शिक्षण विषयक नवे विचार | Shiqsanavishhayak Nave Vichaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
39 MB
Total Pages :
327
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भास्कर धोंडो कर्वे - Bhaskar Dhondo Karve
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पान नववे
सभ्य व शिष्टसंमत चालीरिती माहीत नसतील, जर त्यांची आवडनिवड उच्च प्रका«
रची बनून जगाच्या व विशेषतः स्वदेशाच्या संस्कृतीची त्यांना ओळख झालेली नसेल,
जर त्यांच्या ठिकाणी सत्याची चाड उत्पन्न झाली नाही व मोठे झाल्यावर कांहीतरी
बौद्धिक कार्य मन लावून करण्याचें सामर्थ्य त्यांच्यामध्ये उत्पन्न झालें नाही, जर उच्च
ध्येय साध्य करण्याकारिता लागणारी चिकाटी, धेर्य आणि कार्यनिष्ठा त्यांना प्राप्त
झाली नाही, जर सत्य, सोंदर्य आणि सोाजन्य यांचा उद्य त्यांच्या मनांत झाला
नाही, थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे जर बोंड्धिक, नैतिक व भावनात्मक शील मलांमध्ये
दिसून आठ नाही, तर शिक्षणाचे कार्य अगदी फुकट गेले, असें म्हणार्वे लागेल.
“ज्याला स्वकर्तव्याची जाणीव नसेल तो खुपत्र नव्हे, ज्याच्या ठिकाणीं औदार्य
नाही तो खरा राजा नव्हे, त्याचप्रमाणे ज्या शाळेंत जिवंतपणा नाही ती खरी शाळाच.
नव्हे. ज्या शाळेतून बाहेर पडणारी मुर्ल बुद्धीने,नीतिमत्तेने आणि शरीराने खुजट झालेलीं
असतील, त्या शाळेतील परीक्षांचे निकाल किंतीहि चांगले लागत असले तरी व्यर्थ
होय. तेव्हा शाळा, अभ्यासक्रम, पड्डाते, परीक्षा, हीं सर्व केवळ साधर्न॑ आहेत ई
विसरून चालणार नाही. शिक्षणाचं मुख्य केंद्र * मूल ' आहे व त्याबह्ूूळ मुख्य'
विचार केला पाहिजे. ?'
शाळेमध्ये जिवंतपणा कसा आणावा व शिक्षणाचे कार्य फोल होऊ नये म्हणून
शिक्षक या नात्याने आपलें अंतिम ध्येय साध्य करण्याकरिता काय उपाय योजावेत
ह्याचाच ऊहापोह ह्या पुतस्कांत केला आहे व ह्या टष्टीने केलेल्या सूचनांचा कांट्टतरी.
उपयोग होईल अशा आशेनेच हँ पुस्तक प्रसिद्ध करण्यांत येत आहे.
द्या पुस्तकास शिक्षकांच्या वर्गाला आलेले शिक्षक, न्याख्याते, लेखक,
टाइप जळाविणारे, मुद्रक, प्रकाशक, प्रुफें तपासणारे, सूचि तयार करणारे,
फोटो व ब्लॉक देणारे, अशा अनेक मंडळींनी मदत केली आहे व
त्या सर्वांचे व्यक्तिशः आभार मानावयाचे म्हटले तर एक खानेखुमार्रीच करावी
लागेल. लेब्हा ज्यांनी ज्यांनी म्हणन कोणत्याही रीतीने द्या कार्याला हातभार लावला;
असेल त्यांचे सामुदायिक रीतीने, पण अत्यंत मनःपूर्वक आभार मानून व ही अल्पशी
सेवा जनता गोड़ मानून घेईल अशी आशा प्रदशित करून ह पुस्तक वाचकांना सादर
व्हरीलत आहे.
पुर्ण, १ आक्टोबर १९३१. संपादृक.
User Reviews
No Reviews | Add Yours...