भूतबाधा मनोविकार आणि अंधश्रद्धा | BHOOTBADHA, MANOVIKAR ANI ANDHSHRADHA

Book Image : भूतबाधा मनोविकार आणि अंधश्रद्धा  - BHOOTBADHA, MANOVIKAR ANI ANDHSHRADHA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रदीप पाटकर - PRADEEP PATKAR

No Information available about प्रदीप पाटकर - PRADEEP PATKAR

Add Infomation AboutPRADEEP PATKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नाही. काम करू शकत नाही. विचित्र वेडगळ निरर्थक वाचनांवर तो विश्वास ठेवतो तो त्याप्रमाणे वागतो. उदाहरणार्थ त्याला वाटते की, लोक त्याच्याविरुद्ध आहेत. तर तो त्यांच्याशी भांडतो, जेवणात विष घातले आहे असे वाटून जेवण टाळतो. त्याला कुणी जवळ नसताना बोलणे ऐकू आल्याचा भास होतो. शिव्या ऐकू येतात, त्यांना तो उत्तरे देऊ . लागतो. तो हसतो, बरळतो, रडतो पण सोरे स्वत:शीच. कुठे कसे वागावे हे त्याला हळूहळू कळत नाही. स्वतःचे दैनंदिन कार्यक्रम उदा. आंघोळ करणे, कपडे घालणे, लघवीसंडास ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी जाऊन करणे रुग्ण नीट करीत नाही. उन्मादावस्थेत आवरत माही. त्याला सांभाळणे सर्वांना कठीण होऊन जाते. बडबड हळूहळू न कळण्याइतकी असंबद्ध किंवा अस्पष्ट होते. आजार जुनाट होत जातो, व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होतो, रोगी एक त्रासदायक लोढणे ठरतो. प्रचलित अंधश्रद्धा :- कुणीतरी रुग्णावर करणी केली आहे, किंवा त्याला भूतबाधा झाली आहे, असे वाटते. मग त्यावर अंगारा लावणे, उतारा करणे, मारहाणीने भूत उतरविणे, बळी विधी करणे इ. केले जाते. किंवा अनोळख्या गावी गेल्यास तेथले गावकरी रोग्याचे नशिब चांगले* असेल तर त्याला तेथलेच गावकरी, दैवी पुरुष, समजतात. ' खाण्याची ओढ नाही, कपड्यांची हौस नाही, कशाचा मोह नाही, घाणेरडे व चांगले एकाच मापाने मोजतो, देवाशी बोलत असतो, फक्त हंकाराने मोठ्या प्रश्नांची उत्ते देतो, कशातच मन. गुंतले नाही, विरक्त राहतो.'' असा अर्थ लावून पूजा केली जाते. घडलेल्या चांगल्या घटनांचा त्याच्या कृतीशी अर्थ लावून त्याचे कौतुक केले जाते. (उपचार मात्र केला जात नाही.) मंदबुद्धी प्रमुख लक्षणे :- शारिरीक वाढीबरोबर त्या प्रमाणात बुद्धीची वाढ होत नाही. वय वाढले तरी अक्कल वाढलेली दिसत नाही. जसजसे मूल मोठे होत जाते तसतसे दैनंदिन कार्यक्रमात त्याचा ढिलेपणा लक्षात येऊ लागतो. कामे परत परत सांगावी व शिकवावी लागतात. आत्ता सांगितलेले थोड्यावेळाने विसरले जाते. अभ्यासात मागे पडून रोगी परत परत नापास होत राहतो. मुलगी असेल तर घरातले काम शिकू शकत नाही. स्वत:ची काळजी धेणे जमत नाही. ही आपली कमतरता जाणवल्यास रोगी दु:खी होतो. मंदबुद्धीच्या रोग्याचे वागणे पोरकट व विचित्र असते. कधीकधी सायकोसिस होऊ शकतो व त्यातून लवकर सुधारणा होत नाही. अशी मुलगी वयात आल्यावर वाईट प्रवृत्तीचे लोक तिचा गैरफाथदा घेऊ शकतात. प्रचलित अंधश्रद्धा / गैरसमज :- हा आजार घरच्या दैवताचा कोप समजला जातो, व तो कोप घालविण्यासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. प्रचलित वैद्यकिय उपचार पुरेसे यशस्वी ठरत नाहीत. आईवडिलांच्या असहाय परिस्थितीचा फायदा मांत्रिकांपासून वाईट डॉक्टरांपर्यंत सगळे घेतात व आशा दाखवून पैसे उकळतात. अशी २८ भूतबाधा, मनोविकार आणि अंधश्रद्धा मुले गावातल्या दुष्काळाला कारणीभूत धरली जातात, अशुभ समजली जातात. त्यांचा बळी देखील दिला जातो. अघोरी साधनेसाठी अशी मुले बळी म्हणून वापरली जातात. क्वचित कधी अशा माणसांचाही महाराज होऊन जातो. मिरगी / आकडी / अपस्मार / एपीलप्सी प्रमुख लक्षणे :- अचानक माणूस जागच्या ल कोसळून पडतो, ओरडतो, बेशुद्ध होतो, हातापयांना झटके (आचके) येतात, तोंडातून फेस येतो. शुद्ध आल्यावर थोडा वेळ माणूस गोंधळल्यासारखा वागतो. झटका अर्धवट झाल्यास किंवा हा प्रकार टेपोरललोब एपीलेप्सीचा असल्यास माणूस खाली पडत नाही. तर अचानक विचित्र बडबडतो, विक्षिप्त हातवारे करतो, अंगावशचे कपडे फाडतो, वोरे प्यायल्यासारखा पळत सुटतो, प्रचंड ताकद आल्यासारखा मारहाण करतो, विचित्र भाषा बोलतो, होणाऱ्या भासांना उत्तरे देतो. सौम्य अटॅक आल्यास रोगी फक्त विचित्र हातवारे काही क्षण करतो. त्याच्या हातातल्या वस्तू खाली पडतात. पूर्वी कधीकाळी काही ऐकलेले पाहालेले बडबडतो. कधीकधी फक्त विस्मृतीचे झटके येतात व काही तास, काही दिवस, काही महिने माणूस स्वत:ची व इतरांची ओळख विसरतो, वेगळे आयुष्य जगू लागतो. अँटंकमधले रोग्याला काही आठवत नाही. प्रचलित अंधश्रद्धा गैरसमज या आजारासही दैवी कोप समजले जाते. झटके येत असल्यास वेगवेगळे दैवी उपचार, मंत्रोपचार केले जातात. नीट न समजल्याने वैद्यकिय उपचारही योग्यप्रकारे केले जात नाहीत. अर्धवट झटक्याला भूतबाधा समजली जाते. झटके चालूच राहिल्यास मृत्यू ओढवू शकतो. अशावेळी त्याला कुणीतरी मूठ मारल्याचा अंदाज व्यक्‍त केला जातो. वेळोवेळी झटके येऊन मंदबुद्धीचा आजार झाल्यावर त्याला कुणाची तरी दृष्ट लागल्याची खात्री वाटते. अँटॅकच्या वेळी त्याची बडबड ऐकून लोकांनां दैवी प्रकाराची, “भूत संचाराची खात्री पटते. विस्मृतीत रोगी वावरत असल्यास त्याच्यात परक्या आत्म्याने प्रवेश केल्यामुळे तो स्वत:स विसरला असे समजले जाते. अटॅक अचानक थांबल्यास दैवी उपचारास श्रेय मिळते. नैराश्य प्रमुख लक्षणे :- झोप उडते, भूक मंदावते, मनुष्य प्रथम अस्वस्थ, नंतर निराश होतो. साऱ्याच शारीरिक व मानसिक प्रक्रिया मंदावतात. कशातच रुग्णाचे मन लागत नाही. जीवन जगणे कठीण जाते. जीवन संपविण्याचे, आत्महत्येचे विचार उगीचच मनात येऊ लागतात. संसारातले लक्ष उडून जाते. विरक्ती येते. बऱयाच वेळी शारिरीक त्रासानंतर भूतबाधा, मनोविकार आणि अंधश्रद्धा २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now