सोशंळिझम | Soshalijham

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Soshalijham by पांडुरंग वासुदेव गाडगीळ - Pandurang Vasudev Gadagil

More Information About Author :

No Information available about पांडुरंग वासुदेव गाडगीळ - Pandurang Vasudev Gadagil

Add Infomation AboutPandurang Vasudev Gadagil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रमशकक्‍्तीचा क्रयविक्रय व वाढावा डे न पटल्यास तो ती घेत नाहीं व ती खर्ची पडून राहते. कारण विकर्णें किवा न विकणें याचें दुकानदारास, तसेंच घेणें किवा न घेणें याचें गिऱ्हाइकास स्वातंत्र्य आहे. खुर्चीवाल्याप्रमाणे मज्रहि आपल्या श्रमाचें दुकान मांडन बाजारांत बसतो ना? नाहीं. कारण त्याचे श्रम त्याच्या शरीरांत अमूर्त असतात. तो भांडवलदाराच्या कारखान्यांत जाऊन जसजसें काम करूं लागतो, तसतसे त्याच्या श्रमाचें मूत स्वरूप म्हणजे माल भांडवलवाल्यास मिळत जातो. आणि भांडवलवाल्यास मालाची पोंच झाली म्हणजे मज्रास मजरी मिळते. पण याचा अर्थ तरी अखेर असाच कीं, बाजारांत श्रम व मज्री यांची प्रत्यक्ष देवघेव न झाली तरी त्यांच्या देवघेवीचा करार झालाच आणि सारख्या किमतीच्या वस्तूंच्या देवघेवीचा बाजारसंप्रदाय येथेंहि पाळला गेलाच. पण अजूनहि आपल्या कल्पनेत दोष शिल्लक आहे. खुर्चीचा दुकानदार ती विकण्यास अगर न विकण्यास व खूर्चीचें गिऱ्हाईक ती घेण्यास अगर न घेण्यास स्वतंत्र आहे असें आपण वर म्हटलें आहे. श्रम' विकण्याचा करार करणारा आणि मजरी देण्याचा करार करणारा हेहि दोघे असे स्वतंत्र आहेत काय ? श्रम विक पहाणारा मज्र श्रम न विकेल तर त्यावर कायद्यानें सक्ती होणार नाहीं, म्हणून तो स्वतंत्र आहे हें सकृद्दर्शनी खरें दिसतें. पण खोल विचारांती सुद्धां तें तसेंच दिसतें काय? समजा, त्यानें भाव पटला नाहीं म्हणून श्रमविक्रीचा करार केला नाहीं; तर काय होईल? तर काय व्हायचें ? त्याला आणि त्याच्या मुलाबाळांना उपाशी मरावें लागेल. शरीरांत श्रम करण्याची जी शक्ति आहे त्यावेगळें अन्नवस्त्र मिळविण्याचें कोणतेंहि साधन त्याजजवळ नाहीं. तीं साधनें भांडवलवाल्याजवळच आहेत. भांडवल- वाल्याची नोकरी पत्करून व त्याच्या भांडवलाचा उपयोग करून जर त्याच्या- साठीं संपत्ति निर्माण केली नाहीं, तर मजूरी मिळणार नाहीं. म्हणून अन्न- वस्त्र मिळणार नाहीं; व म्हणून मज्रास व त्याच्या कच्च्याबच्च्यांस उपाशी मरावें लागेल. श्रम विकण्याचा करार करण्यास अथवा न करण्यास मज्रास कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण कायद्यानें दिलेलें हें स्वातंत्र्य अत्यंत हिडीस आहे. या स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे कीं, मजरानें वाटल्यास मिळेल त्या दरानें मज्री पत्करावी किवा वाटल्यास बाजार सोडन “सदय आणि शांत अशा मरणाच्या भेटीस जावें. मजूराचें हें कायदेशीर स्वातंत्र्य, माक्स म्हणतो*
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now