अणुशक्ती | HOW DID WE FIND ABOUT NUCLEAR POWER?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
30
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)३ ऊज
युरेनियमसारख्या एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या
किरणोत्सर्गातून खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा उत्पन्न होते. उदाहरणार्थ,
गॅमा किरणात प्रकाशापेक्षा कितीतरी अधिक ऊर्जा असते. अल्फा व
बीटा कण सेकंदाला हजारो मैलांच्या गतीने प्रवास करतात त्यामुळे
त्यांच्यात प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते.
किरणोत्सर्गी मूठद्रव्यातून नेमकी किती ऊर्जा निर्माण होते हे
ठरवण्याचा सर्वात पहिला प्रयत्न मारी क््युरीचे पती, फ्रेंच शास्त्रज्ञ पियेर
क्युरी यांनी केला. १९०१ साली रेडियम नावाच्या किरणोत्सर्गी
मूलद्रव्यातून किती ऊर्जा बाहेर पडते हे त्यांनी मोजले. याआधी तीन
वर्षेच त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मिळून या मूलद्रव्याचा शोध लावला
होता. उ
रेडियम अगदी कमी प्रमाणातच उपलब्ध होते, परंतु त्याच्या
मोजमापावरून असे दिसून येत होते की जर एक औंस रेडियम एकत्रित
करून एका ठिकाणी ठेवता आला, तर एका तासात त्याच्या कणातील
किरणोत्सर्गातून सुमारे ४,००० कॅलरी इतकी ऊर्जा बाहेर पडेल.
एका दृष्टीने पाहता, हे काही फार मोठे प्रमाण नाही. एक औस
पेट्रोल जाळले असता त्यातून ३,२५,००० कॅलरी, किंवा एका तासात
रेडियममधून निघणाऱ्या ऊर्जेच्या ८० पट, ऊर्जा निर्माण होते.
पण एकदा तुम्ही तेवढे पेट्रोल जाळलेत, की त्यातून तेवढी ऊर्जा
मिळाल्यानंतर आणखी काहीच मिळणार नाही. याउलट, रेडियममधून
एका तासात ४००० कॅलरी मिळाल्यानंतरही ही क्रिया तशीच अव्याहत
२८ । शोधांच्या कथा । अणुशक्ती
गा अडगडच्णा्ंन
चालूच राहते.
आणखी एका तासात रेडियम आणखी ४,००० कॅलरी निर्माण
करते, त्यानंतरच्या एक तासात आणखी ४,००० कॅलरी आणि हे असे
होतच राहते. एक औस पेट्रोल जाळल्याने जेवढी ऊर्जा मिळते तेवढी
यापासून ८० तासात मिळते. ८०० तासात यातून एक औरस पेट्रोलच्या
जळणाच्या १० पट ऊर्जा मिळेल, ८००० तासात त्याच्या १०० पट
आणि ही क्रिया अव्याहत चालूच राहील.
अर्थात, कालांतराने रेडियममधून ऊर्जा मिळण्याचा दर कमी कमी
होतो, पण ते अतिशय धीम्या गतीने होते. अखेर मूळ दराच्या तो अर्धा
होतो, पण रेडियममधून १,६२० वर्षे ऊर्जा मिळाल्यानंतर ते घडते.
रेडियममधून ऊर्जा मिळण्याचे पूर्णपणे थांबेपर्यंत त्यातून तेवढ्याच
वजनाच्या पेट्रोलच्या २,५०,००० पट ऊर्जा मिळाली असेल.
ही एवढी सर्व ऊर्जा येते तरी कुठून?
सर्व ऊर्जा कुठून तरी यावी लागते याची शास्त्रज्ञांना १८४०
सालापासूनच खात्री पटली होती आणि किरणोत्सर्गाच्या ऊर्जेसंबंधीदेखील
ते खरेच होते.
रसायनांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेसंबंधी शास्त्रज्ञांना
बरीच माहिती होती. उदाहरणार्थ, जेव्हा लाकूड, कोळसा किंवा पेट्रोल
जळते, तेव्हा त्या जळणातील कार्बन आणि हायड्रोजनच्या अणूंचा
हवेतील प्राणवायूशी संयोग होतो आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते. या
प्रकारच्या संयोगाला रासायनिक प्रक्रिया' असे म्हणतात आणि या
प्रकारे निर्माण झालेल्या ऊर्जेला 'रासायनिक ऊर्जा' असे नाव आहे.
अणूंची रचना कशी असते हे एकदा लक्षात आल्यावर, इलेक्ट्रॉन
एका अणूकडून दुसऱ्या अणूकडे गेल्यामुळे रासायनिक प्रक्रिया घडते.
हे शास्त्रज्ञांना कळून चुकले. अणूच्या काही रचनेतील इलेक्ट्रॉनच्या
शोधांच्या कथा । अणुशक्ती । २९
User Reviews
No Reviews | Add Yours...