तोत्तोचान | Tottochaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tottochaan by चेतना सरदेशमुख गोसावी - Chetana Sardeshmukh Gosaviतेत्सुको कुरोयानागी - Tetsuko Kuroyaanaagi

More Information About Authors :

चेतना सरदेशमुख गोसावी - Chetana Sardeshmukh Gosavi

No Information available about चेतना सरदेशमुख गोसावी - Chetana Sardeshmukh Gosavi

Add Infomation AboutChetana Sardeshmukh Gosavi

तेत्सुको कुरोयानागी - Tetsuko Kuroyaanaagi

No Information available about तेत्सुको कुरोयानागी - Tetsuko Kuroyaanaagi

Add Infomation AboutTetsuko Kuroyaanaagi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तोत्तोचान पंधरा या संपादकाचं नाव. जेव्हा त्याच्या विचाराला मूर्त रुप मिळालं तेव्हा तो एक संचालक झालेला होता. पुस्तक लिहिण्याचा विचार मी कधी केलाच नव्हता. तोवर मी फार काही लिहिलं नव्हते आणि त्यामुळे एक पूर्ण पुस्तक लिहिण्याचा विच्छर भीतीदायक वाटत होता. पण कातोंनी माझा आत्मविश्‍वास खूपच वाढवला, सरतेशेवटी दरमहा एक प्रकरण लिहिण्यास मला करारबद्ध केले गेले. आणि अखेर 1979 ते 1980 च्या दरम्यान कोदांशाच्या 'यंग वुमन” या मासिकातून तोत्तौचानची प्रकरणं क्रमश: छापली गेली. त्याच काळात मी तोक्योमधील 'चिहिरो इवासाकी म्युझियम ऑफ पिक्चर बुक्स' मध्ये दर महिन्याला एक चित्र निवडण्यासाठी जात असे. लहान मुलांची चित्र काढण्यासाठी चिहिरो इवासाकी प्रसिद्ध आहे. मुलांची इतकी जिवंत चित्रं क्वचितच कोणी रेखाटली असावीत. मुलांच्या भावविश्‍वातील असंख्य छटा त्यांनी जिवंत केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे माझ्या पुस्तकातील वर्णनांशी ही चित्र इतकी बेमालूम जुळतात की जणू ती वर्णन समोर ठेवून काढली असावीत. वास्तविक हे पुस्तक लिहिण्याआघी 1974 मध्येच चिहिरो इवासाकींनी जगाचा निरोप घेतला होता. चिहिरो इवासाकींच्या सात हजार चित्रांमधून चित्रं निवडायला मदत करण्याबद्दल त्यांचा मुलगा, सून आणि चित्राच्या वापराची अनुमती दिल्याबद्दल त्यांचे पती यांची मी आभारी आहे. या चित्र संग्रहालयाचे संरक्षक तादासु इजावा यांचीही मी आभारी आहे. पुस्तक लिहीत असताना श्री तादासुंनी माझा आत्मविश्‍वास वाढविण्यास खूप मदत केली. या संग्रहालयाची आज मीही एक विश्‍वस्त आहे. मियोचान आणि तोमोईतील इतर सहकार्यांनी मला खूपच मदत केली. पुस्तकाच्या जपानी आवृत्तीचे संपादक केड्को इवामोतो नेहमी म्हणत '“आपल्याला याचं खरोखरच एक सुंदर पुस्तक करायचं आहे.'' मी त्यांची आभारी आहे. काही वर्षापूर्वी एक वाक्क्‌प्रचार प्रचलित होता. एखादा जर त्याच्या मूळापासून तुटला असेल म्हणजेच अधांतरी आयुष्य जगत असेल तर त्याला 'तो खिडकीशी उभा आहे' असं म्हणत. लहानपणी मी बँडवाल्यांची वाट बघत खिडकौशी उभी असे हे खरंच पण त्या वर्गात मीही अशीच होते. 'अधांतरी', इतरांपासून वेगळी, रुजायला स्वत:ची मुळंच नसल्यासारखी. या पुस्तकाचं नाव मला या वाकूप्रचारावरून सुचलं. पण याला आणखी एक अर्थ आहे. आनंद आणि उत्साहाची अशी एक खिडकी जी माझ्यासाठी तोमोईने उघडली. तोक्यो, 1982 श्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now