अन्तरिक्ष | HOW WE FOUND OUT ABOUT OUTER SPACE?

HOW WE FOUND OUT ABOUT OUTER SPACE? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकार अभ्निबाणातून जाण्याचा होता. (सिरानोचे नाक खूप मोठे होते आणि त्याची चेष्टा करणाऱ्या अनेक लोकांशी त्याने द्रंद्रयुद्धे केली. त्याच्यासंबंधी एक खूप प्रसिद्ध नाटकही आहे. लोकांना नेहमी त्याचे मोठे नाक आणि त्याची द्ंद्रयुद्धे आठवतात पण तो एक विज्ञानकधा/ कादंबरीकार होता हे बरेचदा विसरलेच जाते. ) त्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनी शास्त्रज्ञ अन्निबाणाचा अंतराळ प्रवासासाठी उपयोग करण्याची चर्चा करू लागले. कोन्स्टॅन्टीन इ. त्सिओल्कोव्स्की हा रशियन शास्त्रज्ञ त्यापैकी एक होता. १७ सप्टेंबर १८५७ ला त्याचा जन्म झाला. वयाच्या ९ व्या वर्षी कानाच्या जंतुसंसर्गामुळे कर्णबधिर झाल्यामुळे त्या काळच्या रशियात त्याल सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेणे जवळपास अशक्यच होते. तरीही, पुस्तकातून हवे तेवढे ज्ञान त्याने मिळवले आणि त्याच्या काही कल्पना अगदी नव्या, क्रांतिकारी होत्या. १८९५ साली त्याने अंतरिक्षयानाबद्दल लिहायला सुरुवात केली. सिरानौप्रमाणेच अंतरिक्षयानासाठी अग्निबाणांचा वापर केला जावा, असे त्सिओल्कोव्स्कीला वाटत होते. मात्र त्यात बंदुकीची दारू वापरणे त्याला मान्य नव्हते. पॅराफिन तेलासारखे द्रवरूप इंधन वापरावे असे त्याचे मत होते. अशा इंधनामुळे बंदुकीच्या दारूपेक्षा जास्त शक्ती मिळेल शिवाय ते द्रवरूप असल्यामुळे नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल. प्रत्यक्ष ज्वलनाच्या ठिकाणी किती इंधन पंपातून सोडले यावरून ज्वलन मंद किंवा शीघरगतीने करता येईल. आपल्या आजच्या बहुतेक वाहनात आपण द्रवरूप इंधनच वापरतो. उदाहरणार्थ, मोटारगाड्या आणि विमानात आपण पेट्रोल वापरतो. अर्थात शक्ती मिळण्यासाठी पेट्रोलबरोबर आपण हवेतील प्राणवायूचाही उपयोग करतो, आपली वाहने जेव्हा हवेतून प्रवास करतात तेव्हा ही २८ । शोधांच्या कथा । अंतरिक्ष अगदी साधी-सोपी गोष्ट असते. अंतराळाच्या निर्वात पोकळीतून प्रवास करणे ही फारच निराळी बाब आहे. तिथे आजूबाजूला हवा नाही म्हणून अशा निर्वात पोकळीतून प्रवास करताना अम्निबाणाला आपल्याबरोबर प्राणवायूदेखील नेणे आवश्यक ठरते. थंड केलेला द्रवरूप प्राणवायू लहान जागेत ठासून भरता येतो. त्सिओल्कोव्स्कीला हे समजले होते. १९०३ साली उड्डाणविषयक मासिकात त्याने अग्निबाणांविषयी सविस्तर विवेचन करणारे अनेक लेख लिहायला सुरुवात केली. द्रवरूप इंधन आणि द्रवरूप प्राणवायू यांची चर्चा तर त्याने केलीच, शिवाय, अंतराळात वापरण्याचे विशेष कपडे, अंतराळातील वसाहती यासारख्या अनेक गोष्टींचा त्याने ऊहापोह केला. पुढील आयुष्यात त्याने 'पृथ्वीबाहेर' नावाची एक विज्ञान कादंबरीही लिहिली. 3 त्सिओल्कोव्स्कीने जरी अग्निबाणांसंबंधी बरेच संशोधन केले असले तरी प्रत्यक्ष अग्निबाण बनविण्याचा मात्र त्याने प्रयत्न केला नाही. १९ सप्टेंबर १९३५ रोजी तो मरण पावला. रशियात लोक त्याच्याबद्दल आदराने बोलतात पण रशियाबाहेर फारच थोड्या लोकांना तो माहीत आहे. शोधांच्या कथा । अतरिक्ष । २९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now