हिरवा चुडा | Hiravaa Chuda

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hiravaa Chuda by सरोजनी बाबर - Sarojani babar

More Information About Author :

No Information available about सरोजनी बाबर - Sarojani babar

Add Infomation AboutSarojani babar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हिरवा चुडा ७ लेल्या साडीच्या ओच्यांतील पाणी पिळून टाकीत एकेक पायरी चढून वर निघाली. त्यामुळं आणखी एकदां ही पाण्यांत खेचील या भावनेनं राधिकेनं मोठ्या चपळाईनं पायांत लूगडं ल्‌डबुडत होतं तरी धूम ठोकली. “ पळून पळून किती पळशील अं ? “ शकुतलेनं राधिकेची पाठ सोडली नाहीं. ती ओल्या लगड्याचे फटकारे पायावर बसत होते तरी तशीच राधिकेच्या पाठीमागें धावू लागली आणि पायांत लूगडं अडकून आपण पडलों तरी हरकत नाही; पण हिच्या तावडीत सांपडायचं नाही या ईर्ष्येतं राधिकेनहि मूळीच माश्रार घेतली नाही. उलट विहिरीच्या आसपास तरा- रून वर आलेल्या पिकांत दडून बसत मिस्किलपणानं ह्यकुतलेकडे पहात ती गुणगुणू लागली. “ झाली लगीन घाई ग 55 चिडवू नका ग बाई. . “ अय्या ' हो का? तरीच तरीच हं ! “ शकुंतलेन मोठ्यानं हंसून पळत जात राधिकेचा हात पकडला. इतक्यांत झेल्या आणि किसन समोख्न येताना दिसल्यामुळ ती पुन्हा म्हणाली, “ आली बघ ही कार्टी ! आतां आपसूक पोहायला येशील. ” पण त्याच क्षणाला या मुलांच्या बरोबर आणखी कुणीतरी येत असल्याचं ध्यानांत येतांच टाचा वर करून पहात ती पुटपुटली, “ हे कोण बाई नवीनच आज हांच्याबरोबर ? * “ कोण ग? ” राधिकेनं मान वळवली मात्र आणि मास्तर येत अस- लेले दिसताच “ अग बाई ! चल चल लौकर * असं गडबडीनं बडबडत ती चटकन्‌ त्या पिकातून पलीकडे जाऊं लागली. “ अग पण हो हो ! हे कुणी आलं म्हणून तुला एवढं पळून जायचं काय कारण १” शकुतलेन रागारागान राधिकेकडं नजर वळवली; पण त्या- आधीं राधिका तिच्यापासून कितीतरी लांब निघून गेली होती! त्यामुळं मोठ्या आहचर्यानं तिच्याकडे बघून तोंडावर हात ठेवीत ती ओरडली* “ म्हणजे १ काय आहे तरी काय ही भानगड ? ” “ कोण शकूंतलाताई ? इकडे कुठें ग आज एकटीच ? “ क्षकुंतलेचा आवाज कानावर येतांच झेल्यानं हंसतमुखानं तिच्याजवळ चौकशी केली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now