साने गुरूजी पुनर्मूल्यांकन | SANE GURUJI PUNARMULYANKAN

SANE GURUJI PUNARMULYANKAN by पुस्तक समूह - Pustak Samuhभालचंद नेमडे - BHALCHAND NEMADE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

भालचंद नेमडे - BHALCHAND NEMADE

No Information available about भालचंद नेमडे - BHALCHAND NEMADE

Add Infomation AboutBHALCHAND NEMADE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
22 साने गुरुजी पुनर्मूल्यांकन आणि समाजाच्या जीवनात माणुसकीचा, मांगल्याचा परिपोष साहित्यामधून व्हायला हवा ही भूमिकाच गुरुजींच्या साऱ्या लेखनाच्या मुळाशी होती. : 1943 साली, गुरुजी तुरुंगात असताना, हा अनुवाद त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. प्रस्तावनेत गुरुजींनी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या, सुशिक्षित मध्यमवर्गात मानमान्यता असलेल्या समकालीन बड्या साहित्यिकांचा अधिक्षेप केलेला आढळतो. गुरुजी लिहितात, “खेड्यापाड्यातील जनता हाच खरा महाराष्ट्र आहे. दहा-वीस शहरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे... महाराष्ट्राचे आवडते कवी व आवडते कादंबरीकार यांचे कोणते काव्य व कोणती कादंबरी त्या खऱया महाराष्ट्रात गेली आहे? महाराष्ट्राचे आवडते याचा अर्थ चार सुशिक्षितांचे आवडते यापेक्षा अधिक नाही. खरा महाराष्ट्र या कादंबरीकारांनी व कवींनी पाहिलेलाही नसतो. त्या खऱ्या कष्टाळू व श्रमी महाराष्ट्राबद्दल यांना आदर नसतो, प्रेम नसते, त्याचे काय? कवी व कादंबरीकार ते काय म्हणून होतील?” “त्यांच्या (बहुजनसमाजाच्या) खेड्यापाड्यांतील लोकांचे चित्र त्यात (या मंडळींच्या साहित्यात) कोठे होते? बहुजनसमाजाबद्दल त्यात काय होते? तुमच्या 'रागिण्या' व तुमच्या 'दौलती' यांचे बहुजनसमाजाला काय होय? तुमचे उच्च काव्यशासत्रविनोद, तुमचे सुसंस्कृत वैषयिक सुखविलास --- त्यांना त्यातील काही समजत नाही.””!« रागिणी व दौलत या कादंबर्‍्यांचा निर्देश वर आला आहे, हे लक्षात येणे अवघड नाही. त्या त्या काळात जे महापुरुष असतात त्यांनी दाखविलेल्या मार्गाने कलेने जावे, असे अनुसरण करणारी कला हीच सत्कला होय, हे टॉलस्टॉय यांचे मत. महापुरुष म्हणत असताना, टॉलस्टॉय यांच्यासमोर कोणाचे चित्र आहे? गुरुजींच्या भाषेत, “सर्व मानवांचे ऐक्य व्हावे म्हणून झटणारा, सर्वत्र समता व बंधुभाव हेच ज्याचे ध्येय, ज्याला आप-पर नाही, सर्व मानवजातीच्या हितमंगलासाठी जो उभा आहे, ज्याला भेद अमंगळ वाटतात, प्रेम हीच ज्याची शक्ती, त्याग हेच ज्याचे वैभव, जो सर्वांना हात देण्यास तयार, दरिद्री लोकांचा सखा, पडलेल्यांचा उद्भारकर्ता -- तो टॉलस्टॉयचा महापुरुष होता.'”'? टॉलस्टॉय यांच्या समोर येशू ख्रिस्त असावा. गुरुजींच्या डोळ्यांसमोर महात्मा गांधींचे : जितेजागते व्यक्तिमत्त्व व जीवन होते. गांधीजींचे नाव घेऊन त्यांनी लिहिले, “अशा महापुरुषाशी सारे भारतीय कलावान सहकार्य करतील तर किती आनंदाची गोष्ट होईल!?!'* त्यावेळच्या मान्यवर, शिष्ट व प्रतिष्ठित साहित्यिकांना वा 'लिटररी एस्टॅब्लिशमेंट”ला साने गुरुजींची टीकाटिप्पणी, त्यांची गांधीजींना अनुसरण्याची, त्यांचे साहाय्यक बनण्याची भूमिका यात स्वतःचा अधिक्षेप वाटला असला तर ते ठीकच म्हणावयास हवे. वेगवेगळ्या कारणांनी, बहुतेक मान्यवर कलावंत/साहित्यिक गांधीविन्मुख होते; एवढेच नाही तर, गांधी प्रगतीला रोखू पाहणारे, कालचक्र उलटे फिरवू पाहणारे, कला-साहित्य यांचे शत्रू होत अशीच अनेकांची प्रामाणिक धारणा होती. नीतिबोध करणे, उच्च सामाजिक-नैतिक ध्येयनिष्ठा साने गुरुजी : व्यक्तित्व, जीवन आणि वाड्मय 23 रुजवणे, समाजाच्या कल्याणास बांधिलकी मानणे या गोष्टी श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल कलाकृतीच्या निर्मितीमध्ये विक्षेप आणणाऱ्या असतात हे “अधिकृत' मत होते असे म्हणता येईल. श्री. राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी त्यांच्या चरित्रात श्री. के. क्षीरसागर व प्रा. ना. सी. फडके यांची साने गुरुजींच्या वाझ्मयाबद्दलची मते उद्धृत केली आहेत, प्रा. क्षीरसागर यांनी लिहिले, “साने गुरुजींची भाषा कोकणच्या विशिष्ट टापूतच बोलली जाणारी, महाराष्ट्राला दुबोंध वाटणारी, मुद्दाम उबविलेली, ऊरबडवी बनविलेली, गबाळी आणि कित्येक ठिकाणी अशुद्ध आहे. त्यांच्या पुस्तकांत दुबळेपणा, पुराणपूजन, पाल्हाळ, भोळसरपणा, रडवेपणा भरलेला आहे. त्यांचे विपुल वाड्मय म्हणजे रडारड आणि पुनरूक्ती यांचा एक अजबखाना बनून राहिला आहे; आणि त्यातही त्यांनी आपल्या वारकरी आणि भजनी पंथाचे इतके मिश्रण केले आहे की, कला व साधुता म्हणजे एक गुळचट व पोरकट प्रकार आहे असे वाटू लागते.'”'१ (ठळक ठसा प्रस्तुत लेखकाचा) क्षीरसागरांचे मत हे एका मोठ्या वाचकवर्गाचे प्रातिनिधिक मत होते असे म्हणणे वावगे होणार नाही. हा वाचकवर्ग म्हणजे सुशिक्षित पांढरपेशा मध्यमवर्गीय. आजही जर या वाचकवर्गाचे मत घेतले तर, साने गुरुजींचे वाड्मय फारसे वाचलेले नसतानाही, हा वाचकवर्ग हेच मत व्यक्त करील ही शक्‍यता जास्तच आहे. प्रा. फडके यांनी म्हटले, “कलात्मक दृष्टीने पाहता साने गुरुजींच्या बाड्मयाचे स्वरूप सामान्य आहे; आणि त्यांना श्रेष्ठ साहित्यिक ठरविण्यात त्यांच्या देशभक्तीचा गौरव होत असेल पण ललित साहित्याच्या मूलतत्त्वांचा नाश होतो.” त्या काळी कलावादी आणि जीवनवादी असे दोन पक्ष पडले आणि त्यांच्यात वादंग माजले. पुरोगामी साहित्य या मथळ्याचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाल्याचे स्मरते. या पुस्तकात प्रा. ना. सी. फडके व आचार्य श॑. द. जावडेकर यांचे लेख होते. इतरही कोणाकोणाचे असतील. आता, साने गुरुजींची 1930 ते 1950 या काळातली लोकप्रियता तर निर्विवादच होती. त्यांच्या टीकाकारांनाही ती नाकारता येत नव्हतीच. गुरुजींच्या लेखणी व वाणीत लोकांना, विशेषतः युवा पिढीला, प्रेरित करण्याचे, समर्पणासाठी उद्युक्त करण्याचे विलक्षण सामर्थ्य होते ही अनुभवाची गोष्ट होती. त्यांच्या शिकवण्याने, लेखनाने, भाषणांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात, शेतकरी, कामगार व नागरिक यांच्या विभित्र आंदोलनांत झोकून दिलेल्यांची संख्या हजारोंनी असेल. एवढेच नाही, त्यांच्या भाषण-लेखनातून स्फुर्ती घेऊन राजकीय-सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक स्वरूपाच्या विधायक कार्यांना आजन्म वाहून घेतलेली, निष्ठेने काम करीत राहिलेली माणसेही शेकड्यांनी निघतील. आणि तरीही, क्षीरसागरांसारखेच मत एका मोठ्या वर्गाचे आहे, ही गोष्ट शिल्लक राहतेच; तिचा अर्थ लावणे जरुरीचे आहेच.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now