कोळाहळ, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन | Kolaahal Apuurnamit Aani Svayansanghatan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kolaahal Apuurnamit Aani Svayansanghatan by अरविंद कुमार - Aravind Kumarचिंतामणी देशमुख - Chintamani Deshmukh

More Information About Authors :

अरविंद कुमार - Aravind Kumar

No Information available about अरविंद कुमार - Aravind Kumar

Add Infomation AboutAravind Kumar

चिंतामणी देशमुख - Chintamani Deshmukh

No Information available about चिंतामणी देशमुख - Chintamani Deshmukh

Add Infomation AboutChintamani Deshmukh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक 3 पडते. याउलट कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या पातळीवर सर्वत्र आढळून येतात. न्हाणीघरातील गळणारी तोटी कोलाहल स्थितीत असू शकते; आणि आपल्या श्‍्वसनसंस्थेतील श्‍वारानलिकांचे जाळे एक अपूर्णमित असतो. घराच्या बागेतील किड्यांच्या संख्येतील बदल कोलाहलीय असतात. आणि आपल्या घरी वा शेजारी जन्माला येणारे बालक म्हणजे निसर्गातील स्वयसंघटनाचे अप्रतिम उदाहरणच. हा विषय सर्वांनाच भिडणारा आहे. रूढ विज्ञानाने भौतिकी, रसायन, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूशात्र अशा औपचारिक विषयांच्या कप्प्यात निसर्गाचे विभाजन केले आहे. या कृत्रिम सीमारेषा नव्या विज्ञानात अस्तित्वात नाहीत. येथील मूलभूत मर्मदृष्टी सर्वच विषयांत सारखीच कामी येते. कोलाहल, अपूर्णमित आणि स्थयंसघटन यानी विज्ञानाचे एकत्रीकरण घडवून आणले आहे. अगदी खूप क्रांतिकारक वैज्ञानिक संकल्पनासुद्धा त्याचा प्रत्यक्ष शोध लागण्यापूर्वी विज्ञानजगताच्या वातावरणात इतस्तत: वावरत असतात. आइन्स्टाइन यानी स्वत:च म्हटल्याप्रमाणे सापेक्षतावादाची 'हवा' होतीच आणि त्यामुळे कोणी ना कोणी त्याचा शोध लावणारच होते, थोडे पुढे-मागे झाले असते एवढेच. याचप्रमाणे रूढ अभिजात भौतिकीत अणू, रेणू आणि प्रारण या क्षेत्रांत अनेक अडचणी व प्रश्‍न निर्माण झाले होते, परस्परविरोधी गोष्टींचा ताळमेळ बसत नव्हता व त्यामुळे एका नव्या सिद्धान्ताची हवा सर्वत्र होतीच. अखेर बर्‍याच वेड्यावाकड्या कठीण मार्गाने पुंजसिद्धान्ताचे अंतिम स्वरूप पुढे आले. याचप्रमाणे कोलाहल आणि अपूर्णमित यांचा शोध केव्हातरी लागणारच होता. संगणकाच्या आगमनाने तो अपरिहार्य बनला. विज्ञानातील कत्येक समीकरणे योग्य विश्लेषणात्मक साधने व पद्धती उपलब्ध नसल्याने तशीच पडून होती. संगणक आल्यावर ह्या समीकरणाची आकडेमोड करून त्यांचा मागोवा घेणे, विविध पैलू धुंडाळणे, त्यांची अंतर्गत रचना शोधून काढणे या गोष्टी एकाएकी आवाक्यात अगल्या. एरी म्रहिने वा वर्षेही लागली असती अशी आकडेमोड करणे आणि आलेख बनविणे ही कामे संगणकावर मप्रिनिटे आणि तासाच्या कालावधीत होऊ लागली. यामुळेच खरा फरक घडून आला. कधीकधी विज्ञानातील भव्य व महान संकल्पना आपल्याला दिपवून टाकतात, अवाक्‌ करून सोडतात. पण तो विश्‍्वदर्शन सोहळा संपला की आपण तसेच पूर्वीसारखेच राहतो. परंतु कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन हा विषय मात्र वेगळा आहे. यातील दृष्टिकोन खूप सखोल आहे, पण व्यावहारिक पातळीवरचाही आहे. त्यामुळे आपल्या निसर्गाकडे बघण्याच्या मूलभूत दृष्टीतच बदल घडून येतो आपल्याला जगाचे दर्शन एका वेगळ्या नवीन प्रकाशात घडते.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now