कीर्ति | Kiirti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kiirti by शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar

More Information About Author :

No Information available about शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar

Add Infomation AboutShantabai Nashikkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कीर्ति ७ आ. नी चि री आ आ न क. आजा टी च्अ्अी गोष्ट झाली तरी ती दुसऱ्याला कांहीं बोळून दाखवीत नसे. स्वत:च मनाला लावून घेई, आणि त्रास भोगी. म्हणूनच आतां धारिणीनें तिला अछ्डपणाबद्दल जरा टोंचणी दिली तरी ती सुळींच रागावली नाहीं. आपला स्त्रभावदोष कीर्ति जाणून होती. पण तिच्या स्वभावाला तिच्याजवळ औषध नव्हतें. अजून तिला तें सांपडलें नव्हतें. पुन्हां धारिणी तिला म्हणाली, “ इतक हळवं मन काय बाई कामाचं ! अग, गुलाबाचं फूल इतकं नाजूक आणि कोमल असतं पण उन्हानं करपून त्याच्या पाकळ्यासुद्धां कणखर नी चिवट बनतात. पण कीर्ति, तूं बकाली मुंबईत राहून बी. ए. झालीस, इंग्लंडमध्यें राहून बी. एस्‌. सी. पदवी मिळवून आलीस. आतां इंग्लंडहून आल्यापासून आपल्या जातीच्या उद्धारासाठी सहा महिने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून इतकी तळमळतेस, व्याख्यानं देतेस, पण कितीही जग पाह्यलंस तरी अजून तुझं तें हळवं हृदय मात्र जसंच्या तसं मखमलींतल्या मोत्यासारखं---” तिला मध्येंच थांबवून शीला म्हणाली, “ चुकलीस धारिणी, मोती कठीण असतं. त्यापेक्षां कमलकोशांतल्या दंवबिदूसारखी म्हणेनास. ” “ बरोबर आहे शीले, ” कीर्ति चेष्टेने म्हणाली, “ अन्‌ तूं म्हणजे हंसरं मोगरीचं फूलच. नाहींतर नाजूक प्रफुळ कमळच. ” “ कीर्ति, ही तुझी उपमा फारच समर्पक आहे. शीला खरोखरच कमलासारखी कोमलहृद्यी आहे. पण कीर्ति, कांहीं झालं तरी ती तुझ्यासारखी कांहीं भलतीच हळवी नाहीं. कमलावर कितीही पाणी पडलं तरी तें ओलं होत नाहीं किंवा नासून जात नाहीं त्याप्रमाणे शीला किती कां नाजूक हृदयाची असेना, तिला दुःखांचे आघात स्पर्श करूं शकत नाहींत. ती प्रफुल ती प्रफुद्च रहाते. तिच्या स्वभावसींदर्यांचा परिमल चोंहीकडे पसरतच असतो. ” प्रथम धारिणीनें सुरवात चेष्टेनें केली होती परंतु मागून गंभीरपणानेंच रोवट केला. पण शीला खिदळत दोन्ही हातांनीं धारिणीला ओवाळीत म्हणाली, “ अहाहाहा धारिणी, संगतीसंगदोषेण कां होईना पण उपमा खरोखरच सुरेख बोललीस. तुझ्यासारख्या शब्रविद्याविश्षारद डॉक्टरणीच्या तोंडून हें काव्य ऐकून माझ्या हृदयाची अगदीं घालमेल व्हायला लागली बघ. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now