सत्यशोधक विवाह समारोह | SATYASHODHAK VIVAH SAMAROH

Book Image : सत्यशोधक विवाह समारोह  - SATYASHODHAK VIVAH SAMAROH

More Information About Authors :

अनीस - ANIS

No Information available about अनीस - ANIS

Add Infomation AboutANIS

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सत्यशोधक विवाह समारंभ 9 ली फेरी :ः आम्ही आमचे जीवन स्नेह आणि प्रेमासह एक दुसऱ्यासाठी समर्पित करु. २ री फेरी : आम्ही सृष्टिनिर्मात्याने बनवलेल्या सर्व जीवमात्रांचे संरक्षण आणि संवर्धन करु. दुर्बल, अनाथ, असहाय्य प्राणिमात्रांना यथाशक्ती मदत करु. ३री फेरी * आम्ही एक दुसऱ्यांना नेहमी आदर आणि सन्मान देऊ. ४ थी फेरी : जाती, धर्म, वंश किंवा लिंग यावर आधारलेल्या भेदभावांचा आम्ही त्याग करू. आम्ही स्वतः मनुष्य आहोत आणि मानवताच स्वीकारु. ५ वी फेरी : परिश्रम करणारांना आम्ही प्रतिष्ठित मानतो. मेहनत करुन आम्ही आमचे जीवन सफल आणि समृद्ध बनवू. आमचा परिवार, समाज व देश यांचे नाव उज्ज्वल करु ६ वी फेरी : आम्ही विवेकपूर्ण तसेच तर्कनिष्ठ आचार आणि विचार ठेव. आम्ही आमचे शरीर निरोगी आणि सक्षम ठेवू, ज्यामुळे आमची ब॒द्धीस॒द्धा निरोगी व सतेज राहील ७ वी फेरी : आम्ही आमचे तन - मन - धन समृद्ध करू. तसेच आम्ही जन्म देणाऱ्या नव्या जीवाचे अतिशय उत्तम पालन - पोषष करण्यास स्वतःला सक्षम बनवू. ७) मंगलगीत : 3 विधीप्रमुरव वधू - वरांना मंचावरील खुर्च्यांवर बसण्यास सांगतील. गायक मंगलगीत म्हणतील. प्रत्येक कडव्याबरोबर *'शुभमंगल सावधान” म्हटले जाईल, तेव्हा लोक पुष्पपाकळ्यांची वृष्टी वधू - वरांवर करतील. (सर्व लोकांना पुष्पपाकळ्या आधीच वाटल्या जाव्यात.) ही मंगलगीते म. फुले यांच्या मूळ आशयाशी सुसंगत पद्धतीने लिहिली आहेत. मंगलगीत वधूने म्हणावे - आयुष्यभर देऊनि प्रेम तू, साथी मला मानावे परस्परांच्या उन्नतीस्तव सदैव प्रयत्नशील रहावे । स्त्रियांचे अधिकार ते कधीही नको झिडकारू पत्नी असे पुरुषांची प्रेरणा हेही नको विसरू !॥ (शुभमंगल सावधान) वराने म्हणावे - अन्य स्त्रिया मज बहिणीसम तू एकच माझी प्रिया श्रष्ठांच्या साक्षीने आज तुला वरिले सभामंडपी मी या | दोन चाके आहोत आपण संसारूपी या रथाची त्याला गती द्यावया हवी, मजल गाठण्या ध्येयाची । (शुभमंगल सावधान) सत्यशोधक विवाह समारंभ दोघांनी एकत्र म्हणावे - दोघे मिळून आम्ही उल्लचती करीत सदैव पुढे राहू अंधश्रद्धांना दूर ठेवून, नेहमी सत्याच्या मार्गाने जाऊ । परिवार, समाज अन्‌ देशाच्या सन्मानाचे राखू आम्ही ध्यान चूक एरवादी झालीच हातून तर सजग ठेवू आपुले भान | उपस्थित लोकांच्याकडून काव्यमय शुभाशीर्वाद गायिका १. विवाहबद्ध झालात आज तुम्ही सर्वदा सुरवी रहा । तुमची प्रगती ही होत शहो, जीवनात यशस्वी व्हा ॥। गायिका २. सत्कर्मरत राहून सदा साच अन्‌ मधुर वाणी ठेवा । मातृ-पितृ क्रणाबरोबर समाजक्रणातूनही मुक्‍त व्हा ॥ गायिका १. सुरवी, संपन्न, समृद्ध सर्वदा जीवन तुमचे व्हावे । आयुष्यभर सदा सर्वदा सत्य कर्म करीत रहावे ॥ गायिका २. हेच आमुचे शुभाशीर्वाद तुम्हा या मंगलसमयी । जीवनातील प्रत्येक वळण व्हावे तुम्हा सुरवदायी ॥| (शुभमंगल होवो, शुभमंगल होवो, हा विवाह शुभमंगल होवो.) मंगलगीत संपल्यानंतर वधू-वर पुढील शपथा घेतील. ६) शपथ : वर शपथ घेतो : ““मी सर्वांसमक्ष व निर्मिकाचे स्मरण करुन अशी शपथ घेतो की. मी आजपासून पत्नी म्हणून तुझा स्वीकार करतो. मी सदैव प्रेमाने व आदराने तुझा सन्मान रारवीन व सर्वकाळ तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुला स॒रवी ठेवेन.”*




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now