जीवनसत्त्वे | HOW DID WE KNOW ABOUT VITAMINS
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
849 KB
Total Pages :
24
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्राणी शोधणे आवश्यक हीते. कुत्र्यांना होणारा 'ब्लॅक टंग' नावाचा
आजार म्हणजे माणसांचा पेलाग्रा च आहे असे टी. एन. स्पेन्सर या
अमेरिकन पशुवैद्याने १९१६ साली दाखवून दिले.
ब्लॅक टंग' वर केलेल्या संशोधनातून, हा आजार बरा करणारा
घटक हे एक पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे हे निश्चित झाले.
परंतु याला नेहमीप्रमाणे नाव म्हणून नवे अक्षर मिळाले नाही. गोल्डबर्गरने
त्याला 'पी पी फॅक्टर' म्हणजे 'पेलाग्रा प्रिव्हेंटिव्ह' किंवा 'पेलाग्रा रोखणारे'
असे नाव दिले आणि बरीच वर्षे ते प्रचारात होते.
जसजशी नवनवी जीवनसत्त्वे शोधून काढण्यात आली त्याबरोबर
त्यांना अक्षराने संबोधणे विशेष सोईचे राहिले नाही.
हर्बर्ट मॅक्लीन इव्हॅन्स आणि के. जे. स्कॉट या दोघा अमेरिकन
शास्त्रज्ञांनी स्निग्ध पदार्थात विरघळणारे, पण अ किंवा ड जीवनसत्त्वाहून
वेगळे असे आणखी एक नवे जीवनसत्त्व शोधून काढले. हे नसल्यास
उंदरांना पिल्ले होत नसत. त्याला त्यांनी ई जीवनसत्त्व असे नाव दिले.
त्यानंतर आणखी एक स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्त्व
'फ' मिळाल्याचे सांगण्यात आले. पण तो दावा चुकीचा ठरला आणि
आजतागायत असे कोणतेही 'फ' जीवनसत्त्व अस्तित्वात नाही.
पी या इंग्रजी अक्षरापर्यंतची जीवनसत्त्वे असल्याचे सांगण्यात येत
असे पण त्यात काहीच तथ्य नाही. ई जीवनसत्त्वानंतरचे के जीवनसत्त्व
हे एकच खरे जीवनसत्त्व डॅनिश रसायनशास्त्रज्ञ हेन्रिक डॅम याने १९२९
साली शोधून काढले.
यात आणखी एक गुंतागुंत आहे. बरीच वर्षे रसायनशास्त्रज्ञांना
वाटत होते की ब जीवनसत्त्व हे काही एकच जीवनसत्त्व नाही. यामुळे
बैरी बेरी होत नसे हे खरे परंतु, यात आणखीही काही असे घटक होते
की त्यांचा बेरी बेरीवर काही प्रभाव नव्हता पण ज्यांच्यामुळे अन्य
२८ । शोधांच्या कथा । जीवनसत्त्वे
काही आजार बरे होत असत. कदाचित हे एक मिश्र जीवनसत्त्व असून
त्यात इतरही काही जीवनसत्त्वे असतील का?
१९२७ साली विल्यम डेव्हिस साल्मन या अमेरिकन शास्त्रज्ञाने ब
जीवनसत्त्वाचा असा एक नमुना तयार केला की त्यामुळे बेरी बेरी तर
बरा होत असे पण नेहमीच्या ब जीवनसत्त्वामुळे होते तशी उंदरांची वाढ
योग्य प्रकारे होत नये. त्याने तयार केलेल्या ब जीवनसत्त्वाच्या आणखी
एका नमुन्यामुळे उंदरांची वाढ योग्य प्रकारे होई पण त्याने बेरी बेरीला
प्रतिबंध होत नसे.
बैरी बेरी वर निरुपयोगी असणाऱ्या या जीवनसत्त्वाला साल्मनने
'जी' जीवनसत्त्व असे नवे नाव दिले. इतर रसायनशास्त्रज्ञांना मात्र हे
नाव योग्य वाटले नाही. हे नवे जीवनसत्त्व इतके ब जीवनसत्त्वासारखे
होते की त्याचे नावही ब सारखेच असावे असे त्यांचे मत होते.
बेरी बेरी रोखणाऱ्या जीवनसत्त्वाचे नाव 'ब-१' असे ठेवले तर
उंदरांची योग्य वाढ करणाऱ्या जीवनसत्त्वाचे नाव ठेवले 'ब-२'.
नंतर असे दिसून आले की सुरुवातीच्या ब जीवनसत्त्वात एवढी
' दोनच नव्हे पण आणखीही बरीच जीवनसत्त्वे होती. म्हणून मग शास्त्रज्ञ
त्यांना ब गटातील जीवनसत्त्वे ' असे म्हणू लागले. गोल्डबर्गरचा पी पी
फॅक्टर' म्हणजे या गटातीलच एक जीवनसत्त्व ठरले.
ब गटातील जीवनसत्त्वांना क्रमांक देणे हे देखील जीवनसत्त्वांना
अक्षराने नाव देण्याइतकेच गोंधळाचे होऊ लागले. रसायनशास्त्रज्ञांनी
शोधलेल्या या गटातील निरनिराळ्या जीवनसत्त्वांची यादी ब-१४ पर्यंत
पोचली. यातील बरीचशी चुकीची ठरली. ब-१ आणि ब-२ याखेरीज
आणखी दोन क्रमांकच खरे महत्त्वाचे आहेत.
पॉल ग्योर्जी या हंगेरियन डॉक्टरला १९३४ साली असे आढळले
की एका विशिष्ट घटकाच्या अभावामुळे उंदरांना त्वचारोग होतो. त्या
शौधांच्या कथा । जीवनसत्त्वे । २९
User Reviews
No Reviews | Add Yours...