तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी | Tarkatirth Lakshmanshastri Joshi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी  -  Tarkatirth Lakshmanshastri Joshi

More Information About Author :

No Information available about अरुंधती खंडकर - Arundhati Khandakar

Add Infomation AboutArundhati Khandakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आले होते. धार्मिक रीतीरिवाजांवरील त्यांचा विश्वास उडाला होता. नारायणशास्त्रींनी लक्ष्मणशास्त्रींना आणखी पुढे शिकावयाचे असल्यास वाराणसीला जाण्याचा सल्ला दिला. तिकडे एकेका दर्शनाचे अधिकारी पंडित होते. त्यांच्या गुरुकुल धर्तीच्या पाठशाळा होत्या अधिक ज्ञानासाठी लक्ष्मणशास्त्री काहीसे अस्वस्थ झाले होते. गुरूंच्या आशिर्वादाने ते वयाच्या १८ व्या वर्षी वारासणीला पोहोचले. ते वाराणसीला बिंदुमाधव घाटावरील योगानंदांच्या मठीत तीन वर्षे राहिले. त्यांनी वामाचरण भट्टाचार्य, राजेश्वरशास्त्री, पंचानन, तर्करत्न भट्टाचार्य, यांच्यासारख्या प्रख्यात नैयायिकांकडे आलटून पालटून पाठ घेतले. एकापेक्षा एक वरचढ असा त्या सर्वांचा शास्त्रातील मोठा अधिकार होता. गंमत म्हणजे न्याय-नव्यन्याय यातील सर्व तयारी लक्ष्मणशास्त्रींनी गंगाकाठावरील पंडितांकडे केली खरी परंतु 'तर्कतीर्थ' ही पदवी मात्र त्यांनी १९२२ मध्ये कलकत्याच्या शासकीय संस्कृत विद्यालयातून घेतली. त्यानंतर ते वाईला आपल्या पाठशाळेत अध्यापनासाठी परतले. वाराणसीच्या मुक्कामात तर्कतीर्थांना एका मोठ्या संकटातून जावे लागले. १९१८ मध्ये इन्फ्लुएंझाची साथ भारतभर पसरली. तर्कतीर्थ आपल्या मठीत एकटेच रहात असत. अशावेळी त्यांना त्या तापाची लागण झाली. अंगात उठण्याचे बळ उरले नाही. दोन-तीन दिवस तसेच काढले. एका सकाळी ते कण्हत पडले होते. त्यांच्या तोंडात पाण्याचा थेंबही पडला नव्हता. साथीला बळी पडणाऱ्या शेकडो लोकांवर दुर्गाघाटापलिकडे अंत्यसंस्कार होत होते. पडल्यापडल्या त्यांना भडकणाऱ्या चितेच्या ज्वाला दिसत होत्या. दफनभूमीकडे नेत असलेले मृत देहही तेथून दिसत. त्यांच्या कण्हण्याचा आवाज बिंदुमाधव मंदिरातील पूजा संपवून निघालेल्या बाईंच्या कानावर पडला. त्या थबकल्या व मठीत डोकावून त्यांनी विचारले “काही मदत हवी का?' त्या होत्या तेथील वैशंपायन नावाच्या व्यवस्थापकांच्या पत्नी. लक्ष्मणशास्त्रींनी हात जोडून क्षीण आवाजात म्हटले, “डोली बोलावून मारवाडी हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याची व्यवस्था झाली तर बरे”. त्या बाईनी लगेच तशी व्यवस्था करविली. ते हॉस्पिटल निराधारांसाठी चालवले होते. हॉस्पिटलच्या बाहेर अनेक रुग्णांची रांग होती. डॉक्टर स्वत: बाहेर येऊन एक-एक रुग्ण बघत राहिले. ज्यांची स्थिती उपचाराला दाद देऊ शकणार नव्हती त्यांना ते बाहेरच औषध देऊन परत पाठवत. लक्ष्मणशास्त्रींचे जीभ, डोळे पाहून त्यांनी लगेच एक खाट मागवून त्यांना आत नेले. त्यांना तीन दिवसाचे लंघन घडल्यामुळे बाकी अडचण आली नाही. आठ दिवसांनी लक्ष्मणशास्त्री पायावर उभे राहू शकले. पुढील आठ दिवस पायात आणखी ताकद आल्यावर त्यांना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now