डी एन ए | HOW DID WE FIND ABOUT DNA?

HOW DID WE FIND ABOUT DNA? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रेणू हे महाकाय रेणू नव्हते. त्यांत फ़क्त चारच वेगवेगळे न्युक्लिओटाइड्स होते व न्युक्‍्लीक अँसिडच्या रेणूंत चारपैकी प्रत्येकाचा एकच रेणू होता. प्रत्येक पेशीचे कार्य निरनिराळ्या असंख्य वितंचकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते व त्यासाठी ते विशिष्ट मात्रेत असावे लागते. ही वितंचके प्रथिनांच्या रेणूंची बनलेली असतात. प्रत्येक नवी पेशी आपल्याला आवश्यक ते वितंचक स्वत:च तयार करते, याचा अर्थ त्या पेशीतच या वितंचकाचा रेणू योग्य प्रकारे बनवण्याचा आराखडा (ब्ल्यू प्रिंट) असणार. प्रथिनाच्या एखाद्या गुंतागुंतीच्या रेणूतच प्रथिनाचा दुसरा रेणू बनवण्याची गुंतागुंतीची माहिती असू शकेल हे नक्की. चार न्युक्लिओटाइड्सचा बनलेला डीएनएचा लहानसा रेणू या मोठ्या कामासाठी फारच चिमुकला वाटत होता. अर्थातच न्युक्लीक असिडमध्ये फक्त चारच न्युक्लिओटाइड्स असतात, हे लेव्हिनचे म्हणणे अखेर चुकीचेच ठरले. पेशीतून न्युक्लीक अँसिड काहून घेण्यासाठी त्याने वापरलेले तंत्र बरेचसे आडंदांडपणाचे होते. त्यामुळे रेणूचे तुकडे पडत असत. जीवरसायनशास्त्रज्ञांना जसजसे न्युक्लीक अँसिड नाजूक प्रकारे काढता येऊ लागले, तसतसे त्यांना अधिकाधिक लांबलचक रेणू मिळू लागले. अखेर, डीएनएदेखील प्रथिनाच्या रेणूप्रमाणेच किंवा त्याहूनही महाकाय रेणूंचा बनला होता, असे दिसून आले. तरीही जीवरसायनशास्त्रज्ञांना प्रथिन हाच सजीवांमधील सर्वात महेत्त्वाचा रेणू असण्याची इतकी सवय झाली होती, की त्यांनी डीएनएकडे दुर्लक्षच केले; पण मग एक दिवस मात्र सर्वच बदलून गेले. २८ | डीएनए ऱे डीएनएचा विजय न्युमोनिया या आजाराचे जंतू “न्युमोकॉक्‍्सी' यांचा शास्त्रज्ञ बर्‍याच काळापासून अभ्यास करत होते. 'न्युमोकॉक्सी'चे एकवचन आहे 'न्युमोकोकस'. 'न्युमोकॉक्सी'चे दोन प्रकार असतात. एका प्रकारात या जिवाणूंच्या पेशींवर गुंतागुंतीच्या एका शर्करेचे गुळगुळीत आवरण असते. या प्रकाराला म्हणतात 'न्युमोकोकस-एस' (म्हणजे 'स्मूथ'). दुसऱ्या प्रकारात असे आवरण नसते म्हणून ती खडबडीत दिसते. तिला म्हणतात 'न्युमोकोकस-आर' (म्हणजे रफ). 'न्युमोकोकस-आर'मध्ये गुंतागुंतीच्या गुळगुळीत द्रव्याचे आवरण बनदण्यासाठी आवश्यक असणारे जनुक नसते. १९२८ साली फ्रेडरिक रीस ग्रिफिथ, ज्युनियर (१८९१-) या अमेरिकन जीवशास्त्रज्ञाने 'न्युमोकोकस-एस' असलेले बरेचसे द्रव्य त्यातील सर्व जिवाणू मरून जाईपर्यंत तापवले. मृत जिवाणू असणारे हे द्रव त्याने जिवंत 'न्युमोकोकस-आर' असणाऱ्या द्रवात मिसळले. 'न्युमोकोकस-आर'ची संख्या वाढताना त्यांचे रूपांतर 'न्युमोकोकस- एस'मध्ये झाल्याचे त्याच्या लक्षात आले. 'न्युमोकोकस-एस' हे जिवाणू जरी जीवित नसले, तरी त्यातील गुळगुळीत आवरण तयार करणारे जनुक अद्यापही कार्यक्षम होते. म्हणून हे जनुक 'न्युमोकोकस-आर' जनुक नसणाऱ्या जिवाणूंमध्ये मिसळण्यात आल्यावर जिवाणूंनी हे गुळगुळीत आवरण तयार केले व ते 'न्युमोकोकस-एस' बनले अर्थातच, थास्त्रज्ञांनी हे जनुक वेगळे करण्याचा प्रयत्न केला, त्याला त्या वेळी 'बदलामागील तत्त्व' (ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल) डीएनए | २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now