सूर्य | HOW DID WE KNOW ABOUT SUNSHINE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
156 KB
Total Pages :
21
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)16
किरणोत्सर्गी पदार्थातून निघणारा किरणोत्यर्ग अणूंहूनही लहान कणांचा असल्याचे दियून आले. है कण अणूंहूनही
लहान असे परमाणू (सब अँटॉमिक पार्टिक्ल्स) होते. अणूंहून लहान असे कण अस्तित्वात असतील, तर कदाचित
आपल्या आजूबाजूची द्रव्येदेखील अणूपेक्षा लहान असणाऱ्या सूक्ष्म कणांची बनली असतील.
अर्नेस्ट रदरफोर्ड (१८७१-१९३७) या इंग्रज पदार्थविज्ञानशात्रज्ञाने सामान्य अणूंवर किरणोत्सर्गी द्रव्यातून बाहेर
पडणाऱ्या परमाणूंचा मारा केला. यापैकी काही कण मारा केल्या जाणाऱ्या अणूंतून आरपार गेले पण काही मात्र
कोणत्याही दिशांना उसळले.
जे काही थोडे परमाणू उसळले त्यावरून व त्यांच्या उसळण्याच्या दिशेवरून रदरफोर्डने १९११ साली असे दाखवून दिले
की अणूचे वस्तुमान है अणूच्या केंद्रस्थानी, एका चिमुकल्या 'गाभ्या'त (न्युक्लीयस) एकवटलेले असते.
या चिमुकल्या गाभ्याभोवती 'इलेक्ट्रॉन' नावाचे कण अणूत भरलेले असतात. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान अगदीच कमी असते.
सरपण जाळण्यासारख्या सर्वसामान्य रासायनिक बदलात अणूंतील इलेक्ट्रॉनमची फेररचना होते. त्यांच्या लहानशा
आकारामुळे त्यांच्यातील थोड्याशाच वस्तुमानाच ऱ्हास होतो व थोडीशीच ऊर्जा निर्माण होते- याची आपल्याला सवय
आहे.
याउलट किरणोत्सर्गी द्रव्यात ही फेररचना गाभ्याच्या आतच होते. या कणांचे (प्रोटॉन्य व न्यूट्रॉन्स) वस्तुमान
इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत सुमारे २००० पट अधिक असते. फेररचना होताना म्हणूनच त्यांच्या वस्तुमानाचा मोठ्या
प्रमाणावर ऱ्हास होतो व इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते.
दुसर्या शब्दात सांगायचे तर किरणोत्सर्गाचा अणुशक्तीशी संबंध असतो.
अणुऊर्जा हा ऊर्जेचा प्रचंड खोत आहे, पण हा बहुतांशी अणूच्या गाभ्यात असतो आणि तिथेच राहतो म्हणून लोकांना
याची माहितीच नव्हती. योगायोगानेच किरणोत्य़र्गाचा जेव्हा शीध लागला, तेव्हाच अणुशक्तीचे अस्तित्व समजून आले.
तथापि, एकदा ते माहीत झाल्यावर, अणुशक्ती हा सूर्यप्रकाशाचा ऊर्जास्रोत असेल असे लोकांच्या लगेच लक्षात आले.
सूर्य जर किरणोत्सर्गी असेल, तर त्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होईल. शिवाय, ही ऊर्जा इतक्या संथगतीने बाहेर
पडेल की सूर्याचा स्फौट होणार नाही. त्याऐवजी ही ऊर्जा संथ व नियमित गतीने निर्माण होईल; ती अब्जावधी वर्षांपायून
निर्माण होत असेल आणि भविष्यातही अब्जावधी वर्षांपर्यंत होतच य॒हील. है आदर्श उत्तर दिसत होते.
यात एकच अडचण होती. सुरुवातीला खूप गुंतागुंतीचे अणू असणाऱ्या काही थोड्या मूलद्रव्यांतच किरणोत्यर्ग आढळला
होता. सूर्यात असे अणू असल्यास ते अगदीच कमी प्रमाणात असणार.
सूर्याच्या ऊर्जेपैकी सूक्ष्म प्रमाणच या किरणोत्यर्गी द्रव्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचे असणार, कारण सूर्यात पुरेसे
किरणोत्यगीं अणू नाहीत. किरणोत्यर्ग ही जरी आदर्श परिस्थिती असली, तरी ते 'निश्चित उत्तर' नव्हते.
User Reviews
No Reviews | Add Yours...