मेणबत्तीचा रासायनिक इतिहास | THE CHEMICAL HISTORY OF A CANDLE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
147
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
माइकल फैराडे - MICHAEL FARADAY
No Information available about माइकल फैराडे - MICHAEL FARADAY
सुधा गोवारीकर - SUDHA GOWARIKAR
No Information available about सुधा गोवारीकर - SUDHA GOWARIKAR
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१४ मेणबत्तीचा रासायनिक इतिहास
जाणवली पाहिजे; एवढेच नाही, तर त्या विषयाशी त्याचे नाते जुळलेले
असावे. म्हटलेच आहे, “शिक्षक शिकवतो, चांगला शिक्षक समजावून देतो,
अधिक कार्यक्षम शिक्षक उदाहरणे देऊन स्पष्ट करतो; पण उत्तम शिक्षक
प्रेरणा देतो. “ हे पुस्तकांच्या बाबतीतही लागू पडते.
माणूस आणि त्याच्या सभोवतालची परिस्थिती यांचा पद्धतशीर अभ्यास
म्हणजे विज्ञान. रोज आपण कित्येक घटनांना सामोरे जात असतो. त्यातल्या
काही नैसर्गिक असतात; तर काही माणसाने घडविलेल्या असतात, आज'
माणसाने जे काय मिळवले आहे, ते सर्व त्याने केलेल्या नैसर्गिक घडामोडींच्या
पद्धतशीर अभ्यासावरच उभे आहे. किंवा असे म्हणता येईल की, ते सर्व
आपण निसर्गाकडूनच शिकलो आहोत. पण या निसर्गाशी संवाद कसा
साधायचा ? त्याच्याशी बोलता तर येत नाही. तसेच आपल्याला जे माहिती
असणे आवश्यक असते, ते सरळ दिसत नाही; ते लपलेले असते. सूक्ष्म
आणि सातत्याने केलेले निरीक्षण, त्यावरून काढलेले अनुमान यातूनही
आपण पुष्कळ काही शिकू शकतो. पण सरळ दृष्टीस न पडणाऱ्या घटनांबद्दल
मात्र आपल्याला काहो प्रश्न विचारावे लागतील. उदा. जीवनासाठी आवश्यक
हवा आपण शश्वासाद्वारे घेत असतो, ती हवा एक मूल स्वरुपाचा पदार्थ आहे,
की अनेक पदार्थांचे मिश्रण आहे ? जर ते मिश्रण असेल, तर त्यातला कोणता
पदार्थ आपल्या जीवनाला उपयोगी असतो ? अर्थात असे प्रश्न विचारल्यास
उत्तर मिळणार नाही. त्याकरता आपल्याला प्रयोग करावे लागणार.
त्यातूनही आपल्याला अचूक उत्तर मिळेलच, असे नाही. योग्य उत्तर हे
तुमच्या प्रयोगाच्या स्वरुपावर अवलंबून राहील.
प्रयोग म्हटले की, विशेष उपकरणे व साहित्य यांनी भरलेली प्रयोगशाळा,
आणि वैज्ञानिक म्हणवून घेणाऱ्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभ्या
राहतात. खरे तर नेहमी असेच असण्याची गरज नाही. विज्ञानामध्ये विशेष
तालीम मिळाली नसली, तरी आपण प्रयोग करू शकतो; निसर्गातून उत्तरे
मिळवू शकतो. अशा साध्या प्रयोगांच्या खटपटीत असलेला एखादा मायकेल
फॅरडे आपल्याला गवसेल, कुणी सांगावे ? रबरी नळी, नळाची चावी, नळ्या,
User Reviews
No Reviews | Add Yours...