आरोग्य आणि अंधश्रद्धा -2 | AROGYA ANI ANDHSHRADHA - PART TWO

Book Image : आरोग्य आणि अंधश्रद्धा -2 - AROGYA ANI ANDHSHRADHA - PART TWO

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मनीषा लढ्ढा - MANISHA LADHDHA

No Information available about मनीषा लढ्ढा - MANISHA LADHDHA

Add Infomation AboutMANISHA LADHDHA

संजय कुमार लढ्ढा - SANJAY KUMAR LADHDHA

No Information available about संजय कुमार लढ्ढा - SANJAY KUMAR LADHDHA

Add Infomation AboutSANJAY KUMAR LADHDHA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सर्प दंश झाल्यावर बऱ्याचवेळा मंत्रोपचार, महादेवाच्या, भेरोबाच्या मदिरात रुग्णास ठेवणे, औषधी खडा लावणे, वनस्पतीचा रस पिण्यास देणे इ. प्रकार केले जातात. ते सर्व उपचार अशास्त्रीय व धोकादायक ठरू शकतात. जंगलात राहणारे आदिवासी व अन्य मागास जमातींमध्ये याबाबतीत भयंकर अंधश्रध्दा आढळतात . व त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण खूप असते. त्यावर काही प्रभावी जंगली वनस्पतीहीउपयोगात आणतात. त्यांचे ही शास्त्रीय संशोधन होणे आवश्यक आहे. नुकतेच एक प्रकरण सर्पदंशाबाबत वाचण्यात आले. बेलापूर गावाजवळ एका खेड्यात सर्पदश झालेल्या व्यक्तीस महादेवाच्या मंदिरात ठेवले जाते. ती व्यक्ती मृत झाल्यानंतरही तिला तीन दिवस मंदिरात ठेवावे लागते म्हणजे ती व्यक्‍ती जिवंत होते; पण असे घडले की त्या मृत व्यक्तीचे शरीर कुजून दुर्गंधी. सुटते व असे फसवले गेलेले नातेवाईक आपले दुर्दैव समजून शव घेऊन जातात. अशा गंभीर घटनांकडे समाजाने गांभीर्याने पाहिले पाहिजे व याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला कठोर शासन व्हायला हवे. री . छुष्ठरोग- कुष्ठरोग म्हणताच सर्वप्रथम आठवण कुणाची होत असेल तर बाबा आमटे या महापुरुषाची ! $ कुष्ठरोग म्हणजे हातपाय झडलेला, बसक्‍्या नाकाचा, नाका-तोंडातून स्त्राव वाहणाऱ्या व माशा घोंघावणाऱ्या रोग्याचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते आणि अगावर काटा उभा राहतो. हे चित्र बदलण्यासाठी बाबा आमटेंना आपले सर्वस्व कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी वाहून घ्यावे लागले त्यांच्या एवढ्या भगीरथ प्रयत्नांमुळे कुष्ठरोग्यांना समाजात स्थान मिळाले पण अद्यापही आपल्या मनात कुष्ठरोग म्हणजे महाभयंकर रोग आहे किंवा मागील जन्माचे पाप आहे, दुष्कृत्यांचे फळ आहे, या अंधश्रध्दा आढळतात. ८०% कुष्ठरोगी संसर्गप्रसारक्षम नसतात. राहिलेल्या रोगप्रसारक्षम असणाऱ्या रुग्णांबरोबर दीर्घकाळ राहिल्यास आणि निकट संपर्क आल्यासच हा रोग होण्याचा थोडाफार संभव असतो. कुष्ठरोग आनुवंशिक माही, की पूर्वसंचिताचाही तो परिणाम ८ ७ आरोग्य आणि अंधश्रद्धा भाग-२ नाही. हा रोग मायकोबॅक्टोरियम लॅप्रासच्या रोगजंतूमुळे होणारी व्याधी आहे. यामध्ये अंगावर चट्टे उठणे, बधीरपणा येणे, मुग्या येणे इ. लक्षणे सुरुवातीस आढळतात .त्याची तपासणी उपचार वेळेवर केल्यास कोणतीही शारीरिक विकृती व्यंग न येता रुग्ण निश्‍चितच बरा होतो. त्यावर डेपसोन, रिफामपिसीन इ. प्रभावी औषधे आहेत. ही औषधे सुरू करताच जंतूंचा त्वरित नाश होऊ शकतो; पण पुन्हा उद्‌भवू नये म्हणून दीर्घ काल वैद्यकीय तज्ज्ञांकडून औषधोपचार घेणे गरजेचे असते. त्यामुळे खोटी प्रतिष्ठा, समाजातील स्थान इ. गोष्टींचा विचार न करता कुष्ठरोगाची लागण झाल्याचा संशय येताच तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करावी व वस्तुस्थितीस सामोरे जाऊन योग्य उपचार घ्यावा तरच कुष्ठरोगाचे उच्चाटन होऊ शकते. क्षयरोग (टी. बी.) यामध्ये क्रमाक्रमाने प्रकती ढासळते. रूग्णास खोकला, भूक मंदावणे, बेडका. पडणे. छातीत पाणी होणे या शिवाय ज्या अवयवास संसर्ग झाला असेल त्याप्रमाणे लक्षणे आढळतात. या आजाराबाबतही भरपूर प्रमाणात गैरसमज आढळतात. . चांगली सुदृढ तब्येत असल्यास क्षय होऊ शकत नाही किंवा ग्रामीण भागातच याचे प्रमाण जास्त आहे. अतिसंभोगामुळे क्षय होतो, तसेच हा खूप संसर्गजन्य आहे आणि प्रत्येक क्षयरोगी संसर्ग पसरवू शकतो. तसेच क्षयरोग्याचे कपडे भांडी वेगळे असावेत. क्षयरोग्याने संभोग करू नये किंबा क्षय झाला म्हणजे आता हा लवकरच मरणार, असे विविध प्रकारचे गैरसमज आढळतात. क्षयरोग म्हणजे टी. बी. होय. टी. बी. हा मेंदू, किडनी, फुफ्फुस, अस्थी, त्वचा, लसीका ग्रंथीचा इ. कशाचाही होऊ शकतो. आपण जो प्रामुख्याने पाहतो तो श्चसनमार्गाचा क्षय होय. टी. बी. हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्‍युलॉय या बॅक्टेरियामुळे होतो. श्वसनमार्गाचा टी. बी. हा हवेमार्फत पसरतो. लवकर निदान न झालेला किंवा उपचार व्यवस्थित न घेणारा रुग्ण खूप खोकत असेल तरं क्षयाचा प्रसार त्याच्याकडून होऊ शकतो; पण अगदी सुरूवातीला निदान निश्‍चित झाले व उपचार सुरू केलेला असेल तर ती व्यकती क्षयाचा संसर्ग करीत नाही किवां ज्या रुग्णाच्या बेडक्यामध्ये क्षयरोगाचे जंतू आढळतात पण ज्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य आणि अंधश्रद्धा भाग-२ ७९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now