अंधश्रध्दांची दुनिया चमत्कारांची किमया | ANDHSHRADHACHI DUNIYA CHAMATKARANCHI KIMAYA

Book Image : अंधश्रध्दांची दुनिया चमत्कारांची किमया  - ANDHSHRADHACHI DUNIYA CHAMATKARANCHI KIMAYA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मच्छिंद्रनाथ मुंडे - MACHINDERNATH MUNDE

No Information available about मच्छिंद्रनाथ मुंडे - MACHINDERNATH MUNDE

Add Infomation AboutMACHINDERNATH MUNDE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दुसरीकडून पेन घेऊन चार-पाच शब्दात आपल्या मनातील इच्छा लिहिली. न्यांना लिहीता वाचता येत नव्हते, त्यांनी आपली चिट्टी दुसरीकडून लिहून घेतली. सर्वजणींनी चिठ्ठ्यांच्या घड्या घालून मनकवड्याच्या हातात दिल्या. ममकवह्याने एक चिट्टी कानाला लावली व जाहीर केले, त्यात पतिराज घरी कधी येतील?* असे लिहिले आहे. 'ठमामावशी' असेही चिठ्टीवर लिहिले आहे. कोण ठमामावशी? सगळ्यांच्या नजरा ठमामावंशीवर खिळतात. त्यानंतर कुडमुड्या मनकवड्याने लवकरच येतील, चिंता नसावी असेही सांगितले. त्यानंतर दुसरी चिठ्ठी उचलून कानाला लावली व तीही न बघता न वाचता, ' मुलीचे लग्न कधी होईल? -लताबाई' ' असे जाहीर केले. लताबाई उभ्या राहिल्या. सर्वजणी अवाक झाल्या. मनकवड्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने सोक्षात परमेश्वरच अवतरला असे त्यांना वाटले. प्रत्येक चिट्टीगणिक उत्सुकता वाढत गेली. सर्वजणींच्या चिठ्ठ्या ओळखल्यानंतर सगळ्याजणी मनातल्या मनात सुखावल्या. त्यांनीं काही रक्कम स्वखुशीने मनकवड्याला दिली दावा: येथे मनकवड्या कधी ही स्वत:हून आपल्याकडे दैवीशक्ती आहे असे दावा करीत नाही. परतु लोकच त्याच्याकडे दैवीशक्ती आहे असे मानतात. हीच टिक करून काही बुवा पण आपल्या भक्ताना गंडवतात रहस्य : मनकवड्याने जेव्हा कागदावर आपल्या मनातील शंका/प्रश्‍न लिहा असे म्हटले त्याच वेळी त्याने आपल्याच ओळखीच्या ठमामावशीचा एजंट म्हणून वापर केला. त्या दिवशी मनकवड्या स्वत:हून तेथे आला नव्हता. ह्या अध्यात्मिक बैठकीची माहिती ठमामावशीनेच आदल्या दिवशी मनकवड्याला दिली होती. दोघांनी मनोमन ठरवून हा चिठ्ठ्यांद्वारे मनातले ओळखण्याचा चमत्कार सादर केला पहिली चिठ्ठी जेव्हा मनकवड्याने उचलली ती खरे तर लताताईंची होती. परतुं त्या चिठ्टीसाठी त्याने ठमामावशीला अगोदर सांगितल्याप्रमाणे तिने साथ द्यायची ठरले होते. 'त्यानुसार मनकवड्याने चिठ्टी लताताईंची असतानासुद्धा बळेबळेच कानाला लावली व जणू काय मंला अं्तज्ञानाने तुमच्या मनातले ओळखता येते असे नाटक केले व ठमामावशीचे नाव पुकारले. त्यांची इच्छा जाहीर केली. ठरल्याप्रमाणे ठमामावशी उभ्या राहिल्या. नंतर चिठ्टीतले शब्द बरोबर आहेत का? ते पाहण्यासाठी चिठ्ठी उघडली व त्या चिट्टीवरील मजकूर वाचून तो मनात ठेवला. त्यानंतर दुसरी चिट्टी उचलली. ती कानाला लावली. नुसतीच तोंडाने थोडी सौम्य आवाजात बडबड २८ . अंधकश्रद्धांची दुनिया चमत्कारांची किमया - भ्पाग २ केली. त्या चिठ्टीसाठी अगोदर वाचून मनात ठेवलेला मजकूर जाहीर केला. तो मजकूर लताताईंचा होता. त्या उभ्या राहिल्या. त्यांच्या शंकेचे निरसन केले. पुन्हा चिठ्ठी उघडली. त्यावरचे प्रश्‍न / शंका मनातल्या मनात वाचून घेतल्या. आणि पुन्हा तिसरी चिट्टी उचलली व तिच्यासाठी अगोदरचा मजकूर जाहीर केला. अशाप्रकारे सर्व चिठ्ठ्या ओळखल्या. | $$ अंधश्रद्धांची दुनिया चमत्कारांची किमया - भाग २ २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now