धेराचा स्फोट | HOW DID WE KNOW ABOUT VOLCANOES ?

Book Image : धेराचा स्फोट  - HOW DID WE KNOW ABOUT VOLCANOES ?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
16 मोठे उद्रेक होण्याएवढी उष्णता पृथ्वीच्या पोटात दडली असण्याचे कारण नाही -- तरीही ज्वालामुखींचे उद्रेक होतातच. याचे उत्तरही परत एकदा युरेनियमकडूनच मिळते. युरेनियमच्या कणांचे जस्तात रूपांतर होताना सूक्ष्म प्रमाणात उष्णता निर्माण होतै. युरेनियमचे रूपांतर इतक्या संथगतीने होते की, उदाहरणार्थ, एक पौंड वजनाच्या युरेनियमचे खपांतर होताना निर्माण झालेली सूक्ष्म प्रमाणातील उष्णता आपल्या लक्षातही येत नाही. तरीही, सबंध जगातील अब्जावधी टन युरेनियमचे संथगतीने जस्तात रूपांतर होताना निर्माण झालेल्या उष्णतेचा विचार केला तर ती बरीच असते असे लक्षात येईल. शिवाय, युरेनियमखैरीज इतर किरणोत्यर्गी द्रव्येही आहेतच. सर्व किरणोत्यर्गी द्रव्यांतून निर्माण होणाऱ्या सर्व उष्णतेचा एकत्रितपणे विचार केला असता असे दियून येते की, किरणोत्य़र्गातून पृथ्वीच्या मध्यकवचात जमा होणारी उष्णता व पृथ्वीच्या कवचातून बाहेर पडणारी उष्णता या जवळजवळ समानच आहेत. निराळ्या शब्दात सांगायचे तर पृथ्वी अजिबातच थंड होत नाही. किरणोत्यर्गामुळे तिचे अंतरंग उष्णच राहते. अर्थात, युरेनियम व इतर किरणोत्य़र्गी द्रव्ये जस्त व इतर किरणोत्सर्गी नसणाऱ्या द्रव्यात रूपांतरित होण्याने हळू हळू नाहीशी होत आहेत. तथापि, या किरणोत्य़र्गी द्रव्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा प्रभाव दुर्लक्ष करण्याइतपत कमी होण्यासाठी आणखी अब्जावधी वर्षे जावी लागतील. म्हणजेच अब्जावधी वर्षांनंतर पृथ्वी इतकी थंड होईल की पृथ्वीवर ज्वालामुखी असणार नाहीत. परंतु, पृथ्वीचे अंतरंग सर्वत्र सारखेच उष्ण असले तरी केवळ काही ठिकाणीच ज्वालामुखी का आढळतात? पृथ्वीचे कवच सर्व ठिकाणी सारखे नाही है त्याचे उत्तर असू शकेल. काही ठिकाणी हे कवच कमजोर दिसते; किंवा काही ठिकाणी तडे जाऊन त्यातून मध्यकवचातील उष्णता बाहेर पडत असावी. काही ठिकाणी तर ही उष्णता पृष्ठभागाच्या इतक्या वरपर्यंत येते, की जमिनीतील पाणी तापते. त्यातून गरम पाण्याचे झरे निघतात. काही वेळा है पाणी उकळू लागते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाफेने है पाणी जोराने हवेत वर फेकले जाते. गरम पाण्याच्या अशा प्रचंड कारंञ्याला 'गेझर' असे म्हणतात. मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडली की अर्थातच ज्वालामुखी तयार होतो. पृथ्वीच्या कवचातील कमकुवत स्थाने वाटेल त्या ठिकाणी नसतात. पृथ्वीवरील ५00 जिवंत ज्वालामुखींपैकी सुमारे ३00 तरी प्रशांत महासागराच्या किनाऱ्याजवळच्या वर्तुळाकार परिसरात आढळतात, तर आणखी सुमारे ८० ज्वालामुखी इंडोनेशियाच्या बेटांच्या परिसरात आहेत. ज्वालामुखींच्या या परिसराला बर्‍याच वेळा ज्वालामुखींचे वर्तुळ किंवा 'रिंग ऑफ फायर' असेच म्हटले जाते. ही बाब एकोणिसाव्या शतकातच शाखतकज्ञांच्या लक्षात आली. कदाचित प्राचीन काळी चंद्र पृथ्वीचा भाग असेल आणि ती निसटून गेल्यावर रिकाम्या झालेल्या जागीच प्रशांत महासागर बनला असेल. म्हणून या महासागराच्या भोवतालच्या जागी पृथ्वीचे कवच कमकुवत झाले असेल आणि त्यामुळेच त्या ठिकाणी ज्वालामुखी तयार झाले असतील. परंतु हे खरे नव्हते असे नंतर समजून आले. चंद्र कधीच पृथ्वीचा हिस्सा नव्हता असे आता शास्रज्ञांचे मत आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now