे एखाद्या झाडाखालीं मी अंग टाकीं. आतां आपल्या आयुष्याची. अखेर खास होते असें मला वाटे. बोलण्याची शक्ति माझ्या अंगीं अशा वेळीं. क्रोठून राहणार १ अखेरीस माझी विचारशक्तिही थांबे. इतकें झालें. तरी. शेवटीं मन पुन्हां उलट खाऊन “न मे म्ृत्युशयंका? हा जप जपू लागे.. ही सारी सृष्टि माझ्याविरुद्ध एकवटली तरी काय होणार १ ती मला. चिर शकत नाहीं; कारण ती माझ्या घरची दासी आहे. हे देवाधि- देवा, तू॑ आपलें सामर्थ्य प्रत्यक्ष प्रत्ययास आण. तुझें नष्ट झालेलें साम्राज्य: तं पुन्हां मिळव. उठ, उभा रहा आणि मुक्कामाला पों्रेंचेपर्यंत वाटेत कोठेही थांबू नको. या विवारांनीं मी ताजातवाना होई, माझ्या चित्ताला नवा दम येई. अनेक भयंकर प्रसंगांतून मी जगलों आणि आज तुमच्या सेवेस हजर आहें याचें श्रेय याच विचारश्रेणीला आहे. याकरितां ज्या ज्या वेळीं- तुम्हांस ,संकटसमय प्राप्त होईल त्या त्या वेळीं हा मंत्र जपत जा, म्हणझे. सारीं संकटे नाहींशीं होतील. असें होणें हं रीतसरच आहे; कारण वस्तुस्थिति. अक्षी आहे कीं जीवित हें स्वप्न आहे. अडचणी पर्वतप्राय भासल्या आणि _ भोंवताल्ची परिस्थिति कितीही भयंकर आणि निरादहोची दिसली तरी ती शुद्ध माया आहे. तिला तुम्ही भिऊं नका, म्हणजे ती ताबडतोब पळ काढील. तिच्या डोक्यावर पाय द्या म्हणजे तिचा चक्काचूर होईल. तुमच्य!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now