प्रेमचंद : व्यक्ती आणि वाड्मय | Premchand Vyakti Aani Vadmay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रेमचंद : व्यक्ती आणि वाड्मय  - Premchand Vyakti Aani Vadmay

More Information About Author :

No Information available about चंद्रकांत बांदिवडेकर - Chandrakant Baandivadekar

Add Infomation AboutChandrakant Baandivadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आणि भांडखोर होता, प्रेमचंदानाही ती मारण्याच्याही धमक्या देत असे. तुसड्या स्वभावाची ही स्त्री भांडणं करुन माहेरी गेली की सासरी यायला तयार होत नसे. प्रेमचंदाचे व तिचे पटणे शक्यच नव्हते. प्रेमचंदाच्या वडिलांना इतके वाईट वाटले की या विवाहानंतर दौडच वषात काही महिन्यांच्या आजाराने ते निवेतले. ' माझ्या सोन्यासारख्या मुलाचे वाटोळे झाले ' असे या विवाहासंबंधी ते उद्‌गार काढत. उ १८९६ मध्ये नबाबचे लग्न झाले. १८९७ मध्ये मॅट्रिकची परीक्षा द्यायची होती. वडीलही वारले होते, नबाब पुढच्या वर्षी परीक्षेला बसले व दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांच्यापुढे दन निर्माण झाला, क्वीन्स कॉलेजमध्ये पहिल्या वगात आल्याशिवाय फी माफ होत नसे. सुदैवाने त्याच वर्षी हिटू कॉलेज उघडले, प्रवेश परीक्षा झाली. इंग्रजीत त्यांची प्रगती संतोषजनक होती पण गणितात मात्र “ असमाधानकारक ' शेरा मिळाला. प्रेमचंद हिहितात- “* गणित म्हणजे गौरीशंक- राचे शिखर, मी त्यावर कधीच चढू शकलो नाही ' पण प्रवेद् पाहिजे तर गणित सुधारणे भाग होते व त्यासाठी शहरात राहणेही भाग होते. सुदैवाने एका वकिलाच्या मुलाला शिकवण्याचे काम मिळाले. पाच रुपये वेतन, दोन रुपयात आपला खच भागवून तीन रुपये घरी पाठवण्याचा निर्धार त्यांनी केला. वडिलांच्या मृत्युनंतर सावत्र आईची व एका सावत्र भावाची जबाबदारी त्यांच्यावर आली. एकत्र कृटुंबपद्धतीचे संस्कार झालेल्या त्यांच्या मनाने या जबाबदाऱ्या कधीच नाकारल्या नाहीत. त्या वकिलांच्या घोड्यांच्या तबेल्यात एक लहानशी खोली होती. त्यात रहायची अनुमती त्यांनी मिळवली. एक गोणपाट, एक छोटा दिवा, काही मोडकी भांडी एवढा संसार, खिचडी पकवायची व ती खाऊन वाचनालयात कादंबऱ्यांचे वाचन' चालायचे. पंडित रतननाथ यांचे “फसाना आजाद ' त्यांनी याचवेळी वाचले. * चंद्रकांता संतति * वाचले. बंकिमबाबूचे उर्दूत झालेले अनृवाद वाचले. त्यांना उसनवारी करावी लागे. कर्जे देणाऱ्यांची तांडे चुकवण्याचे नशिबी येई. कधी उपास काढावें लागत. पण त्यांच्या वाचनांच्या वेळी कल्पनेच्या राज्यात ते राजे होते, सवं भौतिक दु:खे तिथे विसरून जात. याचवेळी एक चांगली घटना त्यांच्या आयुष्यात घडली, एका पुस्तकविक्रे- त्याच्या दुकानात जुने पुस्तक विकताना एका पारशीं गृहस्थांची त्यांच्याशी गाठ पडली, त्यांनी सहजपणे चौकशी केली, त्यांना आपल्या शाळेत एक हिक्षक ह्वा < प्रेमचंद : व्यक्ति आणि वाडमयः-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now