करार एका तान्याशी | Karar Eka Tanyashee
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
102
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कुसुमाग्रज - Kusumagraj
No Information available about कुसुमाग्रज - Kusumagraj
वसन्त पाटीळ - Vasant Pateel
No Information available about वसन्त पाटीळ - Vasant Pateel
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रतिभेतून जन्मलेल्या आहेत :
कालाचे बलिवर्द झोरे ते उ
अंध फ्रिसाट तयी पळती
सुवर्णवलये फेकुन त्यांची
नियमित केलिस दूच गती.
ही उठोक्षा स्तिमित करणारी आहे. 'पाथेया'तील उषासूक्त मात्र कुसुमाग्रजांचेच आहे.
कुसुमाग्रजांच्या परिणतप्ररोबरेबर यातील उघेची प्रभाही परिणत झालेली दिसते. अंधाऱ्या
विश्वात 'सूर्याचा सांगावा' शिंपीत येणारी व अंती सूर्यात आपले अस्तित्व विसर्जित करणारी
उषा, ही या श्रेष्ठ कवीचे अजरामर शब्दशिल्प म्हणजे साक्षात कैलासलेणेच आहे-
महाकवीच्या प्रतिभेने घडवलेले! सगुणस्तवनाने प्रारंभ करून निर्गुणाकडे अलगद नेणारे हे
उषेचे गाणे मराठीचे लेणे ठरावे, इतके ते सरस वाटते.
उषेनंतर उगवतो सुर्य. कुसुमाग्रजांच्या काव्याच्या केंद्रस्थानी हा सूर्य आहे. हा विराट
तेञोगोल त्यांना काय देत नाही? तो सुर्य नवजीवन देतो, नवीन विचार देतो, प्रेम देतो,
क्रांती घेऊन येतो. तो त्यांना तारतो, आधार देतो, आश्वासन देतो. “विशाखे'तील सूर्य असे
काही सौंदर्य व सामर्थ्य घेऊन आला, की आपली पृथ्वी त्याच्या प्रेमपाशात पडली! प्रीतीच्या
साफल्यासाठी त्याची अहोरात्र प्रार्थना करू लागली.
पृथ्वीचे प्रेमगीत' हे नुसते प्रेमगीत राहत नाही, तर प्रकाशमूर्ती सूर्याचे स्तोत्र होते. सर्व
तारांगणाला इथे पृथ्वीचा मोह पडला आहे. चंद्र-ग्रह-तारे भाळले या मातीवर ही पृथ्वीची
श्रेष्ठता. पण सूर्य मात्र दूरस्थ. जळण्यासाठीच त्याचे जीवन. तारे या मातीवर आसक्त तर
सूर्य पूर्ण निरासक्त; तरी देखील पृथ्वीने आपले सर्व जीवन सूर्याला मनोभावे समर्पित केले.
त्याच्या भोवती ती अहोरात्र परिश्रमण करीत आहे. यातून कवीला मातीची चैतन्यंमय
प्रकाशाकडे असलेली स्वाभाविक ओढ सूचित करायची आहे. “पृथ्वीचे प्रेमगीत केवळ
प्रीतिगान राहत नाही; तर ते कवीच्या प्रकाशपूजेचे सूक्त बनते.
सूर्योपासना तशी वेदकालापासून चालत आली आहे. परंतु या गीतात कुसुमाग्रजांनी
सूर्याचे देवत्व आपल्या प्रतिभेच्या किमयेने पुसून टाकले व त्याला धरतीचा प्रियकर “मित्र”
बनविले. या कवितेतील भव्योदात्तता वेदातील *द्यावापृथिवी'ची आठवण करून देणारी आहे.
कुसुमाग्रजांनी अन्तराळातील चंद्र-नक्षत्रांच्या सुवर्णशुंखलांनी आकाश-धरतीला जणू प्रेमबंधनाने
जखडून टाकले, कायमचे. पृथ्वीच्या प्रीतीची ज्योत केवळ यौवनात प्रदीप्त राहत नाही, तर॒
ल मशाली विझल्यानंतरही प्रकाशत राहते. प्रेमाचे स्वरूप स्पष्ट करताना भवभूतीने
म्हटले आहे :
'जिथे हृदयाला विश्रांती लाभते व ज्यातील रस वार्धक्यातही कमी होत नाही.”
(विश्रामो हृदयस्य यत्र जरसा यस्मिन्नहायो रसः- उ. रा. १.३९).
_ सहा / करार एका ताऱ्याशी
User Reviews
No Reviews | Add Yours...