आमची जात | Amchi Jat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image :  आमची जात  - Amchi Jat

More Information About Author :

No Information available about गणपत राव भिवाजी - Ganpatrav Bhivaji

Add Infomation AboutGanpatrav Bhivaji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[१५] आर्टस स्कूल मध्येंहि गेलीं होतों. त्या वेळीं तेथें आमच्या जातीचे कै० लाला रामब- क्सजी बालोट्या हे डाईंग मास्तर होते. यांनीं शिल्पशाख्रावर अनेक लोकमान्य पुस्तकें तयार केलीं आहेत. हा त्यांचा सुलीकिक मी फारा दिवसांपासून ऐकून होतों, ह्मणून मी त्यांची मुद्दाम भेट घेतली. मी त्यांचा आपल्या जातीचें मूळ, कूळ, नांव, उद्योग वगरेसंबंधानें बरेच प्रश्न विचारले. या माझ्या प्रश्नांसंबंधानें त्यांनीं मला असें उत्तर दिले कीं, अशा प्रकारच्या माहितीचा ग्रंथ अद्याप माझ्या अवलोकनांत आला नाहीं किंवा मला त्यासंबंधानें कांहींच माहिती नाहीं. शेवटीं त्यांचीं मलाच अशी शिफारस केली कीं, जर कोणी अशा प्रकारच्या माहितीनें भरलेला ग्रंथ तयार करील, तर त्याचे आपल्या अज्ञानी व सर्वोपरी मागसलेल्या ज्ञातीवर महत्‌ उपकार होणार आहेत. त्यांतून आपल्यासारख्या लक्ष्मीसरस्वतीच्या कृपेंतल्या शोधक गहस्थानें मनावर घेतल्यास विशेष चांगलें होणार आहे. परंतु हे ग्रहस्थ आज हा प्रेथ पाहण्यास नाहींत, हवें पाहून मला वाइट वाटत आहे तसेंच सुंबईतील परलोकवासी श्री. शेट सितारामजी लक्षुमणजी कुकडवाळ (किनारीवाळ), कंट्राक्टर सिताराम बिल्ंडिंगचे मालक, हे नेहमीं मजजवळ असे उद्गार काढीत असत कीं, “ आपण क्षत्रिय असून आपल्या जातीस कुंभार हॅ विशेषण लागलें, यांतील घोटाळा काय आहे, तो मला बिलकूल कळत नाहीं. तो कोणी जर पुस्तकरूपानें काहून टाकील तर बरें होणार आहे.? पण हेही ग्रहस्थ आज हा ग्रंथ पाहण्यास हयात नाहींत याबद्दल मला फार दिलगिरी वाटत आहे पुण्यांतील कैलासवासी श्रीमंत काळुराम भाऊ मनसारामजी धवारे चौधरी हे गर्भश्रीमंत होते; ते लोकप्रिय असून त्यांची गणणा सरदारांमध्यें होत असे. हें आनररी म्याजिस्ट्रेट, म्युनिसिपाल कमिशनर व बर्‍याच लोकोपयोगी संस्थेचे प्रेसिडेन्ट व मँबर होते.यांना आपल्या जातीचा मोठा अभिमान होता. यांच्या तीर्थरूपांपासून यांचा आणि माझा चांगला घरोबा होता. हे माक्ष आति होते. त्यांनीं आपल्या कै ०ज्येष्ट बंधूच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र आळंदी येथे ' श्रीविठ्ठलाश्रम ? या नांवाची एक प्रशस्त अशी धर्मशाळा बांधली आहे, ती दाख- विण्याकारितां त्यांनीं मला आपल्याबरोबर आळंदीस नेलें होतें. त्या प्रसंगीं त्यांचें आणि माझें जातीच्या नांवासंबंधानें बरच भाषण झालें, येवटीं ते असें ह्मणाले कीं, “आपण खरे रजपूत असून आपला कोणत्याही प्रकारचा अर्थाअर्थी संबंध नसतांनाहि आपल्या ज्ञातीस शद्रवत जातीचें नांव कां पडलें आहे, याचें कारण कांहीच कळत नाहीं, याचें निवारण झाल्यास फार उत्तम होणार आहे. आपल्यासारख्या विचारशील व शोधक मलुष्यानें मना-र घेतल्याशिवाय हें काम सिद्धीस जाणार नाहीं, सदरहु ग्रहस्थ हे ताः १६ माहे डिसेंबर सन १९१२ रोजीं अकालीं मृत्यु पावले. यांच्या शोकजनक मृत्यूमुळे आमच्या जातीचा एक मोठाच आधारस्तंभ आणि पुरस्कर्ता




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now