भूकंप आणि वणवा | BHOOKAMP ANI VANVA
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
28
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
रस्किन बांड - Ruskin Bond
No Information available about रस्किन बांड - Ruskin Bond
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)“ते सगळे ठीक आहेत.'* आजोबांनी घराचा उल्लेख टाळला. *'तू आता
चल. तू करण्याजोगं इथं कोणतंच काम नाही. तुझी सायकल कुठं आहे ?”” '
“ती वाहून गेली. तलावातलं सारंच्या सारं पाणी बाहेर पडलं. मी
झाडावर चढून बसलो.
ते दोघे मूकपणे घराची वाट चालू लागले. पण त्यांच्या आजुबाजूला सर्वत्र
आरडाओरडा आणि गोंधळ होता.
आपले घर इतक्या पूर्णपणे भुईसपाट झाले असेल असे राकेशला वाटले
नव्हते. संभ्रमीत होत तो नुसता त्याकडे डोळे विस्फारून पाहात राहिला.
“सगळंच गेलं,'' तो अखेरीला उद्गारला. “दुर्दैव -- किती दुर्दैव.”
“नाही, आजोबा म्हणाले. “आपण सुदैवी आहोत. आपण सगळे
जिवंत आहोत, नाही का?” र र
28
चार
आपण स्वतःला सुदैवी म्हणालो ते चुकले की काय असे आजोबांना उशिरा
रात्री वाटले. कारण तेव्हा भूकंपाचा अजून एक मोठा धक्का बसला
आणि गरम हवेच्या फुग्याप्रमाणे मुमताजची झोपडी हेलकावू लागली. गावात
अजून काही इमारती कोसळल्या.
आजोबांचे हवेबद्दलचेही भाकीत चुकीचे ठरले होते. पाऊस काही थांबत
नव्हता आणि बाहेर अंगणात झोपायचा स्वतःचा बेतही त्यांना सोडून द्यावा
लागला होता. इतर सगळे घराच्या ढिगाऱ्यातून वाचवलेले सतरंज्यांचे किंवा
गाद्यांचे तुकडे जमिनीवर पसरून झोपडीत झोपले होते. अर्थातच तिथे गर्दी झाली
होती. मुमताज, त्याची बायको, आणि चार लहान मुले यांनी निम्मी जागा
व्यापली होती आणि उरलेल्या निम्म्या जागेत आजोबा आणि त्यांचे कुटुंबीय
पडले होते. मुकेश आणि त्याच्याहून लहान मुले सोडली तर कोणालाच नीट झोप
लागली नाही. ”
ढिगाऱ्याखालून वर येण्यात पिकलला अखेरीला मध्यरात्री यश आले.
गिलाव्याच्या चुन्याने माखल्यामुळे तो सगळा पांढरा झाला होता आणि त्याच्या
लांब कानांपैकी एक तुटायला आला होता. झोपडीच्या शेजारी बसून तो जवळ
जवळ सारी रात्र मोठ्याने रडत होता. गावातील इतर ठिकाणची कुत्रीही त्या
रडण्यात सामील झाली आणि अशा प्रकारे ती एक विलक्षण भेदरवणारी रात्र
ठरली-- जोराने वाहणारा वारा, पाऊस, कुत्र्यांचे रडणे सारेच एकदम आणि
शिवाय अजून एखादा धक्का तर बसणार नाही ना ही मनातली भीती.
दगडविटांची मोठी घरे ज्या वेगाने कोसळली तशी झोपडी पडायची शक्यता
दिसत नाही हे आजोबांच्या लक्षात आले होते. मग ती धक्क्याच्या वेळी किती
का हेलकावे खाईना. तसेच म्हणायचे तर दगडविटांचे सगळेच बांधकाम
कोसळून भुईसपाट झाले होते तर लाकडाचे बांधकाम, मग ते किती का तकलादू
असेना, उभेच्या उभे राहिले होते. त्यांना ते त्यावेळी माहिती नव्हते एवढेच.
सगळा आसाम आणि बंगालचा काही भाग भूकंपाच्या तडाख्यात
User Reviews
No Reviews | Add Yours...