वैज्ञानिक जावीणा प्रकल्प | VAIGYANAIK JANEEV PRAKALAP
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
945 KB
                  Total Pages : 
10
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

प्रदीप पाटकर - PRADEEP PATKAR
No Information available about प्रदीप पाटकर - PRADEEP PATKAR
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्र.१८ 'हिस्टेरिया' रोगाविषयी माहिती द्या. हिस्टेरियाची लक्षणे कोणती ?
आपल्या मनाला होणारा त्रास, आपल्या भावना, आपले मत, आपल्या आवडी
निवडी या जेव्हा व्यक्तीला व्यक्त करता येत नाहीत, तेव्हा तो त्याच्या मनात दडपून
टाकतो. आणि विसरू पाहतो. पण त्या दडपलेल्या भावना, अन्तर्मनाला असह्य ताण .
देतात. दबलेल्या भावना, इच्छा, विचार, मग शारीरिक आजारांच्या लक्षणाद्वारे व
वर्तनांच्याद्वारे व्यक्त होतात. त्यामुळे ताण कमी होतो व ही लक्षणे होत असताना आतून
रोग्याला बरे वाटत असते. त्याला आजारात सहानुभूती, इतरांचे लक्ष, सवलती मिळतात.
आजारी पडल्याने संकटातून तात्पुरती सुटका होते. म्हणून मग हा आजार परत परत
होतो. सारे तपास (नॉर्मल) चांगले असतात. डॉक्टरांच्या तपासणीत आजार नसल्याचे
सिध्द होते. (मग बाहेरची बाधा समजली जाते) समाजात दबल्या जाणाऱ्यामध्ये हा
प्रकार जास्त होतो. म्हणून स्त्रिया व मुलांना हा आजार जास्त प्रमाणात होतो.
प्रमुख लक्षणे - बेशुद्ध पडणे, फिटस् (आकडी) येणे, हात, पाय जीभ लुळी पडे,
आंधळेपणा, अंगदुखी, डोके दुखी, पोटदुखी, विचित्र वर्तन, विचित्र बोलणे, (तात्पुरते)
. भ्रमिष्टपणा, तात्पुरती व तेवढ्याच विषयापुरती विस्मृती होणे, हातपाय हालत राहणे
इत्यादी काहीही लक्षणे होऊ शकतात. प्रसंगानुसार व प्रेक्षकांसमोर हे आजार होतात
नुसत्या सुचनेने पटकन बरेही होतात, पण परत परत होतात मानसिक ताण वाढला की
आजार होतात. प्रसंग टळला की बरे वाटते
कधी कधी.जनसमुहाला हा आजार एका वेळी होऊ शकतो. मधेच जनसमूह
ओरडू लागतो, उन्मादाने नाचू लागतो, सूचना दिल्यास रडू लागतो हसू लागतो, प्रत्येक
जण जागच्या जागी घुमू लागतो. मोठे संकट यायचे असल्यास त्या ताणाखाली असे
प्रकार होतात. त्याच बरोबर संमोहनाने, तल्लीन झाल्यावर हे प्रकार घडू शकतात
प्र.१९ हिस्टेरिया विषयी प्रचलित अंधश्रद्धा कोणत्या ?
आजारात नाट्य भरपूर, पण तपासात काही सापडत नसल्याने भूतबाधा,
बाहेरची बाधा समजली जाते. सूचनेने 'आजार बरे होत असल्याने अनेक मांत्रिकांचे
फावते. जागच्या जागी प्रकार बरे होत असल्याने (असले उपचार नाटकी पद्धतीने डॉक्टर
करीत नसल्याने त्यांना त्वरित यश मिळत नाही) मांत्रिक भगतांचे नाटक या केसेसवर
जोरात चालते. हितसंबंधी लोक आजारांप्रमाणे खोटे प्रकार करून दाखवितात व स्थान,
महात्म्य वाढवितात. अंगात येणे हा प्रकार संमोहनामुळे आणि हिस्टेरियल
व्यकतीमत्वाच्या लोकांमध्ये जास्त होतो
॥८॥ा टेट 22२2४२४६२2 २१२१२३४. 'मनोविकार आणि भूतबाधा'
प्र.२० दारूच्या व्यसनाची लक्षणे कोणती ?
. प्रमुख लक्षणे - कुठल्याही प्रकारे दारू मिळवणे व पिणे या शिवाय बाकी सारे
कामे व जबाबदाऱ्या याकडे माणूस दुर्लक्ष करू लागतो. त्याचा स्वभाव हेकट, तापट व
संशयी होत जातो. सहनशक्ती कमी होते. वेगवेगळे शारीरिक व मानसिक आजार,
अपघात होतात. रोग प्रतिकारक शक्ती. कमी होते. आपल्या प्रिय माणसांपासून तो .
. माणूस भावनेने दूर जातो. वेगवेगळे भास होऊ लागतात.
काहीजणांबाबत, दारू अनेक वर्षे पीत असणाऱ्या माणसाने दारू अचानक
सोडल्यास पुढील काही दिवस तो भ्रमिष्टासारखा वागू लागतो वेड्यासारखे बडबडणे
संशय घेणे, भीती वाटून पळत सुटणे असे प्रकार करू लागतो. नैराश्यासारखे, उन्मादा-
वस्थेसारखे रोग जडतात. दारू पिण्याव्यतिरिक्त इतर कशात रस रहात नाही. उ
प्र.२१ दारू पिण्याविषयी प्रचलित अंधश्रद्धा कोणत्या ?
एखाद्याचे नशीब वाईट म्हणून तो दारू पिऊ लागतो. अपयश व दु:ख या मुळेच
 तोदारूंपिऊ लागला, असेही समर्थन मांडले जाते. (प्रत्यक्षात त्या माणसाचे व्यक्तीमत्वच
दोषी असल्याने प्रथम अर्धवट प्रयत्नानंतर अपयश, दु:ख व नंतर व्यसन जडणे असे होते.)
अनुवंशिकता आढळल्याने, एखाद्या घराण्यालाही दारू पिण्याचा शापच आहे
असे समजले.जाते
उ _ अंगारा व दैवी उपचाराने दारू सुटते असा समजले जाते. प्रत्यक्षात त्या
माणसाची मनोभूमिका व समाजाने त्यांच्यावर आणलेल्या नियंत्रणाचा तो परिणाम असतो.
सुशिक्षित व श्रीमंत लोक दारू ही व्यवसायातल्या व्यवहारांसाठी उपयोगी व
आवश्यक बाब समजतात. प्रकृतीसाठी (झोप व भुकेसाठी) दारू वापरली जाते
आदिवासींमधे तर धार्मिक प्रसंगामध्ये दारूचे स्थान महत्वाचे आहे. कधी कधी दारू
सोडल्यावर येणाऱ्या भ्रमिष्टावस्थेला भूतबाधा,समजली जाते.
अंगात येणे
प्र.२२ भगताने “अंगात ये' म्हटले की काय होते ?
गावातल्या कळकट, चिलीम ओढणाऱ्या, तापट, भडकू डोक्याच्या भगताच्या
अंगात मात्र त्याला पाहिजे तेंव्हा 'देव अंगात” येतो ! देवाला *ये* म्हटले की तो अंगात
येतो, वेळ घालवीत नाही. नुसते अंगात येते, एवढेच नव्हे तर तो सर्वज्ञ अनादी अनंत
निर्गुण जगन्नियंता भविष्य सांगतो, फटाफट प्रश्नांची उत्तरे देतो, लिंबू, नारळ, वरण-
“मनोविकार आणि भूतबाधा £ 2२ ६ २22२३३ उ आख
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...