स्त्रियांचे हक्क व सुधारणा | Striyaanche Hakk Va Sudhaarana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्त्रियांचे हक्क व सुधारणा  - Striyaanche Hakk Va Sudhaarana

More Information About Author :

No Information available about वासुदेव विनायक जोशी - Vasudev Vinayak Joshi

Add Infomation AboutVasudev Vinayak Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० स्त्रियांचे हक्‍क येवढा संकुचित अथं शास्त्रकार करीत सुटले की, त्यांनी व्यवहारांत त्या कल्प- नेचे जमिनीला पायच लागू दिले नाहीत. यानंतरचा काळ स्मृति-काळ होय निरनिराळ्या स्मृतीत एकाचे आचाराबद्दल निरनिराळे विधि-निषेध आढळून येतात व एकाच स्मृतिग्रंथांतून परस्परविरोधी असे नीति-नियम सांपडतात, याचे इंगित हेच असावे की, त्या वेळचा हिंदुसमाज जितका नादान तितकाच तो विस्कळित झालेला असावा. अशा सभाजासाठी कायदा घडविण्याचा स्मृतिकारानी प्रयत्न केला खरा; पण त्यांनाहि कडक नीतिनियमाची भलतीच पल्लेदार उडी घेतां येणे शक्‍य नव्हतें. काही चालू रीतिरिवाज तर काही निर्भेळ नीतितत्त्वे, अशी सांगड घालून त्याना स्मृतिग्रंथ लिहावे लागले. म्हणून स्मृतिग्रथात स्त्रिया बहुल ज्या कित्येक अनुदार कल्पना व्यक्त झालेल्या दिसतात त्या स्मृतिकालीन समाजस्थितीच्या द्योतक होत. स्त्रियाना कायमचे नालायक ठरविण्याचा अगर त्यांची अधोगति करण्याचा हेतु स्मृतिकारांचा असणे अशक्य होय. उलट स्मृतिकारांनी कांही काही बाबतीत विसरून गेलेली वंदिककालीन तत्त्वे पुन्हां सजीव केली. बहुपत्नीकत्वाच्या रूढीला त्यांनी बरेच पायबंद लावले व स्त्री वाझ असेल, ककशा असेल, रोगी असेल तरच तिच्या पतीनें दुसरे लग्न करावे अक्षी सवलत त्यांनी ठेविली. बालविवाह यापूर्वीच रूढ झाला होता. तथापि तारुण्यात येईतोवर आईबापानीं मुलीचें लग्न योग्य वराशी करून दिलें नाही तर तिचा तिने नवरा पसंत करून त्याच्याशी लग्न लावावे अक्षी जन्या स्वयंवराची आणि चालू बालविवाहाची त्यानी सागड घातली. वधूपरीक्षेप्रमाणेंच त्यांनी वरपरीक्षेच्या अटी घालून दिल्या. कुल, शील, विद्या, श्षरीर, वय या दरेक बाबतीत सर्वर्थव योग्य असलेल्या वरासच पित्याने कन्या द्यावी आणि असा योग्य वर मिळाला नाही तर खुद्याल जन्मभर तिला अविवाहित ठेवावे, असा कडक झिस्तीचा नियम बालविवाह्मस चटावलेल्या प्रौढाच्यावर त्यांनी लादला. इतकें करूनहि जाणूनबुजून अगर अजाणपणें अयोग्य वराशी कन्येचा विवाह झाला तर कांही कारणासाठी अशा त्या नवऱ्यास सोडून दुसऱ्याशी पुन्हां विधियुक्त लग्न करण्याचा हक्‍क त्यांनी स्त्रियांना दिला. आणि हीच त्यांची योजना आजकालच्या घटस्फोटाच्या चळवळीची पाठीराखी आहे. स्त्रीधनाचें त्यांनी पुनरुज्जीवन केलें, त्याचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now