तारे | HOW DID WE KNOW ABOUT THE UNIVERSE?

Book Image : तारे  - HOW DID WE KNOW ABOUT THE UNIVERSE?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
16 ऑफ रिलेटिव्हिटी) आधारित होते. या सिद्धांताचा भाग म्हणून संपूर्ण विश्‍वाच्या गुणधर्मांबद्दल त्यांनी काही समीकरणे 'फील्ड इक्केशन्य' म्हणून मांडली होती. आईन्स्टाइनच्या मते विश्व 'स्थिर' (स्टॅटिक) मानले जावे - म्हणजे काळाबरोबर त्यात बदल होत नसावा. याच कारणाने अशा स्थिर विश्वाला लागू होण्यासाठी त्यांच्या समीकरणात त्यांनी आणखी एक घटक घातला. विल्हेम द सिटर (१८७२-११३४) या डच खगोलशास्त्रज्ञाने १९१७ साली असे दाखवून दिले की, आईन्स्टाइनच्या समीकरणातून नवा घटक काढून टाकल्यास सतत प्रसरण पावणाऱ्या, वाढणाऱ्या विश्वाचे स्पष्टीकरण देता येते. यासाठी, विश्‍वात तारे अथवा इतर कोणत्याच वस्तू नाहीत अशी तात्पुरती कल्पना त्याने केली होती. अलेक्झांडर ए. फ्रीडमन (१८८८-१९१२५) या रशियन गणितज्ज्ञाने ११२२ साली असे दाखवून दिले की, जरी तारे विचारात घेतले तरी देखील फील्ड इक्केशनचा अर्थ सतत प्रसरण पावणारे विश्‍व असाच होतो. आर्थर एस. एडिंग्न (१८८२-१९४४) या इंग्रज खगोलशासत्रज्ञाने ११३0 साली असे दाखवून दिले की आईन्स्टाइनच्या कल्पनेतील स्थिर विश्‍व जरी अस्तित्वात असले तरी ते स्थिर राहू शकणार नाही. ते प्रसरण तरी पावेल नाहीतर आकुंचन तरी पावेल व ती क्रिया चालूच राहील. आईन्स्टाइनला त्याचे फील्ड एक्केशन सुरुवातीला होते तसेच ठेवावे लागले. नवा घटक निर्माण करणे ही त्याची सर्वात मोठी चूक होती अये त्याने नंतर म्हटले. आईन्स्टाइनच्या फील्ड एक्केशनढ्वारे हबलच्या नियमाचे स्पष्टीकरण देता आले. विश्व प्रसरण पावत होते. दीर्घिकांचे गुच्छ गुरुत्वाकर्षणाने एकत्र राहिले होते, पण निरनिराळे गुच्छ एकमेकांपासून दूर जात होते कारण प्रसरण पावणारे विश्व त्यांना दूर खेचत होते. विश्‍वातील प्रत्येक घटक एकाच गतीने प्रसरण पावतो अशी कल्पना केल्यास हबलला जे दिय़ले नेमके तेच आपल्याला दिसून येईल. स्थानिक गटाबाहैरच्या दीर्घिका आपल्यापासून दूर जाताना दिसतील. त्या जितक्या दूर असतील, तितक्या त्या वैगाने दूर जाताना दिसतील. म्हणजे आपण कोणी विशेष आहोत असे नाही. दुसऱ्या कोणत्या तरी दीर्घिकेवखन आपण आकाशाकडे पाहिले तर आपल्याला हीच स्थिती दिसेल. दीर्घिकांचे गुच्छ मुद्दामच आपल्यापासून दूर जात आहेत असे नसून ते सर्व एकमेकांपासून दूर जात आहेत. आईन्स्टाइनचा सिद्धांत व हबलचा नियम यांच्यावर आधारित, प्रसरण पावणाऱ्या विश्वाच्या कल्पनेतून विश्‍वाची सुरुवात व शेवट या संबंधीचा प्रश्‍न आपल्यासमौर येतो. महास्फोट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now