आपळी जळसंपत्ती | Aapalii Jalasampattii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aapalii Jalasampattii by आर. टी. नारकर - R. T. Narkar

More Information About Author :

No Information available about आर. टी. नारकर - R. T. Narkar

Add Infomation AboutR. T. Narkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गंगा स्वच्छ,खळाळतें पाणी,वाहत्या सर्व नद्या आम्हा भारतीयांना वंदनीय आहेत.त्यात गंगानदीचा मान सर्वोच्च आहे.तिचा उगम भगिरथाच्या प्रयलामुळे झाला की भूगर्भातील घडामोडीमुळे झाला हा प्रश्‍न महत्वाचा नाही .बर्‍याच नद्यांच्या नावापुढे किंवा मागे गंगा हा उपसर्ग जोडलेला असतो. परंपरेनुसार जनमानसाने हे नादमय, लावण्यपूर्ण नाव हिमालयाच्या पायथ्याजवळून उत्तरेकडील सपाट मेदानावर वाहत जाणाऱ्या सर्वात मोठ्या नदीला दिलेले आहे. आपल्याकडील बऱ्याच नद्यांना पावसाळा संपल्यानंतरही पुरेसे पाणी असते. अशा नद्या पाटबंधारे, उर्जा,वाहतूक व उद्योगधंद्याकरिता महत्वाच्या असतात.सुंदर वास्तुशिल्पे असलेली मोठी शहरे त्यांच्या काठी वसलेली असतात. पाण्याची उपलब्धता आपले स्वास्थ्य उत्कर्ष व भरभराट,कालवे व धरणे ह्याच्या वाढीवर अवलंबून आहे.यासाठी आपल्याकडे एकूण पाणी किती आहे व त्यातील पाटबंधाऱ्यासाठी किती वापरता येईल हे जाणून घेणे महत्वाचे आहे. प्रथम आपला सर्व जलपुरवठा नद्यांमुळे होतो असे समजू. हे पाणी पाटबंधाऱ्यासाठी बारमास वापरता येणे शक्‍य आहे. ते किती आहे हे कळण्यासाठी त्याचे मापन केले पाहिजे. पण हे काम सोपे नाही. त्यासाठी नदीच्या कोणत्याही एका भागात पाण्याच्या वेगवेगळ्या खोलीखाली पाण्याच्या प्रवाहाची गती मोजावी लागते. ह्याकामी गतौमापक व इतर साहित्य असलेले खास जहाज वापरतात. हे काम कंटाळवाणे , किचकट व वेळखाऊ आहे. त्यात अजून कोणाला यश आलेले नाही. म्हणून दुसर्‍या अप्रत्यक्ष पद्धतीने अंदाजी उत्तर काढतात. भारत सरकारच्या हवामान खात्याने दिलेली एकूण पावसाच्या प्रमाणाची माहिती वापरून ठराविक भागात पावसाचे एकूण किती पाणी पडते हे काढता येईल.त्यातील थोड्या पाण्याचे जमिनीवरुन बाष्प होते तर थोडे झाडांच्या उच्छवासाद्वारे हवेत फेकले जाते. बाकीचे पाणी त्या भागातून जी नदी वाहते त्यात सामावते. जर जमिनीवरुन किती पाणी बाष्प होऊन जाते व झाडांच्याद्वारे किती जाते, हे समजले तर एकूण पावसातून दोन्ही वजा करून नदीमुळे किती पाणी मिळते,हे काढता येईल. डॉ. खोसला ह्यांनी प्रथम हे शोघून काढले” * डॉ. ए. एन. खोसला ह्यांनी “आपली जलसंपत्ती” ह्या विषयावरील माहितीत मोलाची भर टाकली आहे. आदा जरी त्याच्यानंतर ह्या क्षेत्रात पुष्कळ काम झाले असले तरी त्यांचे विचार व मोलाची कामगिरी आपल्याला आपल्या जलसंपत्तीचा आढावा व त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याच्या कामी पार्गदर्शक ठरले आहेत. आमच्या अभियंत्यांचे ते स्फूर्तीस्थान आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now