शोधां च्या कथा - अणु | HOW WE FOUND ABOUT ATOMS?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
970 KB
Total Pages :
27
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कल्पना.)
हे गृहीतक जर बरोबर असेल, तर एका आकारमानाच्या प्राणवायूशी
त्याच्या दुप्पट आकारमानाच्या हायड्रोजनचा संयोग होतो, म्हणजे बहुधा
हायड्रोजनच्या दोन अणूंचा प्राणवायूच्या एका अणूशी संयोग होत असावा.
पाणी या संयुगात हायड्रोजन आणि प्राणवायू यांचे प्रत्येकी एक अणू
असावेत, अशी डॅल्टनची मूळ कल्पना होती.
तरीही पाण्यात असणारा प्राणवायू हा त्यातील हायड्रोजनच्या
वजनाच्या ८ पट असतो. याचाच अर्थ, पाण्याच्या रेणूतील प्राणवायूच्या
अणूचे वजन हे हायड्रोजनच्या २ अणूंच्या बेरजेच्या ८ पट असले पाहिजे.
म्हणजे प्राणवायूच्या एका अणूचे वजन हे हायड्रोजनच्या एका अणूच्या
१६ पट असले पाहिजे. जर आपण हायड्रोजनच्या एका अणूचे वजन
१ मानले, तर प्राणवायूच्या एका अणूचे वजन १६ असेल.
पाण्याच्या रेणूत हायड्रोजनचे २ अणू असतात हे रसायनशास्त्रज्ञांनी
मानले, पण अँव्होगाद्रोच्या गृहीतकाकडे जवळपास कोणीच लक्ष दिले
नाही. सुमारे ५० वर्षांपर्यंत 'गुणाकारात्मक प्रमाणांच्या नियमाचा'
(लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स) अर्थ रसायनशास्त्रज्ञांच्या नीटपणे लक्षातच
आला नाही.
१८१० सालाच्या सुमारास इतके स्सायनशास्त्रज्ञ मूलद्रव्ये आणि
अणू यासंबंधी बोलत होते की, त्यांच्या वर्णनासाठी काहीतरी लघुलिपीची
आवश्यकता भासू लागली. पाण्याच्या रचनेविषयी बोलताना दरवेळी
'हायड्रोजनचे २ अणु आणि प्राणवायूचा १ अणू असलेला पाण्याचा
एक रेणू' असे म्हणणे चांगलेच गुंतागुंतीचे होऊ लागले.
डॅल्टनने अणु दर्शवण्यासाठी लहान वर्तुळाचा वापर केला होता.
प्रत्येक मूलद्रव्याचा वेगळा अणु दाखवण्यासाठी त्याने वेगळ्या प्रकारच्या
वर्तुळाचा वापर केला होता. एका मूठद्रव्यासाठी रिकामे वर्तुळ होते तर
२८ । शोधांच्या कथा । अणू ।
दुसऱ्याचे होते काळे वर्तुळ, आणखी एका मूलद्रव्यासाठीच्या वर्तुळात
एक ठिपका होता वगैरे वगैरे... वेगवेगळ्या अणूंची बनलेली संयुगे
दाखवण्यासाठी त्याने वेगवेगळी वर्तुळे एकत्र काढण्यास सुरुवात केली.
ही एक प्रकारची चिन्हांची भाषाच (कोड) तयार झाली. जसजसे नवे
अणू आणि नवी संयुगे मिळत गेली, तशी लवकरच ती वापरायला खूप
कठीण झाली.
१८१३ साली यॉन्स जेकब बर्झिलियस या स्वीडनच्या
रसायनशास्त्रज्ञाला याहून एक चांगली कल्पना सुचली. प्रत्येक
मूठद्रव्यासाठी त्याच्या लॅटिन नावाचे पहिले अक्षर वापरावे असे त्याने
सुचवले. जर दोन मूलद्रव्यांच्या नावाची सुरुवात एकाच अक्षराने होत
असेल तर त्याचे दुसरे अक्षर वापरता येई. हे त्या मूलद्रव्याचे आणि
त्याच्या एका अणूचे रासायनिक चिन्ह' (केमिकल सिम्बॉल) ठरवण्यात
आले.
अशा तऱ्हेने, प्राणवायू (ऑक्सिजन) म्हणजे 0, नायट्रोजन म्हणजे
५, कार्बन झाला ८, हायड्रोजन 1, क्लोरीन म्हणजे (01, गंधक (सल्फर)
5, फॉस्फरस म्हणजे ? वगैरे, वगैरे....जेव्हा इंग्रजी नावे लॅटिनपेक्षा
निराळी होती तेव्हा ही चिन्हे तितकीशी स्पष्ट नव्हती. उदाहरणार्थ,
लॅटिनमध्ये सोन्याला 'ऑरम' (/0॥0771) असे म्हणतात, म्हणून सोन्याचे
रासायनिक चिन्ह &७ असे आहे.
बर्झिलियसची पद्धत वापरून वेगवेगळ्या पदार्थाचे रेणू दाखवणे
सोपे झाले. उदाहरणार्थ, हायड्रोजनचा एक रेणू पया अक्षराने दर्शवला
जातो, पण हायड्रोजन हा वायु एकेरी अणूंनी बनत नाही असे लक्षात
आले. त्याच्या रेणूत हायड्रोजनचे प्रत्येकी २ अणू असतात. म्हणून हा
रेणु नेहमी 1, असा लिहिला जाती.
वायुरूपात असणारी इतरही काही मूलद्रव्ये ही २ अणूंच्या
शोधांच्या कथा । अणू | २९
User Reviews
No Reviews | Add Yours...