ळोकमहर्षी भाऊसाहेब | Lokmarshi Bhausaheb

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lokmarshi Bhausaheb by पंजाबराव देशमुख - Punjabrav Deshmukh

More Information About Author :

No Information available about पंजाबराव देशमुख - Punjabrav Deshmukh

Add Infomation AboutPunjabrav Deshmukh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जन्मलेले एक पुरोगामी संत*च त्या मानतात. वर निर्देशिलेल्या लेखकांपैकी किमान अर्धे तरी लेखक - कवी असे आहेत न्यांनी भाऊसाहेबांचे कार्य ऐन भरात असतानाच्या जनचेतनेचा अनुभव घेतला आहे; आणि किमान दोन तरी लेखक असे आहेत ज्यांनी भाऊसाहेबांच्या क्रांतिकार्यात प्रत्यक्ष सहभाग दिलेला आहे. त्यांच्या मते तर भाऊसाहेब हा निसर्गाचा एक दैवदुर्लभ असा चमत्कारच (४ ७7८ ७0600716007) होय! जनसामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेले असे एक दुर्लभ व्यक्तित्व, जे स्वत:च्या अंतर्दृष्टीला भावले ते प्रत्यक्षात आणण्यात “सत्य-असत्यासी मन केले ग्वाही' - अशा दुर्दान्त वृत्तीने आयुष्यभर केवळ झपाटल्यासारखे कार्यरत राहिले. या व्यक्तीकडे ना ज्ञानाची उणीव ना नेतृत्वगुणांची वानवा ना मानवभक्तीचे उणेपण. उ उ अशा तुकाराम वृत्तीच्या - किंवा त्याहीपेक्षा खरे म्हणजे जोतिबावृत्तीच्या - महान्‌ व्यक्तीला रात्रंदिनी युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावे न लागले तरच नवल. आंतरजातीय विवाहामुळे सरंजामी वृत्तीच्या स्वकीयांपासून तुटलेल्या भाऊसाहेबांना जसा सततचा अंतर्गत संघर्ष द्यावा लागला तसाच वर्णवर्चस्ववादी समाजधारणेपायी बाहेरही सततच्या संघर्षांचेच दिव्य करावे लागले. अशा या सततच्या युद्धोन्मुखतेतही त्यांनी ज्या अभिनव क्रांतिकारी कल्पना प्रसृत केल्या आणि अंगची विविधांगी प्रज्ञाप्रतिभा व कार्यशक्ती पणाला लावून त्या मूर्तरूपात आणण्यासाठी जिवाचे रान केले, त्या कल्पना अभ्यासल्या आणि त्या अनुरोधाने भाऊसाहेबांनी आक्रमिलेली यशाची शिखरे न्याहाळली तरी '» (7९ ७0८0000९707' म्हणून भाऊसाहेबांचे अढळ स्थान मान्य करावेच लागेल. _ प्राचीन भारतीय संस्कृतीच्या मूळ धर्मनिरपेक्ष साम्यवादी रूपावरचा त्यांचा अढळ विश्वास पाहिला आणि कालमानाने त्यात मिसळलेल्या हीणावर सरळ हल्ला चढवण्याचा त्यांचा पवित्रा पाहिला की जोतिबा फुल्यांच्या या एकमेव वैदर्भीय वारसाच्या महानतेपुढे आधुनिक विचारक व नेतेसुद्धा नतमस्तक व्हावेत. भाऊसाहेबांनी पुरस्कारलेल्या क्रांतिकारी कल्पना म्हणजे लोकविद्यापीठ, ग्रामीण उद्योगविकास आणि कृषी/भूमी संशोधन. आज अस्तित्वात आलेली कृषिविद्यापीठे व कृषिसंशोधन प्रतिष्ठाने पाहिली; लोकविद्यापीठ व मुक्तविद्यापीठांची समूर्त साकार झालेली प्रतिष्ठाने न्याहाळली; आणि ग्रामीण उद्योगविकासाच्या मार्गावर धापा टाकत का होईना, पण पावले टाकत असलेली आजची शासन यंत्रणा अवलोकिली तर भाऊसाहेबांचे द्रष्टेपण अधिकच नेमकेपणाने मनावर ठसते. ३० डिसेंबर १९५० रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते श्री शिवाजी लोकविद्यापीठाचे उद्‌घाटन प्रसंगी भाऊसाहेबांनी लोकविद्यापीठाच्या ध्येयधोरणांचे विवेचन करताना म्हटले होते (पाहावे : परिशिष्ट १) -* आपल्या परंपराप्रिय व कालविसंगत अशा शिक्षणपद्धतीमुळेच पंधरा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now