शोधांच्या कथा - ऊर्जा | HOW DID WE KNOW ABOUT ENERGY ?

HOW DID WE KNOW ABOUT ENERGY ? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जेम्स प्रेस्कॉट जूल या इंग्रज शास्त्रज्ञाने या प्रश्‍नाचा वेगळ्या तऱ्हेने विचार केला. तो लहानपणी बयच आजारी असे. त्याच्या वडिलांचा बीअर तयार करण्याचा उद्योग होता आणि त्यांच्या बीअरला खूप मागणी असल्यामुळे ते चांगले श्रीमंत होते. जूलचे शिक्षण घरीच, खाजगीरीत्या झाले होते आणि त्याने स्वत:साठी घरीच एक प्रयोगशाळाही थाटली होती. कशाचेही अचूक मोजमाप घेण्याचा त्याला छंदच जडला होता. १८४० च्या दशकात, विशिष्ट प्रकारची ऊर्जा ठरावीक प्रमाणात ' वापरल्याने नेमकी किती उष्णता निर्माण होते याचे त्याने मोजमाप केले. त्याला सुचलेल्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेचा त्याने यासाठी वापर केला. उदाहरणार्थ, त्याने वल्ह्याच्या सहाय्याने पाणी ढवळले. त्यानंतर त्याने पारा वल्ह्याने वळला. घर्षणाने उष्णता निर्माण होण्यासाठी त्याने लहान छिद्रातून पाण्याचा प्रवाह सोडला. वायू प्रसरण पावल्यानंतर त्याचे परत आकुंचन केले. वेगवेगळ्या वस्तू तापवण्यासाठी त्यांतून विजेचा प्रवाह सौडला. 3 अशा तऱ्हेच्या मोजमापाचे त्याला इतके वेड होते की त्याच्या मधुचंद्राच्या वेळी- देखील तो अशा अभ्यासात गर्क होता. त्याने स्वत: एक नवे तापमापक तयार केले होते. आपल्या नववधूसमवेत एका धबधब्यापाशी गेला असता त्या तापमापकाचा उपयोग करून त्याने त्या धबधब्याच्या वरच्या व खालच्या टोकाच्या पाण्याचे तापमान मोजले. उंचावरून पडणाऱ्या पाण्यातील ऊर्जेमुळे धबधब्याच्या खालच्या बाजूच्या पाण्यात उष्णता निर्माण झाली आहे का हे त्याला पाहायचे होते आणि जर उष्णता निर्माण झाली असेल तर ती किती हेही त्याल्म मोजायचे होते. १८४७ च्या सुमारास, मायरच्या शोधनिबंधानंतर ५ वर्षांनी, जूलची अशी खात्री पटली होती की कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेतून ठरावीक २८ | शोधांच्या कथा । ऊर्जा प्रमाणातच उष्णता निर्माण होते. उष्णतेचे मोजमाप त्याने मायरपेक्षाही अधिक अचूकपणे केले होते. शिवाय, ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होताना, जर त्यातून काही ऱ्हास झाला नाही किंवा कशाची भर पडली नाही, तर त्यातून ऊर्जेचे अविनाशित्वच सिद्ध होते. जूलने आपले सर्व निष्कर्ष एका निबंधात लिहून ते छापण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काही खराखुरा शास्त्रज्ञ नव्हता. ती एक श्रीमंत बीअर उत्पादक होता. (त्याच्या वडिलांच्या निधनानंतर, बीअरच्या उद्योगाची जबाबदारी आता त्याच्यावरच होती.) त्याच्या संशोधनाचा गांभीर्यानें विचार करण्याबद्दल त्यावेळचे शास्त्रज्ञ साशंक होते म्हणून त्याच्या निबंधाला प्रसिद्धी देण्याचे त्यांनी नाकारले. जूलचा एक भाऊ वर्तमानपत्रात काम करत असे. त्या वर्तमानपत्रात आपला संपूर्ण निबंध छापून आणण्यासाठी जूलने आपल्या भावाची मदत घेतली. त्यामुळे निदान काही लोकांना तरी तो वाचण्याची संधी मिळाली. त्यानंतर या विषयावर त्याने एक व्याख्यान दिलेले ऐकून काही शास्त्रज्ञांचे कुतूहल जागृत झाले. काही थोड्या वर्षातच जूलच्या कार्याची गंभीरपणे दखल घेतली जाऊ लागली. जूल ज्यावेळी आपला निबंध छापत होता, त्याच सुमारास हेरमान एल.एफ .वॉन हेल्महोल्ट्झ हा जर्मन शास्त्रज्ञ, ऊर्जा अविनाशी आहे, अशा निष्कर्षापर्यंत पोचला होता. १८४७ साली आपली कल्पना त्याने एका निबंधात स्पष्टपणे मांडली. हेल्महोल्ट्झ प्राध्यापक होता, तरीही आपला निबंध प्रसिद्ध करण्यात त्याला अडचण आली. अखेर त्याचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्याचे व्यवस्थित स्पष्टीकरण आणि जूलची मोजमापे यांचा अखैर प्रभाव पडला. मायर, जूल आणि हेल्महोल्ट्झ या तिघांनी १८४० च्या दशकात शोधांच्या कथा । ऊर्जा । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now