विज्ञान आणि तर्कशक्ती | VIGYAN ANI TARKSHAKTI

VIGYAN ANI TARKSHAKTI by पुस्तक समूह - Pustak Samuhसंजीवनी आफले - SANJIVANI AAFLEसब्यसाची चटर्जी - SABYASACHI CHATERJEE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

संजीवनी आफले - SANJIVANI AAFLE

No Information available about संजीवनी आफले - SANJIVANI AAFLE

Add Infomation AboutSANJIVANI AAFLE

सब्यसाची चटर्जी - SABYASACHI CHATERJEE

No Information available about सब्यसाची चटर्जी - SABYASACHI CHATERJEE

Add Infomation AboutSABYASACHI CHATERJEE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विज्ञान हे शंकेखोरपणा करतानाच वैज्ञानिक नियमांची सार्वत्रिकता (पएट' 5०19) मान्य करते. अशा प्रकारे, विज्ञान पुढील मार्गाने पुढे जाते (१) पुरावा आणि तथ्ये (२) पुरावा आणि तर्क (३) वैज्ञानिक वैधतेचा दावा करणाऱ्या सर्व गोष्टींना प्रश्न विचारले जातात आणि त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागते आणि (४) परीक्षा देण्यास नकार देणारे सर्व काही ते वैज्ञानिकदृष्ट्या वैध आहे असा दावा करू शकत नाही. परंतु ५०० वर्षांपूर्वी या पायऱ्या मान्य झालेल्या नव्हत्या. त्याकाळी, असे मानले जाई की ज्ञान हे तर्क करण्याच्या मानसिक प्रक्रियेने मिळवता येते. सध्याच्या विज्ञानाच्या कार्यपद्धतीमध्ये केवळ दोन टप्प्यांवर मानसिक प्रक्रिया समाविष्ट असतात. प्रथम, प्रयोगाचे नियोजन करताना, म्हणजेच नक्की काय करायचे आहे ते ठरवताना आणि शेवटच्या टप्प्यावर, शेवटच्या पायरीवर, निरीक्षणावरून अनुमान काढताना. या दोन टप्प्यांच्या मध्ये मानसिक तर्कप्रक्रिया प्रयोग करणे आणि निरीक्षण करणे यांच्या हातात हात घालून जात असते. पण हे सगळे करताना, नियोजन करताना, प्रयोग करताना आणि अनुमान काढताना, एक लक्षात ठेवले पाहिजे की विज्ञानात मानसिक तर्क आणि वास्तवातले प्रयोग यातली परस्परक्रिया अंतर्भूत आहे. या प्रक्रिया दीर्घकाळ चालणाऱ्या असू शकतात आणि त्यातून आपोआप अनुमान काढता येत नाही, तर काही वेळा त्यातून काही निष्कर्ष निघतही नाही. विज्ञानात कल्पनाशक्तीचाही महत्त्वाचा वाटा असतो, पण ते फक्त कल्पनेच्या जोरावर चालत नाही तर त्याला तपासण्यायोग्य आणि परत परत करण्याजोग्या प्रायोगिक परीक्षांना सामोरे जावे लागते. विज्ञानाचा इतिहास अशा प्रकारच्या अनेक कथा आणि घटनांनी भरलेला आहे. & & & लेखक : सब्यसाची चटर्जी, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे अध्यक्ष. इ-मेल : ९08/88099(2)8700811.00701 अनुवाद : संजीवनी आफळे, शैक्षणिक संदर्भ गटात सहभागी. इ-मेल : 8व8]0816(द6तानि1811. 0010) शैक्षणिक संदर्भ अंक - ११२ ६४
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now