मध्वाचार्य व त्यांचे तत्त्व ज्ञान | Madhwaachaarya Va Tyaanchen Tattv Gyan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
306
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रा. बा. अवधानी - Ra. Ba. Avadhaani
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मूतळावर अवतार रे
अंबुतीर्थ, परशुरामतीर्थ व गदातीर्थ अशी पांच तीर्थे असून खुद्द पाजक-
क्षेत्रांत भ्रीमध्वाचायानीं निर्माण केलेले वासुदेवतीर्थ या नांवाचें तीर्थ
आहे, या वासुदेवतीर्थाजवळच एका शिलेवर आचार्यांच्या पाउलांचे
ठसे उमटले आहेत. या पाजकक्षेत्राजवळच उदयावरम् नांवाच एक खेडे
आहे. तेथें आचार्यानीं आपल्या दंडानें निमाण केलेले एक तीर्थ आहे.
त्यास दंडतीर्थ असें म्हणतात, व यांतील पाणी, वाटेल तेवढा पाण्याचा
दुष्काळ पडला तरी आटत नाहीं असें तेथील जनता सांगते.
आचार्यांच्या वडिलांचे नांव “ मध्यगेहभट्ट ” असें होतें. कित्येकजण
आचार्यांच्या बडिलांचें नांव नारायणाचार्य असें होतें अस म्हणतात.
त्रिविक्रमपंडिताचार्याचे पुत्र नारायणपंडिताचार्य यांनीं “मणिमंजरी” या
नांवाचा काव्यग्रंथ रचला आहे. त्याच्या शेवटच्या ोकांतील
“ नारायणप्रोद्धवः ” या शब्दाचा अर्थ “ नारायणापासून उत्पन्न झालेले
मध्वाचाय त्यांचा विजय” असा कित्येक टीकाकार करतात. व त्यावरून
आचार्यांच्या वडिलांचे नांव 'नारायणाचार्य' असावें असं अनुमान कित्येक-
जण काढतात. मध्यगेहभट्ट तुलव ब्राह्मण असून सदाचारसंपन्न होते.
श्रीमध्वाचार्यांच्या मातेचे नांव “वेदवती' असं होतें. मध्वविजय-
कारांनीं त्यांच्या मातेचें नांव दिलें नाहीं. पण जगन्नाथदासांनीं एक
हरिकथामृतसार नांवाचा ग्रंथ रचला आहे त्यावरील टीकाकारांनी
श्रीमध्वाचार्यांच्या मातेचे नांव वेदवती असल्याविषयीं प्रमाण दिलें आहे.
उक्त च क्र्कूसंहितायां ...
वेदवत्याख्यभार्यायां तस्माज्जातो महाप्रभु: ॥
कित्येकांनीं आचार्यांच्या मातेचें नांव * रेणुका १ असे दिले आहे. पर्ण॑
त्याला आधार कांहींच नाहीं.
मध्यगेहाचार्य उफ नारायणाचार्य हे पाजकक्षेत्री येऊन राहण्याचे
अगोदर तेथूनच जवळच असणाऱ्या शिवबलछली या गांवीं राहून भारत,
भागवत इत्यादि पुराणकथनावर आपली उपजीविका करीत असत.
यहच्छालाभसंतुष्ठ राहून श्रीहरीची सेवा करीत आपला काळ घालविण्यांत
ते स्वतःला धन्य मानीत असत.
User Reviews
No Reviews | Add Yours...