वैविध्याची नाकेबंदी | VAIVIDHYACHI NAKEBANDI

VAIVIDHYACHI NAKEBANDI by पुस्तक समूह - Pustak Samuhसुनीति धारवाड़कर - SUNITI DHARWADKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुनीति धारवाड़कर - SUNITI DHARWADKAR

No Information available about सुनीति धारवाड़कर - SUNITI DHARWADKAR

Add Infomation AboutSUNITI DHARWADKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संदर्भ देऊ शकलं. त्यानं लोकहिताभिमुख आणि पर्यावरणीय स्वरूपाच्या पर्यायी जंगलसंवर्धनाचा पाया रचला. पर्यायी जंगलसंवर्धनशास्त्र जनसामान्यांच हित जपू शकतं. यामध्ये जंगल संसाधनाकड पर्यावरणातील इतर संसाधनांपासून अलग म्हणून, पाहिले जात नाही. जलय़रोत व प्राणीसृष्टी या अन्य निसर्गव्यवस्थांपासून वेगळी तोडून अशी जंगल-व्यवस्था विचारात घेतली जात नाही. जंगल-संरक्षण व संवर्धन, पशुपालन आणि शेती यांची जैव सांगड घातली जाते. जंगलाची आर्थिक किंमत ही व्यापारी सागाच्या किंमतीएवढी मर्यादित केली जात माही. उत्पादनक्षमता, उत्पादन व आर्थिक किमत यांची व्याख्या ही एकात्म परिसंस्था आणि बहुद्देशीय उपयुक्तता यांच्या संदर्भात केली जाते. झाड-झुडपं, तंतू, जनुक-समूह इत्यादींच्या दृष्टीने आदिवासी आणि जंगलांवर आधारित समाज यांच्यासाठी गुंतागुतीची परिसंस्था ही उत्पादनशील आहे. तर वनाधिकाऱ्यांच्या मते वनपरिसंस्थेचे हे घटक निरुपयोगी, अनुत्पादित व टाकाऊ आहेत. __ 'चिपको'सारखी आंदोलनं शेतीप्रधान समूहांची आंदोलनं आहेत. शेतीला आधारभूत असलेल्या जंगलाचा विनाश थांबविण्यासाठी ती सुरू झाली. पिनान व सारवाकच्या आदिवासींनी 'टिबर-जाम' आंदोलन केलं. जंगल. आणि त्यांचे जनसमूह यांना नष्ट करणाऱ्या जंगलब्यवस्थापन व्यवस्थांच्या पद्धतींविरुद्धचा हा लढा आहे. आदिवासी यासंबंधी म्हणतात, ही जमीन आमच्या पूर्वजांची आणि त्यांच्याही पूर्वजांची आहे. यातलं जे काही थोडसं उरलं आहे, ते आता वाचवलं नाही, तर आपल्या मुलाबाळांना काहीच राहणार नाही. आमची जंगलं नागरली गेली; टेकड्या सपाट झाल्या. आमचं पाणी, आमचे झरे प्रदूषित झाले वनस्पती जीवन नष्ट झालं. जंगलातील प्राणी मारले तरी गेले किंवा त्यांना पळून जावं लागलं आम्ही मरेपर्यंत हा रस्ता अडवू (अवेक माताइ अमे मानेऊ मापत)”'' वैविध्याची नाकेबंदी ! - १४ जैवविविधतेचा ऱ्हास ज्ञानेपद्धतीमुळे , र वर्चस्ववादी ज्ञानपद्धतीमुळे स्थानिक ज्ञानाचं आणि -एकूण समाजाचं अनेक अंगानं नुकसान होतं. व्यापारी लाभापुढं जैवविविधता व निसर्ग यांचं जतन व संवर्धन या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही. त्यातून मग पर्यावरणाच्या ' संदर्भात आणि लोकसमूहांसाठी पोषण आणि उदरनिर्वाहाच्या दृष्टीने महत्त्वाचं स्थान असलेले वृक्ष आणि पिकं यांचा 'तण' म्हणून नाश केला जातो. विविधतेच्या नाशाच्या परिणामाची तमा न बाळगता एकप्रजातीय लागवड आणि हरित-क्रांती यांसारखे जंगलाचा व शेतीचा ऱ्हास करणारे उपक्रम राबविले जातात. यासाठी हीच एकमात्र पद्धत आहे, हाच एकमेव पर्याय आहे अशी हाकाटीही पिटली जाते. अस्तित्वातच नसलेल्या लाभांचं गुणगान गायलं जातं. जैवविविधतेचा ऱ्हास अनेक पद्धतीनं घडविला जातो, अनेक स्वरूपांत केला जातो. तण आणि पसंतीच्या जाती वर्चस्ववादी ज्ञानपद्धतीमुळे अनेक अर्थानं सृष्टीला आणि मानवी जीवनाला योगदान देणारे वृक्ष, झाडं-झुडपं हे 'निरुपयोगी तण म्हणून नष्ट केले जातात केवळ व्यापारी दृष्टीने फायद्याच्या असलेल्या पण पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या जातीनांच पसंतीच्या ठरवून प्राधान्य दिलं जातं. त्यांची लागवड केली जाते. यातून विविध गरजा पूर्ण करणाऱ्या वृक्ष-प्रजाती आणि पोषणमूल्य असलेली पिकं या दोघांचंही तण, टाकाऊ, फुटकळ म्हणून उच्चाटन केलं जातं. कुत्रिम जंगलं शास्त्रीय जंगलसंवर्धनामध्ये वनव्यवस्थापनाचा उद्देश बाजारयोग्य लाकडाचं.' उत्पादन जास्तीत जास्त वाढविणं हा आहे. त्यानुसार अशा प्रकारच्या जंगलांना स्वाभाविक (४०10081) ठरवलं जातं तर विविधतेनं समृद्ध असलेल्या उष्ण प्रदेशीय झे भ र घोषित न्न न दै न जगलांना अस्वाभाविक (&00070181) म्हणून घोषित केलं जातं. कारण त्यामध्ये बाजारीकरणाच्या व औद्योगिकरणाच्या रूढ मानदंडामध्ये न बसणाऱ्या प्रजाती * असतात. श्री. ट्रूप याच्या म्हणण्यानुसार. सध्या अस्तित्वात . असलेल्या अ-स्वाभाविक परिस्थितीतून योग्य 'स्वाभाविक' जंगलं प्राप्त करताना तात्पुरता त्याग करावा लागणारच ! बैविध्याची नाकेबंदी । - १८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now