आजपासून पन्नास वर्षानी | Aajapasun Pannas Varshani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aajapasun Pannas Varshani by कृष्णाजी केशव गोखळे - Krishnaji Keshav Gokhale

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी केशव गोखळे - Krishnaji Keshav Gokhale

Add Infomation AboutKrishnaji Keshav Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ही आजपासून पंन्नास वर्षांनी प्रकरण पहिलें. काय पण पोरींचा लाट आहे ! लग्न या शब्दापासून मनांत उत्पन्न होणारी कल्पना इतकी मोहक आहे, कीं, लहानापासून थोरापर्यंत सवानां ती अंतःकरणापासून अत्यंत प्रिय असते. मग ती तरुण व श्रीमंत अद्या माणसांनां फारच मोहून टाकीत असली पाहिजे असा जो सर्व जगाचा दृढ समज असतो, त्यांत आश्चर्य काय १ एकादा श्रीमंत तरुण माणुस जर आविवाहित आढळला, तर ती केवळ त्याच्या मनासारखी मुलगी अजून त्याच्या नजरेस पडली नाहीं म्हणूनच लग्नाचा राहिला आहे, व तशी योग्य मुलगी मिळाल्याबरोबर तो ताबडतोब लग्न करून घेईल, अशी सवाची खात्री असते. असला मनुष्य एकाद्या गांवांत जाऊन राहिला आणि त्याचे अजूत लग्न व्हायचे आहे असें जर समजलें, तर घरोघरीं मोठी चलबिचल सुरू होते, आणि ही शिकार कोणच्या मुलीच्या हातीं लागते, याविषयीं तर्क सुरू होतात. इतकेंच नाहीं, तर ती आपल्या हातीं लागावी म्हणून जारीन खटपट करण्यासाहिे प्रारंभ होतो. आनंदराव नगरंकर यांच्या पत्नी सीताबाई एके दिवशीं त्यांनां म्हणाल्या ६: ऐ.कळं का, एकदांचं आनंदभुवन कुणींसं भाड्यानं ठरवून घेतलं !” “ मीं नाहीं तें ऐकले, ” आनंदराव म्हणाले उ “ झे, पण तें खरंच घेतले ! ” सीताबाई म्हणाल्या, “ कारण, आत्तां इतक्यांत सारजाबाई येऊन गेली, तिनं मला सारं सांगितलं. ” आनंदराव कांहींच बोलले नाहींत. म्हणून सीताबाई *ुनः मोठ्या उत्सु- कतेनें म्हणाल्या “तें कुणी घेतलं ते समजण्याची नाहीं का आपल्याला इच्छा!” आनंदराव म्हणाले “आपल्या मनांतून सांगायचेंच आहे, तर ऐकायला आमची कांहीं हरकत नाहीं!” १७ क :




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now