मायक्रोलहरी | HOW DID WE FIND ABOUT MICROWAVES?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
28
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कॅनेडियन-अमेरिकन शास्त्रज्ञाने रेडिओलहरीत कशा प्रकारे बदल
केल्याने त्या ध्वनिलहरीसारख्या जाणवतील हे शोधून काढते. मग
ध्वनिलहरींमधून निर्माण झालेल्या रेडिओलहरी ध्वनिलहरींमधीलत
फरकही दाखवून देऊ शकत. दुसऱ्या टोकाला अशा प्रकारे निर्माण
केलेल्या रेडिओलहरींचे रूपांतर परत ध्वनिलहरीत करता येत असे.
अशा प्रकारे तंत्रज्ञ रेडिओतून आवाज व संगीतदेखील ऐकवू शकत
असत. २४ डिसेंबर १९0६ रोजी रेडिओतून प्रथमच संगीत ऐकता
आले.
कालांतराने यात इतर अनेक सुधारणा झाल्या व आज आपल्याला
सर्वत्र दिसणारे रेडिओ व टेलिव्हिजन सेट तयार झाले.
मायक्रोवेव्हन या तघु रेडिओलहरींचा १९३0 सालापर्यंत
फारसा कशासाठीच उपयोग करण्यात येत नव्हता. त्यानंतर
दूरच्या अंतरावरील वस्तूंचा शोध घेण्यासाठी किरणोत्सर्गाचा वापर
करण्याचा प्रश्न निर्माण झाला.
यात विचित्र वाटण्यासारखे काहीच नाही, कारण दूरवरच्या
वस्तूंचा आपण याच प्रकारे शोध घेतो. दूरवरच्या वस्तूंकडून प्रकाश
परावर्तित झालेला आपल्याला दिसतो. त्यामधून मिळणाऱ्या
प्रतिमेवरून त्या वस्तूचा आकार व रंग, तसेच ती वस्तू साधारण
किती अंतरावर आहे हे आपल्याला समजते.
तथापि. प्रकाश पाण्यात खूप खोलवर जाऊ शकत नाही
म्हणून सागरातील वस्तू. आपल्याला दिसत नाहीत. ध्वनिलहरी
पाण्यातून जाऊ शकतात, पण त्या इतक्या लांब असतात, की
पाण्यातील लहानशा वस्तूंपासून त्या परावर्तित होत नाहीत:
त्याऐवजी त्या त्यांच्या बाजूने वळून जातात.
पणं मग आपल्या कानांना ऐकू येणार नाहीत अशा अतिशय
आखूड लांबीच्या ध्वनिलहरींचा उपयोग केला आहे अशी कल्पना
२८. । मायक्रोलहरी
करा. अशा ध्वनिलहरींना 'अल्ट्रासाठंड' लहरी म्हणतात. (यां
लॅटिन शब्दांचा अर्ध आहे 'आवाजाच्या पलीकडे'.)
१९१७ साली पॉल लॅजव्हें (१८७२-१९४६) या फ्रेंच शास्त्रज्ञाने
अशा अल्ट्रासाउंड लहरी सागरात पाठवून त्यांचा प्रतिध्वनी पिळवता
येईल अशा यंत्रणेचा शोध लावला. या प्रतिध्वनीवरून, ज्या वस्तूवरून
या लहरी परावर्तित झाल्या होत्या त्या वस्तूचा आकार व आकारमान
सांगता येत असे. या लहरी त्या वस्तूपर्यंत पोचून त्यांचा प्रतिध्वनी
मिळेपर्यंतचा वेळ यावरून त्या वस्तूचे अंतरही गणिताने समजून
घेता येते. या पद्धतीला 'सोनार' म्हणतात. 'साउंड नॅव्हिगेशन
अँन्ड रॅजिंग (यातील रेंजिंग या शब्दाचा अर्थ आहे अंतर सांगणे)
या शब्दांच्या लघुरूपातून हा शब्द बनला आहे.
पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात सागरातील जर्मन
पाणबुड्या शोधण्यासाठी लँजर्व्हने ही पद्धत शोधून काढली. परंतु
सोनार यंत्रणा पूर्णपणे कार्यक्षम होईपर्यंत जागतिक युद्धाचा शेवट
होऊन जर्मनीचा पराभव झाला होता. युद्धानंतर मात्र या तंत्राचा,
सागराच्या तळाचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करण्यात आला.
१९३0 च्या दशकात जर्मनीबरोबर नव्याने युद्ध होण्याची
शक्यता दिसू लागली; आणि आता विमानांपासून मोठाच धोका
निर्माण झाला होता. रात्रीच्या वैळी न दिसणारी विमाने किंवा
ढगांच्या वस्ू्न जाणारी विमाने आपल्याकडे येत आहेत का हे
समजणे गरजेचे होते. त्यासाठी 'सोनार'चा उपयोग होत नव्हता,
कारण त्याचे कार्य त्यासाठी फार संध गंतीने ह्योणारे होतें.
प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाची
यासाठी गरज होती. या लहरी फार लांब असून चालणार नव्हते,
कारण त्या विमानाने परावर्तित झाल्या नसत्या. तसेच त्या जर फार
आखूड असतील, तर त्या वातावरणात धुके, धूर वा ढग असताना
पुरेशा दूरवर जाणार नाहीत. यासाठी मायक्रोलहरी हा योग्य पर्याय
मायक्रोलहरी । २९
User Reviews
No Reviews | Add Yours...