नवयुगधर्म 1 | Navayugadharm 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navayugadharm 1 by सदाशिव कृष्ण फडके - Sadashiv Krishn Fadake

More Information About Author :

No Information available about सदाशिव कृष्ण फडके - Sadashiv Krishn Fadake

Add Infomation AboutSadashiv Krishn Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ९ चार्य यांच्या श्रेष्ठतर वेदान्त भूमिकेचा मीं आधार घेतला आहे. तथापि संपादकाचे कर्तव्य प्रामाणिकपणें बजावीत असतां कोठें वेदान्त मतांबद्दल अभिनिवेश व त्यामुळें कोठे परमतांबद्दल निष्कारण अनादर लेखणीतून उतरला असला, किंवा टीकेच्या बोळलेल्या शाईत लेखणी जास्त बुडल्यामुळें थोरामोठधांच्या चारित्र्यावर अनाठार्यी शिंतोडा उडाला असला तर ह्या इस्त- दोषांबद्दल त्या थोर स्त्री-पुरुषांची व त्यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या वाचकांची मी मनःपूर्वक माफी मागतो. अशा रीतीचा ग्रंथ मराठी वाड्मयांत अद्याप कोणीं लिहिलेला नसावा असें वाटतें, ह्या अपूर्वतेशिवाय ह्या ग्रंथाची स्वतंत्र योग्यता व उपयुक्तता किती आहे हे भविष्यकालच ठरवील, ब्राह्मसमाज ही संस्था जरी विशेष लोकप्रिय नसली तरी या संस्थेशी आजच्या एकंदर सुशिक्षित वर्गाचे बरेच विचारसाइइ्य असण्याचा संभव आहे. या एकंदर कारणांस्तव आधुनिकांचे धार्मिक विचार ह्या दृष्टीनें ईं पुस्तक मराठी वाचकांस उपयुक्त व मनोरंजक वाटेल अशी उमेद आहे. ती खरी ठरून योग्य प्रोत्साहन मिळाल्यास पुढील खंडांत प्रार्थनासमाज, आर्यसमाज व थिओआसफी या सुप्रसिद्ध संस्थाचा असाच विवेचक इतिहास देण्याचा माझा विचार आहे, त्याच्या पुढील खंडांत गेल्या दोदीडही वष्रीतच आपल्या देशांत झालेल्या सनातन वेदिक धर्माभिमानी अशा साधुसंतांचें चारित्र्य व विचार येतील; आणि अखेरच्या खंडांत घ्मा- संबंधीं अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर तुलनात्मक विवेचन करून साधल्यास कांहीं विघायक सूचनाही करण्याचा संकल्प आहे. सत्यसंकल्पाचा दाता भगवाच आहे. तेव्हां ह्या संतोक्तीवर पूण विश्वास ठेवून ही प्रस्तावना पुरी करतो, वसई, श्रीशंकराचार्य पुण्यतिथि. । सदाशिव कृष्ण फडके मिति वैशाख शुद्ध १० शके १८४९ ह्या अ्रंथासंबंधी कोणास कांहीं पत्रव्यवहार करणं असेल तर त्यांनीं खालील पत्त्यावर करावा, सदाशिव कृष्ण फडके, वकील. पोस्ट पनवेल, जिल्हा कुलाबा,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now