शेक्सपियर | Sheksapiyar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शेक्सपियर  - Sheksapiyar

More Information About Author :

No Information available about गणेश हरि केळकर - Ganesh Hari Kelkar

Add Infomation AboutGanesh Hari Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लकळ्ितांचा पुढील विकास १५ सरस व उठावदार कसें होईल याकडेच लोकांचें लक्ष विद्वेष लागू लागलें. कडकडीत सोवळ्या .धर्मगुरूंना हे नवीन प्रकार अथातच रुचले नाहीत य॒ हळूहळू त्यांनी आपले अंग त्यांतून काढून घेतलें. त्यामुळे जी थोडीशी मयादा किंवा गंभीरपणा होता तोही लवकरच गेला व नाटकें म्हणजे केवळ करमणुकीकरितां करावयाची एवढेंच कायम राहिलें. तरी देखील या नाटकांचीं कथानके खिस्तचरित्र किंवा इतर नव्याजुन्या साधुसंतांचीं चरित्रें यांतूनच घेतलीं जात. पण, हळूहळू मूळची आटोप- शीर आख्याने जाऊन जास्त विस्ताराची, पुष्कळ सोंगे असलेलीं, नाटके होऊं लागलीं व त्यामुळें सर्व प्रकारच्या गांवकऱ्यांची नटण्यानाचण्याची होस भागूं लागली-एवढा तरी परिणाम नाटके देवळाबाहेर आलीं या गोष्टीने श्षाला तो झालाच. *लकितें देवालयांच्या बाहेर आवारांत व्हावयाला लागलीं या गोष्टींचे इतर परिणामही अनेक प्रकारचे झाले, एक तर, पात्रांची निवड सगळ्या गांबकऱ्यांतून करितां येऊ लागल्यामुळे जास्त लायकीची माणसें नाटकांत काम करावयाला मिळूं लागलीं; व दुसरें नटांना आपा- पली कामे जास्त मोकळेपणाने व खुल्या दिलाने करतां येऊं लागल्यामुळे प्रयोग जास्त उठावदार होऊं लागले. रंगभूमि हबी तेवढी मोटी करण्याची सोय झाल्यामुळें कथाभाग व त्यांताल प्रसंग हे मोकळेपणाने रंगवावयाला नाटककाराला अवकाद्य मिळूं लागला व प्रयोग अमुकच वेळीं, अमक्याच तासांत, झाला पाहिजे ही मर्यादा पाळण्याचेंही कारण उरल नाही. इतकेच नव्हे, तर एखाद कथानक फारच मोठें असेल तर एका नाटकांतच ते कसेतरी कोंबण्याऐवजी दोन नाटकें करून लागोपाठ दोन प्रयोग करण्याचीही सोय झाली. नाटकाची व्यवस्था सबंध गांवाच्या हातांत गेल्यामुळे स्थानिक व वैयक्तिक इंष्येला व हौसेला वाव मिळाला हय फायदा त्यांतल्या त्यांत विशेष महत्वाच्च समजला पाहिजे. कारण, गावांत एखादा उत्साही माणूस असला, व त्याला गांवचे पढार्रपण मिळविण्याची वगेरे हौस असली तर त्याला आपला शत्साह व पैसाही खर्च करावयाला गांवचे नाटक ही आयती संधीच मिळाली. आपल्या इकडील खेडेगावांत उरूस, जत्रा, वगरे होतात त्यांचें उदाहरण घेतं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now